digital products downloads

गावभर पेढे वाटा! शेतकऱ्याचा मुलगा अमेरिकेत घेणार 84 लाखांचं पॅकेज! संपूर्ण भारतातून एकटाच…

गावभर पेढे वाटा! शेतकऱ्याचा मुलगा अमेरिकेत घेणार 84 लाखांचं पॅकेज! संपूर्ण भारतातून एकटाच…

Jaypal Shirade Success Story: परिस्थितीवर मात करु यशस्वी झालेल्या अनेक कहाण्या आपण ऐकल्या असतील. पण कहाणी जेव्हा शेतकरी कुटुंबातील असते तेव्हा तिचा आनंद आणखी असतो. कारण दुष्काळ असो किंवा अतिवृष्टी, नेहमी संकटात असलेल्या शेतकऱ्याला काबाड कष्ट चुकले नाहीत. मेहनत ही त्यांच्या पाचवीला पुजलीय. नांदेड जिल्ह्यातील नायगाव तालुक्यातील मंदाकिनी नदी च्या काठावर वसलेल्या लहानशा तकबीड गावात जन्मलेला जयपाल शिरदेची अशीच कहाणी आहे. साध्या शेतकरी कुटुंबातील हा तरुण आता अमेरिकेत 84 लाखांचं पॅकेज घेणार आहे. शेतकरी पुत्राला हे कसं शक्य झालं? जाणून घेऊया. 

Add Zee News as a Preferred Source

अतिवृष्टी आणि महापुरामुळे शेतीचे नुकसान

गणेश शिरदे हे पाच एकर कोरडवाहू जमिनीवर अवलंबून असलेले शेतकरी आहेत. ज्यात धान्य आणि तृणधान्याची लागवड करून कुटुंब चालवतात. तीन भावंडांच्या घरात जयपालने बालपणापासूनच शेतीच्या कष्टांचा अनुभव घेतला. मात्र, अतिवृष्टी आणि महापुरामुळे गेल्या काही महिन्यांत जिल्ह्यातील शेतीचे मोठे नुकसान झाले असून, शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर निराशेची सावली पसरली. अशा विपरीतीच्या वातावरणात जयपालने मात्र शिक्षणाच्या माध्यमातून स्वतःला घडवले आणि कुटुंबाच्या आर्थिक संकटाला तोंड देण्याचा निर्धार केला. त्याच्या या दृढनिश्चयाने गावकऱ्यांमध्ये आशेचा प्रकाश पसरला आहे.

कुठे घेतले शिक्षण?

जयपालचे प्राथमिक शिक्षण गावातील जिल्हा परिषद शाळेत झाले, जेथे साध्या साधनांमध्येच त्याने ज्ञानाची पायाभरणी केली. माध्यमिक स्तरावर लातूर येथील परिमल महाविद्यालयात प्रवेश घेतला, जेथे विज्ञान शाखेत उत्कृष्ट गुण मिळवले. 2021 मध्ये जळगाव येथील सरकारी अभियांत्रिकी महाविद्यालयातून बी.टेक पदवी प्राप्त केली, ज्यात ऑटोमेशन आणि सॉफ्टवेअर इंजिनिअरिंगवर विशेष लक्ष केंद्रित केले. पदवी मिळाल्यानंतर भारतातील एका अग्रगण्य ऑटोमेशन फर्ममध्ये नोकरी सुरू केली, परंतु त्याचे मन विदेशी संधींकडे वळले. दिवरात्र अभ्यास, ऑनलाइन कोर्सेस आणि व्यावहारिक कौशल्ये विकसित करत त्याने स्वतःला तयार केले. ही मेहनतच त्याच्या यशाची गुरुकिल्ली ठरली, जी शेतकरी पिढ्यांसाठी एक आदर्श उदाहरण आहे.

महाराष्ट्रातील प्रतिभावान तरुणांना प्रेरणा

काही दिवसांपूर्वी चेन्नई येथे आयोजित हनवेल ऑटोमेशन कंपनीच्या भरती प्रक्रियेत जयपालचा सहभाग होता. टेक्सास राज्यातील डलास मुख्यालय असलेली ही जागतिक स्तरावरील सॉफ्टवेअर व ऑटोमेशन कंपनीने देशभरातून शेकडो अभियंत्यांना बोलावले. कठोर लेखी परीक्षा, तांत्रिक चर्चा आणि वैयक्तिक मुलाखतींच्या तीन टप्प्यांनंतर जयपाल एकमेव निवडलेला उमेदवार ठरला. या यशाने त्याच्या कुटुंबात आनंदाची लहर उसळली. कंपनीच्या अधिकाऱ्यांनी त्याच्या तांत्रिक कौशल्ये आणि समस्या सोडवण्याच्या क्षमतेचे कौतुक केले. ही निवड केवळ वैयक्तिक विजय नसून, महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातील प्रतिभावान तरुणांना प्रेरणा देणारी घटना आहे.

