digital products downloads

कोरेगावात भाजपसोबत निवडणूकपूर्व युती: कामेश कांबळे फडणवीसांना भेटले, महेश शिंदेंनी स्पष्ट केली भूमिका, शशिकांत शिंदेंवर टीकेची झोड – Kolhapur News

कोरेगावात भाजपसोबत निवडणूकपूर्व युती:  कामेश कांबळे फडणवीसांना भेटले, महेश शिंदेंनी स्पष्ट केली भूमिका, शशिकांत शिंदेंवर टीकेची झोड – Kolhapur News



सातारा जिल्हा परिषद निवडणुकीच्या आधी महायुतीच्या झालेल्या बैठकीमध्ये युतीच्या बाबत ज्या त्या आमदाराने त्याला योग्य वाटेल त्या पद्धतीने त्यांच्या मतदारसंघात निर्णय घ्यावा असा निर्णय झाला होता. मी माझ्या मतदारसंघांमध्ये युतीमधील दोन्ही पक्षांशी चर्चा केली परंतु एका पक्षाने (राष्ट्रवादीने) स्पष्ट नकार दिला होता. त्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी झालेल्या बैठकीत माझ्या मतदारसंघातील एकूण सात पैकी 4 जागा शिवसेना आणि 3 जागा भाजप लढवणार असे ठरले होते. प्रीपोल अलायन्स भाजपसोबत असल्याने त्यांच्याबरोबर राहणे हे आमचे कर्तव्यच होते, अशी रोखठोक प्रतिक्रिया महेश शिंदे यांनी पत्रकार परिषदेत दिली ते पुढे म्हणाले, महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे नेते प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे हे साताऱ्यातील शिवसेना आणि राष्ट्रवादी अजित पवार गट यांच्या युतीत असल्याचे कळल्यावर आम्हाला त्यांच्यासोबत जाण उचित वाटलं नाही. केंद्रात जे लोक आपल्या विरोधात आहेत त्यांच्यासोबत काम करणं योग्य वाटल नाही. माझ्या मतदारसंघातील शिवसेनेचे दोन्ही सदस्य राष्ट्रवादीच्या विरोधात लढून जिंकून आले आहेत. त्यामुळे त्यांनी प्रीपोल अलायन्स यांच्याबरोबर होते, त्यांनी भाजप बरोबर राहण्याचा निर्णय घेतला. तो निर्णय अगदी योग्य होता. शशिकांत शिंदेंसोबत कोणत्या तोंडोन जाऊ शकतो? पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्यासोबत प्रीपोल अलायन्सबाबत चर्चा झालेली होती. राज्याची एकनाथ शिंदे गटाने वेगळे व्हायची भूमिका घेतली होती. त्यावेळी जी परिस्थिती होती तीच परिस्थिती साताऱ्यात आज झाली. प्रीपोल अलायन्स बरोबर राहण्याचा आम्ही निर्णय घेतला, कारण भाजप बरोबरच प्री पोल अलायन्स करून राहण्याचा निर्णय घेतला. शशिकांत शिंदे हे माझे बांधावरचे दुश्मन नाहीत. पण ते आमचे राजकीय विरोधक आहेत त्यामुळे आम्ही त्यांच्या सोबत कोणत्या तोंडाने जाऊ शकतो? असे महेश शिंदे म्हणाले. शिंदे घडाळ्याकडे गेल्याचे आश्चर्य शशिकांत शिंदे हे त्यांची तुतारी विसरून घड्याळाकडे गेले आहेत याबाबत आम्हाला आश्चर्य वाटत आहे. त्यांनी एकदा भूमिका जाहीर केली पाहिजे. नरेंद्र मोदी आणि अमित शहा हे आमचे राष्ट्रीय नेते आहेत, ही भूमिका त्यांनी आता जाहीर केली पाहिजे. साताऱ्यात येऊन आमच्या नेत्यांची, केंद्रातल्या नेत्यांची माप काढली जातात, त्या नेत्यांबरोबर अलायन्स करणे योग्य की अयोग्य हा विचार सर्वांनी केला पाहिजे. जिल्ह्यात पोलिस