digital products downloads

कोलकातामध्ये निवडणूक आयोगाच्या कार्यालयाबाहेर भाजप-टीएमसी कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी: ममतांचा आरोप- भाजपने बंगालमध्ये अवैध मतदारांची नावे जोडण्याचा प्रयत्न केला

कोलकातामध्ये निवडणूक आयोगाच्या कार्यालयाबाहेर भाजप-टीएमसी कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी:  ममतांचा आरोप- भाजपने बंगालमध्ये अवैध मतदारांची नावे जोडण्याचा प्रयत्न केला



कोलकाता येथे निवडणूक आयोग कार्यालयाबाहेर (ECO) मंगळवारी भाजप आणि टीएमसी कार्यकर्त्यांमध्ये संघर्ष झाला. पोलिसांच्या माहितीनुसार, टीएमसी-समर्थित बूथ लेव्हल अधिकाऱ्यांचा (BLOs) एक गट मतदार यादीतील फेरफाराविरोधात निदर्शने करत होता. यावेळी त्यांनी सुरक्षा दलांवर दगडफेक केली. यामुळे तेथे उभ्या असलेल्या वाहनांचेही नुकसान झाले. नंतर भाजपचे कार्यकर्तेही तेथे झेंडे घेऊन पोहोचले. त्यानंतर टीएमसीच्या आंदोलकांची पोलिस आणि भाजप कार्यकर्त्यांशी झटापट झाली. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी सौम्य बळाचा वापर करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. दरम्यान, बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आरोप केला की, भाजप बिहार, उत्तर प्रदेशातील अवैध मतदारांना बंगालच्या मतदार यादीत समाविष्ट करण्याचा प्रयत्न करत आहे. ममता बॅनर्जी यांनी X वरील एका पोस्टमध्ये म्हटले आहे की, भाजपच्या एजंटना बंगालच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांच्या कार्यालयात हजारो बनावट फॉर्म 6 अर्ज जमा करताना रंगेहाथ पकडण्यात आले आहे. हा मतदार हायजॅक करण्याचा प्रयत्न आहे. निवडणुकीशी संबंधित अपडेट्स

Doonited Affiliated: Syndicate News Hunt

This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.

Source link

Related posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Uttarakhand News Doonited
Social media & sharing icons powered by UltimatelySocial
Instagram
WhatsApp