
Ganesotsav 2025: राज्यात बाप्पाचे आगमन झाले आहे. अनेकांच्या घरी आज बाप्पा विराजमान झाले आहे. सार्वजनिक मंडळातही बाप्पाची प्राणप्रतिष्ठा पार पडली आहे. राज्यात सर्वत्र गणेशोत्सवाची धूम पाहायला मिळत आहे. झी 24 तासनं देखील बाप्पाच्या आगमनाची खास तयारी केली आहे. राज्यभरातील गणेशोत्सव प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे. बाप्पाची आरती ते राज्याच्या कानाकोपऱ्यातील देखावे, प्रेक्षकांसाठी स्पर्धा, अशा कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
झी 24तासच्या कार्यक्रमांचे वेळापत्रक
1) श्री गणेश आरती- प्रसिद्ध मंडळाच्या गणरायाची आरती खास प्रेक्षकापर्यंत पोहोचवण्याची व्यवस्था झी 24 तासने केली आहे.
वेळ- 6-48 Am ते 7 AM
2) ग्लोबल बाप्पा- भारतासह जगभरातील गणेशोत्सवाचे खास प्रक्षेपण
वेळ- 1.30 PM -2PM
3) झी 24 तास सुखकर्ता- राज्यातभरातील गणेशोत्वसाच्या ठळक घडामोडी आणि वार्तांकन
वेळ- 7.30 AM ते 8 AM
4) घरगुती गणेश स्पर्धा- झी 24 तासने राज्यातील प्रेक्षकांना घरच्या बाप्पाचे फोटो किंवा व्हिडिओ पाठवण्याची स्पर्धा आयोजित केली आहे.
वेळ- 1.30 AM ते 2 PM
5) मी आणि बाप्पा- बाप्पाचे भाविकांसाठी असलेले महत्त्व व बाप्पाविषयी प्रेक्षकांना काय वाटते, त्यांच्या भावना थोडक्यात झी 24 ताससमोर मांडता येणार आहेत.
वेळ- 5.30 PM ते 6 PM
6) गावाकडचा बाप्पा- महाराष्ट्रातील गावाकडच्या बाप्पाची एक झलक
वेळ- 7.30 PM ते 8 PM
7) झी 24 तास सुखकर्ता- राज्यातभरातील गणेशोत्वसाच्या ठळक घडामोडी आणि वार्तांकन
वेळ- 6.30 PM ते 7 PM
8) पुढच्या वर्षी लवकर याः अनंत चतुर्दशीचे खास कव्हरेज
वेळ- 7 PM ते 11 PM
झी 24 तास सुखकर्ताः बाप्पाची तयारी, बाप्पाची सजावट याचे लाइव्ह कव्हरेज
वेळ- 10.30 Am ते 11 AM
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.