digital products downloads

कोल्हापुरात शरद पवारांना धक्का: समरजित घाटगे यांचा पुन्हा ‘कमळ’ हाती घेण्याचा निर्णय, 8 एप्रिलला होणार पक्षप्रवेश – Kolhapur News

कोल्हापुरात शरद पवारांना धक्का:  समरजित घाटगे यांचा पुन्हा ‘कमळ’ हाती घेण्याचा निर्णय, 8 एप्रिलला होणार पक्षप्रवेश – Kolhapur News


राज्यातील राजकारणात पुन्हा एकदा मोठी उलथापालथ पाहायला मिळत आहे. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपला रामराम ठोकून शरद पवारांच्या राष्ट्रवादीत (NCP-SP) प्रवेश केलेले समरजीत घाटगे आता पुन्हा एकदा ‘स्वगृही’ परतणार आहेत. येत्या ८ एप्रिल रोजी मुंबईतील भाज

.

मिळालेल्या माहितीनुसार, समरजीत घाटगे यांचा भाजप प्रवेश निश्चित झाला आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा पार पडेल. विधानसभा निवडणुकीत भाजपकडून उमेदवारी न मिळाल्याने घाटगे यांनी शेवटच्या क्षणी शरद पवारांच्या पक्षात प्रवेश करून निवडणूक लढवली होती. मात्र, आता पुन्हा एकदा आपण स्वगृही परतणार असल्याचे स्वतः समरजित घाटगे यांनी सांगितले आहे.

नेमके काय म्हणाले समरजित घाटगे?

समरजीत घाटगे म्हणाले, “भाजप प्रवेशाची चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून प्रलंबित होती. विशेषतः नगरपालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकीत आमचे अनेक कार्यकर्ते भाजपच्या चिन्हावर निवडून आले आहेत. त्यामुळे कार्यकर्त्यांच्या भविष्याचा विचार करून आणि प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण तसेच चंद्रकांत दादांशी चर्चा करून मी हा निर्णय घेतला आहे. आपल्या मूळ पक्षात परत आल्याचे मला मोठे समाधान आणि अभिमान वाटत आहे.”

फडणवीसांचे ‘थोरले बंधू’ म्हणून संबोधन

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी असलेल्या जिव्हाळ्याच्या संबंधांचा उल्लेख करताना समरजित घाटगे म्हणाले. “देवेंद्र फडणवीस हे माझ्यासाठी केवळ नेते नाहीत, तर ते माझ्या थोरल्या भावासारखे आहेत. पक्षातून बाहेर पडल्यानंतरही मी नेहमीच त्यांच्या मार्गदर्शनाचा उल्लेख केला आहे. पुन्हा एकदा त्यांच्या नेतृत्वात काम करण्याची संधी मिळत आहे, ही माझ्यासाठी आनंदाची बाब आहे,” असेही त्यांनी नमूद केले.

शरद पवारांना भेटूनच घेतला निर्णय

पक्ष सोडताना कोणतीही कटुता ठेवणार नसल्याचे संकेत देत समरजित घाटगे यांनी सांगितले की, “मी डिसेंबर महिन्यातच ज्येष्ठ नेते शरद पवार यांची भेट घेतली होती. महापालिका निवडणुकीनंतर मी माझी स्पष्ट भूमिका त्यांना मांडली होती. शरद पवारांना पूर्वकल्पना देऊनच मी ही पुढची पावले उचलली आहेत.”

राजकीय परिणाम

समरजीत घाटगे यांच्या भाजप प्रवेशामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील भाजपची ताकद पुन्हा एकदा वाढणार आहे. कागल विधानसभा मतदारसंघात आणि जिल्हा परिषदेच्या राजकारणात घाटगे यांची मोठी पकड असून, त्यांच्या घरवापसीमुळे महाविकास आघाडीला, विशेषतः शरद पवार गटाला मोठा धक्का बसल्याचे मानले जात आहे.

Doonited Affiliated: Syndicate News Hunt

This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.

Source link

Related posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Uttarakhand News Doonited
Social media & sharing icons powered by UltimatelySocial
Instagram
WhatsApp