
Smuggling of Wild Cats: दुर्मिळ खवल्या मांजराची जालन्यात मोठ्या प्रमाणात तस्करी सुरूये.आणि पोलिस तपासात तस्करीचं आता म्यानमार कनेक्शन उघड झालंय.याप्रकरणी पोलिसांनी 6 आरोपींना अटक केली असून तस्करीबाबत सखोल तपास केला जातोय.
दुर्मिळ खवल्या मांजरांची राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठ्या प्रमाणात तस्करी होते. अशीच तस्करी आता जालना जिल्ह्यातही झाली. जालन्यात वन विभागाने मार्च महिन्यात खवल्या मांजराची तस्करी करणाऱ्या 6 जणांना अटक केली होती. या प्रकरणाच्या तपासात खवल्या मांजराची चीन,व्हिएतनाम,थायलंडमध्ये तस्करी होत असल्याची माहिती समोर आलीय.त्यामुळे वन विभाग आता सतर्क झालं असून वेगाने तपास सुरूये.
खवल्या मांजराला इतकं महत्व का?
चिनी आणि व्हिएतनामी औषधांसाठी खवल्यांना मोठी मागणी असते. विदर्भ, मराठवाड्यातील शिकारी 40 हजारांत खवल्या मांजराच्या खवल्यांची विक्री केली जाते. गुजरात, ओडिशा येथील दलालांमार्फत चीन, म्यानमार, व्हिएतनाम इथे खवल्या मांजरांचे अवशेष पाठवले जातात.खवल्या मांजरांच्या अवशेषांची किंमत सुमारे 30 लाखांपर्यंत जाते. गेल्या 4 वर्षात राज्यात 137 खवल्या मांजरांची तस्करी केली जाते. वन पथकाने संशयित वाशीम जिल्ह्यातील गिरोली येथील अयुब खान मिरादाद खान याच्या घराजवळ पुरलेले मृत खवले मांजर जप्त केलंय. दरम्यान याच्या संपर्कातील एजंटचा वन विभागाकडून शोध घेतला जातोय. खवल्या मांजराला इतकं महत्व का जाणून घेऊयात.
खवल्या मांजराचा कशासाठी वापर?
खवल्या मांजराचा वापर काळ्या जादूसाठी केली जातो. खवल्या मांजरचे मांस हे प्रथिनांनी समृद्ध असल्याचं मानलं जातं. त्यामुळे मांस महाग किमतीत विकले जातं.खवल्या मांजर वाळवी, मुंग्या फस्त करतात, याला नैसर्गिक पेस्ट कंट्रोल म्हंटल जातं. जगातील सर्वात जास्त तस्करी केला जाणार सस्तन प्राणी आहे. जगात खवले मांजराच्या आठ प्रजाती असून त्यातील दोन प्रजाती भारतात आढळतात.
दलालांना लगाम लावण्याची गरज
खरंतर वन्यजीव संरक्षण कायद्यानुसार खवल्या मांजराची शिकार, विक्री आणि वाहतूक करणं कायद्याने गुन्हा आहे. यात दोषी आढळल्यास 7 वर्षांची शिक्षा होते. मात्र 40 ते 50 हजारांसाठी गावो-गावी आता खवल्या मांजराची तस्करी करणाऱ्या दलालांच्या संख्येत वाढ होतेय.त्यामुळ या दलालांना लगाम लावण्याची आता गरज आहे.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.