प्रशासन हे पालकमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली काम करत असते. मला नाही वाटत की पोलिस प्रशासनाकडून कोणत्या चुकीच्या गोष्टी घडल्या असतील, असे महेश शिंदे म्हणाले. अपहरणाचा गुन्हा भाजपने दाखल केलेला नाही अपहरणाचा दाखल झालेला गुन्हा हा भारतीय जनता पार्टीने केलेला नसून त्यांच्या कुटुंबातल्या मुलाने दाखल केलेला आहे. पोलिस प्रशासनामध्ये मला वाटत नाही पालकमंत्र्यांच्या एवढे कुणाचे चालत असेल. पालकमंत्र्यांची लोक त्यांच्याबरोबर राहिली नाहीत. पालकमंत्र्यांचा प्रीपोल अलायन्स राष्ट्रवादीबरोबर होता म्हणून ते त्यांच्यासोबत गेले. आमचा प्रीपोल अलायन्स भाजपबरोबर होता म्हणून आम्ही भाजपबरोबर राहिलो. सभागृहामध्ये शंभूराज देसाई यांच्या शिवसेनेचे संख्याबळ त्यांच्याबरोबर राहिले, परंतु राष्ट्रवादीचे संख्याबळ राहू शकले नाही, याची चिडचिड पोलिसांबरोबर करणे चालत नाही. ज्याने त्याने आपले निवडून आलेले सदस्य सांभाळायचे असतात, असे महेश शिंदे म्हणाले. पालकमंत्री आणि त्यांच्या सोबत असलेल्या लोकांनी स्वतःचे सदस्य तुरुंगातून आणल्यासारखे जिल्हा परिषदेमध्ये आणले. दीड-दीड महिना या सदस्यांना कोंडून ठेवून सुद्धा हे सदस्य तुमच्याकडे टिकले नाहीत. राष्ट्रवादीचे पाच जण भाजप बरोबर येण्यासाठी तयार होते, त्यांना नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांचे नेतृत्व आवडत असल्यामुळे ते आमच्या सोबत यायला तयार होते, असेही महेश शिंदे म्हणाले. …म्हणून उद्धव ठाकरेंचे सरकार पाडले कामेश कांबळे या सदस्याला कोणीही जबरदस्ती केली नाही. तिथले व्हिडिओ रेकॉर्डिंग तपासून पहा… कामेश कांबळे हा शिवेंद्रराजांचा प्रेमातला कार्यकर्ता आहे. शिवेंद्रराजांनी केवळ त्याच्याशी चर्चा केली… शशिकांत शिंदे यांच्या सदस्यांना कैदी आणतात त्या पद्धतीने धरून आणत होते. त्यांना त्यांच्या सदस्यांवर विश्वास नव्हता. मी कोणतीही पक्षविरोधी कारवाई केली नाही. उद्धव ठाकरे यांचे जे सरकार पाडले त्यासाठीच पाडले होते की आमचे प्रीपोल अलायन्स भाजपबरोबर होता. याच पद्धतीने कोरेगावमध्ये सुद्धा आमचा प्रीपोल अलायन्स भाजप बरोबर होता, मग आम्ही महाविकास आघाडी बरोबर कसे जाणार? असा सवाल महेश शिंदे यांनी केला. कामेश कांबळेला आणताना पालकमंत्री सायरन वाजवत घेऊन आले आहेत. कामेश कांबळे हा राष्ट्रवादी काँग्रेसचा सदस्य असून सुद्धा शिवसेनेचे पालकमंत्री सायरन लावून त्यांच्या गाडीतून त्याला घेऊन येत आहेत. त्यामुळे दहशत कोणी केली शांतपणे अभ्यास करा, हाणामारी करण्यासाठी चार हजार लोक कोणी बोलावले? असा सवाल महेश शिंदेंनी केला. कामेश कांबळे फडणवीसांना भेटले : महेश शिंदे राष्ट्रवादीचे सदस्य कामेश कांबळे दोन दिवस आधी देवेंद्र फडणवीस यांना भेटून आम्ही तुमच्या सोबत आहोत. मी शिवेंद्रराजेंचा कार्यकर्ता आहे हे सांगून आले होते. त्यांना कामेश कांबळे म्हणाले होते मला महायुतीमध्ये राहायचे आहे. महाविकास