अमेरिकेतून आले ऑफर लेटर 

जयपालला अमेरिकेत महिन्याला 7013 डॉलर्सचे ऑफर लेटर मिळाले आहे, जे भारतीय चलनात सुमारे सात लाख रुपयांच्या घरात येते. वार्षिक पॅकेज 84 लाखांपर्यंत पोहोचेल, ज्यात निवास, विमा आणि इतर सुविधा समाविष्ट आहेत. डलास येथे ऑक्टोबरअखेरीस रवाना होणार असलेल्या जयपालने सांगितले की, हा पगार कुटुंबाच्या आर्थिक स्थैर्यासाठी आणि गावातील इतर तरुणांसाठी शिष्यवृत्ती निधी उभारण्यासाठी वापरेल. त्याच्या या निर्णयाने शेतकऱ्यांमध्ये उत्साह निर्माण झालाय.

‘शेतीचे कष्टच माझ्या यशाचे बीज’

नांदेडसारख्या पूरग्रस्त भागात, जेथे शेतीचे नुकसान शेतकऱ्यांना हताश करत आहे, जयपालची कथा एक प्रेरणा ठरली आहे. त्याने आई-वडिलांच्या त्यागाला सलाम करत म्हटले की, ‘शेतीचे कष्टच माझ्या यशाचे बीज आहेत.’ गावकऱ्यांमध्ये त्याचे स्वागत होत असून, स्थानिक नेते आणि शैक्षणिक संस्था त्याच्या यशाचे अभिनंदन करत आहेत. 

FAQ 

प्रश्न:नांदेडच्या शेतकरी मुलाचे यशप्रश्न: जयपाल शिरदे यांनी कोणती उपलब्धी मिळवली आहे?

उत्तर: नांदेड जिल्ह्यातील नायगाव तालुक्यातील तकबीड गावातील शेतकरी कुटुंबातील जयपाल शिरदे यांनी अमेरिकेतील हनवेल ऑटोमेशन कंपनीत नोकरी मिळवली आहे. चेन्नई येथील देशव्यापी निवड प्रक्रियेत शेकडो उमेदवारांमधून ते एकमेव पात्र ठरले. त्यांना महिन्याला ७,०१३ डॉलर्स (सुमारे ७ लाख रुपये) पगार मिळणार असून, वार्षिक पॅकेज ८४ लाखांपर्यंत आहे.

प्रश्न: जयपाल यांचे शिक्षण आणि पार्श्वभूमी काय आहे?

उत्तर: जयपाल शिरदे यांचे प्राथमिक शिक्षण गावातील जिल्हा परिषद शाळेत, तर माध्यमिक शिक्षण लातूर येथील परिमल महाविद्यालयात झाले. त्यांनी २०२१ मध्ये जळगाव येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातून बी.टेक पदवी प्राप्त केली. शेतकरी कुटुंबातून येऊनही, त्यांनी हालाखीच्या परिस्थितीत शिक्षण पूर्ण केले आणि ऑटोमेशन क्षेत्रात कौशल्य मिळवून विदेशी नोकरीचे स्वप्न साकार केले.

प्रश्न: जयपालच्या यशाचा स्थानिक समाजावर काय परिणाम झाला आहे?

उत्तर: जयपालच्या यशाने नांदेड जिल्ह्यातील पूरग्रस्त आणि शेतीच्या नुकसानाने हताश झालेल्या शेतकरी समाजात आशेचा किरण निर्माण झाला आहे. त्यांच्या यशाने गावकऱ्यांमध्ये उत्साह पसरला असून, तो तरुणांसाठी प्रेरणादायी ठरला आहे. स्थानिक नेते आणि शैक्षणिक संस्थांनी त्यांचे कौतुक केले असून, ग्रामीण तरुणांना शिक्षण आणि मेहनतीद्वारे यश मिळवण्यासाठी प्रोत्साहन मिळाले आहे.

Doonited Affiliated: Syndicate News Hunt

This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.

Source link

Uniq Art Store India

Related posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Uttarakhand News Doonited
Social media & sharing icons powered by UltimatelySocial
Instagram
WhatsApp