
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मांसाहारावर केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर महायुतीच्या नेत्यांनी त्यांच्यावर जोरदार टीका केली आहे. मात्र, याच मुद्द्यावर अजित पवार गटाचे नेते आणि राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मं
.
येवला येथे पत्रकारांशी बोलताना छगन भुजबळ यांना सुप्रिया सुळे यांच्या ‘मी मांसाहार केलेला माझ्या पांडुरंगाला चालतो’ या वक्तव्याबद्दल विचारले असता, त्यांनी कुणी काय खावे याकडे जास्त लक्ष देण्याची गरज नाही, असे सांगत हा विषय बाजूला सारला.
‘लाडकी बहीण’ योजनेतील गैरव्यवहारावर भुजबळांची प्रतिक्रिया
‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ या योजनेत मोठ्या प्रमाणात बोगस लाभार्थी आढळल्याचे समोर आले आहे. यापैकी सर्वाधिक लाभार्थी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्या जिल्ह्यांमध्ये आहेत. यावर बोलताना भुजबळ म्हणाले की, निवडणुका तोंडावर असल्याने अर्ज भरण्याची प्रक्रिया घाईत झाली. सर्व आमदार, मंत्री आपापल्या निवडणुकीच्या कामात व्यस्त होते. त्यावेळेस कोणी काय नोंदवले हे पाहायला वेळ नव्हता. कारण की ठराविक वेळेत ते सुरू करायचे होते. त्यामुळे काही ठिकाणी नियमांचे पालन झाले नाही, पण निवडणूक झाल्यावर त्याची चौकशी करायची असे ठरले होते.
त्यांनी असेही म्हटले की, ज्या महिलांनी चुकीचा लाभ घेतला आहे, त्यांनी स्वतःहून तो सोडून द्यावा, पण ज्या पुरुषांनी महिलांच्या नावाने अर्ज भरून लाभ घेतला आहे, त्यांच्यावर मात्र कारवाई झालीच पाहिजे.
आम्हाला बहिणींचे आणि भावांचेही प्रेम हवे
दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ‘एक कोटी भगिनींना लखपती दीदी बनवणार’ या वक्तव्यावर भुजबळ म्हणाले की, ‘ही चांगली गोष्ट आहे. आम्हाला बहिणींचे प्रेमही हवे आहे आणि भावांचंही. शेतकऱ्यांसाठी (भावांसाठी) कर्जमाफी, पाणी, वीज, चांगले बाजारभाव यांसारख्या गोष्टींवर सरकार काम करत आहे,’ असे सांगत त्यांनी सरकारची भूमिका स्पष्ट केली.
हे ही वाचा…
लाडकी बहीण योजनेत 26 लाख बोगस लाभार्थी:पुणे जिल्ह्यात सर्वाधिक फसवणूक; अजित पवार म्हणाले – …मग योजना बंद करू का?
राज्य सरकारच्या महत्त्वाकांक्षी ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ या योजनेत मोठा गैरव्यवहार उघडकीस आला आहे. सरकारच्या शोधमोहिमेत तब्बल 26 लाख 34 हजार बोगस लाभार्थी समोर आले असून, हे सर्व लाभार्थी पात्रतेच्या निकषांत बसत नसतानाही दरमहा 1500 रुपयांचा निधी घेत असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे राज्याच्या तिजोरीला मोठा फटका बसल्याचे स्पष्ट झाले आहे. बोगस लाभार्थींची संख्या पुणे जिल्ह्यात सर्वाधिक आहे. याबाबत अजित पवारांना विचारले असता, त्यांनी थेट उत्तर न देता, योजना बंद करू का? अशी प्रतिक्रिया दिली. सविस्तर वाचा…
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.