
सध्या सगळीकडे दिवाळीचं वातावरण आहे. एक उत्साह आणि मंगल वातावरण असताना नागपूरात मात्र शोककळा पसरली आहे. नागपूर जिल्ह्यातील भिवापूर मध्ये क्रिकेट खेळताना एका 13 वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. प्रणव आगलावे असे 13 वर्षीय मुलाचे नाव आहे.
बुधवारी संध्याकाळी मित्रांसोबत मैदानावर क्रिकेट खेळताना हातातली बॅट प्रणवच्या पोटाखालील भागात लागली. गु्प्तांगाला बॅट लागल्यामुळे प्रणव वेदनेने विव्हळत खाली कोसळला. मित्रांनी त्याला प्रथमोपचार देण्याचा प्रयत्न केला. जवळच्या लोकांनी त्याला रुग्णालयातही नेले. मात्र रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता.
दोन महिन्यांपूर्वी गमावले पिता
धक्कादायक बाब म्हणजे मुलाच्या निधनाच्या दोन महिन्यांआधी त्याच्या वडिलांचं देखील निधन झालं. एकाच घरात दोन महिन्यात दोन जणांचा मृत्यू… फार दुःखद घटना आहे. वडील आणि मुलाच्या निधनानंतर परिसरातील लोकांनी देखील दुःख व्यक्त केलं आहे. क्रिकेट खेळत असताना बॅट गु्प्तांगाला लागून 14 वर्षीय प्रणव अनिल आगलावे या मुलाचा मृत्यू झाला आहे. अवघ्या 14 वर्षांच्या मुलाचं निधन झाल्यामुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
प्रणव कोसळल्याचे पाहताच त्याच्या मित्रांनी कोणतीही वेळ न दवडता त्याला तात्काळ जवळच्या रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर प्रणवला मृत घोषित केले. अचानक झालेल्या या घटनेमुळे क्रिकेट खेळणाऱ्या मित्रांना आणि भिवापूर परिसरातील नागरिकांना मोठा धक्का बसला.
दोन महिन्यांत कुटुंबावर दुहेरी आघात
प्रणव आगलावे हा भिवापूर येथील राष्ट्रीय विद्यालयात नववीत शिकत होता. त्याचे वडील अनिल आगलावे यांचं दोन महिन्यांपूर्वी अकाली निधन झालं होतं. वडिलांच्या जाण्याचे दुःख ताजं असतानाच, आता प्रणवचाही दुर्दैवी पद्धतीने मृत्यू झाला आहे. यामुळे आगलावे कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. एकाच कुटुंबातील पिता-पुत्राच्या अकाली निधनामुळे भिवापूर परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
FAQ
प्रणव आगलावे यांच्याबाबत थोडक्यात माहिती काय?
प्रणव अनिल आगलावे हे 13 वर्षांचे विद्यार्थी होते. ते भिवापूर येथील राष्ट्रीय विद्यालयात इयत्ता नववीत शिकत होते.
अपघात कधी आणि कुठे घडला?
अपघात 15 ऑक्टोबर2025 (बुधवार) रोजी संध्याकाळी सुमारे ५ वाजता भिवापूर महाविद्यालयाच्या मैदानावर घडला. प्रणव हे मित्रांसोबत क्रिकेट खेळत होते.
अपघात कसा घडला आणि मृत्यूचे कारण काय होते?
क्रिकेट खेळताना चेंडू प्रणव याच्या संवेदनशील भागाला (लघवीच्या नाजूक भागाला) जोरात लागला. यामुळे ते जमिनीवर कोसळले आणि गंभीर आंतरिक दुखापती झाल्या.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.