
Accident News : अपघाताच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत. जुन्या मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्गावर बोरघाटातील खंडाळा घाटात चढावर मोठे पाईप वाहून नेणाऱ्या ट्रकला अचानक ब्रेक लागला, ज्यामुळे ट्रकमधील पाईप धक्क्याने मागे घसरून दुचाकी आणि एका चारचाकी वाहनावर चढले. शनिवारी सायंकाळी हा भीषण अपघात झाला जो खंडाळा घाटातील मॅजिक पॉइंट येथे घडला. या अपघातात दोन महिलांचा जागीच मृत्यू झाला असून पाच जण गंभीर जखमी झाली आहेत. शनिवारी सायंकाळी या अपघातामुळे काहीकाळ वाहतूक ठप्प झाली होती.
अपघातात 2 मृत्यू तर 5 गंभीर जखमी :
खंडाळा येथे झालेल्या भीषण अपघातात 26 वर्षीय ऋतुजा चव्हाण आणि 28 वर्षीय अंकिता शिंदे यांचा मृत्यू झाला. तर वैभव गलांडे (29), सोनाली खडेत्रे (33), शिवराज खडेत्रे (6), लता शिंदे (50), ललित शिंदे (30) इत्यादी जखमी झाले आहेत.
कसा झाला अपघात?
खोपोली पोलिसांच्या माहितीनुसार, जुन्या मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्गावरून खोपोलीहून खंडाळा घाटातून पुण्याकडे चाललेल्या ट्रकच्या चालकाने घाट चढत असताना अचानक ब्रेक मारला. त्यामुळे ट्रकमधील लोखंडी पाइप ट्रकमधून निसटले आणि ते मागून येत असलेल्या कार आणि दुचाकीवर पडले. या अपघातात दुचाकीवरील ऋतुजा यांचा मृत्यू झाला तर मागे बसलेले वैभव गलांडे वाचले. तर कारमध्ये बसलेल्या अंकिता शिंदेंना सुद्धा जीव गमवावा लागला. तर कारमधील इतर प्रवासी जखमी झाले.
पाइपखाली अडकलेल्या लोकांना काढताना दमछाक :
खंडाळा घाटातील अपघाताची माहिती मिळताच दस्तुरी (बोरघाट) महामार्ग सहायक पोलिस निरीक्षक स्वप्नील पाटील, खोपोली पोलिस निरीक्षक सचिन हिरे, सहायक पोलिस निरीक्षक ठाकरे व हवालदार अमोल धायगुडे यांनी सहकाऱ्यांसह; तसेच देवदूत आपत्कालीन पथक, आयआरबी पेट्रोलिंग, ‘डेल्टा फोर्स’चे कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेतली. अपघातात पाईप खाली अडकलेल्या महिलांना बाहेर काढताना दमछाक झाली. अपघात इतका भीषण होता की दोन महिलांचा जागीच मृत्यू झाला. तर उर्वरित जखमी प्रवाशांना रुग्णालयात नेण्यात आले. अपघाताबाबत पुढील तपास केला जाईल अशी माहिती खोपोली पोलिस ठाण्याचे पोलिस हवालदार अमोल धायगुडे यांनी दिली.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.