digital products downloads

गतिमंद मुलीस चॉकलेटचे अमिष दाखवून अत्याचार: कळमनुरी तालुक्यातील घटना, आरोपीच्या विरोधात गुन्हा दाखल – Hingoli News

गतिमंद मुलीस चॉकलेटचे अमिष दाखवून अत्याचार:  कळमनुरी तालुक्यातील घटना, आरोपीच्या विरोधात गुन्हा दाखल – Hingoli News



कळमनुरी तालुक्यातील एका गावामध्ये गतिमंद अल्पवयीन मुलीस चॉकलेट व पैशाचे अमिष दाखवून अत्याचार करणाऱ्या 69 वर्षीय जेष्ठ व्यक्तीवर कळमनुरी पोलीस ठाण्यात शुक्रवारी ता 30 रात्री गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कळमनुरी तालुक्यातील एका गावामध्ये एक कुटुंब शेतात रोज मजुरी करून उदरनिर्वाह करते. या कुटुंबातील नऊवर्षीय गतिमंद मुलगी शिक्षणासाठी शाळेत जाते. नेहमीप्रमाणे सदर मुलगी बुधवारी तारीख 28 सकाळी दहा वाजता शाळेत जाण्यासाठी निघाली होती. यावेळी गावातील संतुकराव आवटे या व्यक्तीने ती मुलगी एकटी शाळेत जात असलेली बघितली. यावेळी त्यांनी मुलीस चॉकलेटचे व पैशाचे आमिष दाखवून त्याच्या घरी नेले. त्यानंतर त्याने मुलीस चॉकलेट खाण्यासाठी दिले. त्यानंतर त्याने मुलीवर अत्याचार केला. दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास सदर मुलगी घरी आल्यानंतर तिने रडण्यास सुरुवात केली. यावेळी मुलीच्या आईने रडण्याचे कारण विचारले असता तिने घडलेला सर्व प्रकार आईला सांगितला. यामुळे घाबरलेल्या तिच्या आईने तातडीने शेतातून वडिलांना बोलवून घेतले तसेच बाहेरगावी राहत असलेल्या भावाला बोलून सर्व प्रकार सांगितला. त्यानंतर त्यांनी आज रात्री कळमनुरी पोलीस ठाणे गाठून रितसर तक्रार दाखल केली. त्या मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून कळमनुरी पोलिसांनी संतुकराव आवटे यांच्याविरुद्ध बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदे अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. कळमनुरी पोलीस ठाण्याचे निरीक्षक प्रेमकुमार माकोडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रेमलता जगताप यांच्या पथकाने पुढील तपास सुरू केला आहे.

Doonited Affiliated: Syndicate News Hunt

This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.

Source link

Related posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Uttarakhand News Doonited
Social media & sharing icons powered by UltimatelySocial
Instagram
WhatsApp