
केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री अमित शहा यांनी अप्रत्यक्षपणे उद्धव ठाकरे आणि काँग्रेसवर निशाणा साधला आहे. “खरी शिवसेना एकनाथ शिंदेंची आहे, हे त्यांनी दाखवून दिले आहे,” असे अमित शहांनी म्हटले. त्याचबरोबर, मुंबईवर अनेक वर्षे राज्य करणाऱ्यांनी शहरास
.
उद्धव ठाकरे यांनी पक्षाच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात बोलताना अमित शाह आणि भाजपवर जोरदार टीका केली होती. देशाला गृहमंत्र्यांची गरज आहे. घरफोड्या अमित शाहची नाही, अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी अमित शहांवर निशाणा साधला होता. या टीकेला अमित शाह यांनी प्रत्युत्तर दिले आहे. त्यांनी मुंबईसह महाराष्ट्राच्या विकासावर बोलताना विरोधी पक्षांवर टीका केली. महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अँड अॅग्रिकल्चर (MACCIA) च्या नवनिर्मित मुख्यालयाच्या इमारतीचे आणि मुंबईत राज्यस्तरीय सहकारी औद्योगिक परिषदेचे उद्घाटन अमित शाह यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते.
नेमके काय म्हणाले अमित शहा?
अमित शहा यांनी महाविकास आघाडी सरकारच्या मुंबईतील विकासकामांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. “महायुती सरकारने अटल सेतू, वरळी सी लिंक, कोस्टल रोडसारखे अनेक मोठे प्रकल्प यशस्वी केले आहेत. परंतु, तुम्ही सरकारमध्ये एवढा काळ होता, तेव्हा तुम्ही मुंबईसाठी काय केले?” असा सवाल त्यांनी केला. आधीच्या सरकारला महाराष्ट्रात उद्योगधंद्यांना चालना देता आली असती, परंतु त्यांनी काही केले नाही, असा आरोपही शहा यांनी केला.
सध्याच्या ‘डबल इंजिन’ सरकारचे कौतुक करताना अमित शहा म्ह’डबल इंजिन’ सरकारचे कौतुकणाले की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राला विकासाच्या दिशेने नेण्याचे चांगले काम करत आहेत. मुंबईतील झोपडपट्ट्या, धारावी आणि वाहतूक कोंडीच्या प्रश्नांवरून विरोधक टीका करत असले तरी, ही कामे त्यांनाही करता आली असती. त्यांनी न केल्यामुळे ती करण्याची वेळ आमच्यावर आली आहे, असे शहा यांनी नमूद केले.
देशातील सगळ्यात मोठी अर्थव्यवस्था महाराष्ट्राची
देशातील सगळ्यात मोठी अर्थव्यवस्था महाराष्ट्राची आहे. एफडीआयमध्ये सगळ्यात जास्त हिस्सा महाराष्ट्रात आहे. सगळ्यात जास्त विदेशी पर्यटक महाराष्ट्रात, सगळ्यात जास्त स्टार्टअप महाराष्ट्रात जास्त असल्याचे अमित शहा म्हणाले. भारताचे सगळ्यात मोठे बंदर वाडवनमध्ये तयार होत आहे. येणाऱ्या काळात मुंबईचे काय होणार याची मला चिंता होती. कारण वाढत लोकसंख्या असेल, वाढती झोपडपट्टी, ट्रॅफिकची समस्या होती. पण मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अभिनंदन करेल असे अमित शहा म्हणाले.
मुंबईत आरबीआयचे मुख्यालय, शेअर मार्केट आणि सेबीचे मुख्यालय आहे. मोठमोठे आणि महत्त्वाची कार्यालयं ही मुंबईत आहेत. आज महाराष्ट्र चेंबर कॉमर्स या मुख्यालयाचे उद्घाटन होतंय. यांच्याकडून भविष्यात पुढील शंभर वर्ष चांगले कार्य घडावं, यासाठी मी शुभेच्छा देतो”, असं अमित शहा यावेळी म्हणाले.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.