आघाडीमध्ये नाही जायचे. हे मुख्यमंत्र्यांसमोर मुंबईमध्ये सांगितले असल्याचा दावा देखील यावेळी आमदार महेश शिंदे यांनी केला. आम्ही कुणाला डांबून ठेवले होते का? राष्ट्रवादीच्या उमेदवार कामेश कांबळेला किडनॅप त्यांनीच केले. आम्ही कुणाला डांबून ठेवले होते का? प्रश्न देखील महेश शिंदे यांनी उपस्थित केला. चोराच्या उलट्या बोंबा तुम्हाला तुमच्या सदस्यांवर विश्वास होता, तर जिल्ह्यातून चार हजार लोक कशासाठी बोलावले. आमच्या सदस्यांना कोणी धरून आणले नाही, ना साखळी करून आणले. दबावाखाली कोणाचे सदस्य होते? पोलिसांवर हात कोणी उचलले? नाव न घेता मंत्री शंभूराजे देसाई आणि मंत्री मकरंद पाटील यांनी केले असा आरोप देखील महेश शिंदेंनी केला आहे. ज्या पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला ते पोलिस स्टेशन मंत्री मकरंद पाटील यांच्या मतदारसंघांमध्ये येते, असेही ते म्हणाले. शशिकांत शिंदेंमुळे राष्ट्रवादीचे उमेदवार फुटले शशिकांत शिंदे जिथे जातात तिथे त्यांचा शेवटच होतो. आजपर्यंत तुम्ही बघितला आहे. जिथे ते गेले गुलाल उधळला तिथे बुक्का तयार झाला आहे. काल सुद्धा तसेच झाले. शशिकांत शिंदे आले नसते तर इतरांचे भले झाले असते. महाविकास आघाडीबरोबर जायचे नाही हे सगळ्यांचे ठरले होते. राष्ट्रवादीचे उमेदवार फुटले ते शशिकांत शिंदे यांच्या येण्यामुळे फुटले, असे मोठे विधान महेश शिंदे यांनी केले. मी महायुतीचा : महेश शिंदे मला एकनाथ शिंदे यांनी बोलवून माझ्या भूमिकेबद्दल विचारले होते. तेव्हा मी त्यांना स्पष्ट केले होते की मी भाजपबरोबर लढलो आहे. आमची प्रीपोल अलायन्स भाजपबरोबर आहे. दुसऱ्या पक्षाबरोबर आम्ही अलायन्स करण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांनी आम्हाला फार किंमत दिली नाही. त्यानंतर मी तीन चार वेळा साहेबांना भेटायचा प्रयत्न केला, पण भेट होऊ शकले नाही. या सगळ्या प्रक्रियेमध्ये मिठाचा खडा पालकमंत्र्यांनी का टाकून घेतला हे त्यांचे चुकले. जर मिठाचा खडा म्हणजे शशिकांत शिंदे या प्रक्रियेत आले नसते, तर राष्ट्रवादीचे पाच सदस्य आमच्याकडे आले ते आले नसते, असे महेश शिंदे यांनी सांगितले. जिल्हा बँकेची निवडणूक भाजपसोबत लढवणार सातारा जिल्हा बँकेची निवडणूक होत आहे. ही निवडणूक वरिष्ठ नेत्यांनी महायुतीच्या माध्यमातून लढवावी असे स्पष्ट केलेले आहे. मी ही निवडणूक महायुतीच्या माध्यमातून लढणार आहे. ज्याला बरोबर यायचे त्यांनी या नाहीतर नाही. माझा प्रीपोल अलायन्स भाजपबरोबर आहे. त्यामुळे आम्ही भाजपबरोबर जाऊनच ही निवडणूक लढणार, यात काही शंका नाही, असे महेश शिंदे म्हणाले.

Doonited Affiliated: Syndicate News Hunt

This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.

Source link

Related posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Uttarakhand News Doonited
Social media & sharing icons powered by UltimatelySocial
Instagram
WhatsApp