
खापा शहरात रविवारी दिवसाढवळ्या एका तरुणाची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. या घटनेने खापा शहर हादरले असून आठ वर्ष जुन्या वादातून आरोपीने फिल्मीस्टाइल पाठलाग करून हा गोळीबार केला आहे. चेतन अशोक गागटे (३१, रा. हनुमान घाट, खापा) हे मृतकाचे नाव असून अर्ज
.
पोलिसांच्या माहितीनुसार, मृतक चेतन गागटे खापा शहरातील गांधी पुतळ्या जवळील एका पान स्टॉलवर बसला होता. त्यादरम्यान, दुचाकीवरून आलेल्या आरोपी अर्जुन निळेने त्याला बघितले. आरोपी अर्जुन लगेच आपल्या दुचाकीवरून उतरला आणि त्याने चेतनचा पाठलाग सुरू केला. त्यावेळी आरोपीने गांधी पुतळ्याजवळ पहिली गोळी झाडली. मात्र ती चुकली. त्यानंतरही चेतनचा पाठलाग सुरूच होता. आरोपीने बोंद्रे येथील सरकारी धान्य दुकानाजवळ दुसरी गोळी झाडली. ती सुद्धा चुकली.आपला जीव वाचविण्यासाठी मृतक चेतन एका अरुंद गल्लीत पळाला. तिथे अडखळून खाली पडला. याच संधीचा फायदा घेत आरोपी अर्जुनने चेतनवर तिसरी गोळी झाडली. ती थेट छातीत आरपार शिरल्याने तो गंभीर जखमी झाला. आरोपी तिथेच थांबला नाही. त्याने चौथी गोळी चालविण्याचा प्रयत्न केला. पण ट्रिगर अडखळले.
गोळीबारानंतर जखमी चेतनला त्याच्या भावाने तत्काळ वाहनातून नागपुरातील खासगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले.गोळीबार केल्यानंतर आरोपी अर्जुन तेथून थेट खापा पोलीस ठाण्यात गेला आणि त्याने स्वत:ला पोलिसांच्या स्वाधीन केले. या प्रकरणी खापा पोलिसांनी आरोपी अर्जुनला अटक केली असून घटनास्थळी अतिरिक्त पोलीस अधीक्षक रमेश धुमाळ, सावनेर उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल मस्के यांनी भेट दिली.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.