digital products downloads

गाेंधळ: पश्चिम बंगालमध्ये मंदिरावर हल्ला झाल्याच्या अफवेने जातीय हिंसा, दक्षिण 24 परगणा जिल्ह्यात महेशतळा येथे 40 जणांना अटक

गाेंधळ:  पश्चिम बंगालमध्ये मंदिरावर हल्ला झाल्याच्या अफवेने जातीय हिंसा, दक्षिण 24 परगणा जिल्ह्यात महेशतळा येथे 40 जणांना अटक

  • Marathi News
  • National
  • 40 Arrested In Maheshtala, South 24 Parganas District, Communal Violence Over Rumours Of Temple Attack In West Bengal

प्रभाकर मणि तिवारी | कोलकाता16 मिनिटांपूर्वी

  • कॉपी लिंक

पश्चिम बंगालमधील दक्षिण २४ परगणा जिल्ह्याच्या महेशतला शहरात बुधवारी दोन समुदायांमध्ये झालेल्या हिंसेनंतर गुरुवारी संपूर्ण परिसरात शांतता पसरली होती. कोलकातापासून सुमारे ५५ किलोमीटर अंतरावर असलेल्या या शहरात भारतीय न्याय संहितेचे कलम १६३ लागू करण्यात आले आहे आणि पोलिस सतत लाउडस्पीकरवरून लोकांना शांतता राखण्याचे आवाहन करत आहेत. दुकाने, बाजार, शाळा आणि सार्वजनिक ठिकाणे पूर्ण बंद आहेत, लोक घरातच थांबले आहेत.

हिंसाचाराची सुरुवात मंगळवारी झाली, जेव्हा वॉर्ड नंबर सातमध्ये मोकळ्या जागेवर एका समुदायाचे लोक दुकान बांधत होते, ज्याला दुसऱ्या समुदायाने विरोध केला. वाद वाढल्यानंतर बांधकाम थांबले. पण नंतर त्या ठिकाणी चबुतरा बांधण्यात आला. बुधवारी या विरोधात निदर्शने झाली. पोलिसांना निवेदन देण्यात आले. त्याचवेळी पोलिस ठाण्याजवळच दोन्ही समुदायांमध्ये झटापट झाली, ज्यात काही पोलिस कर्मचारीही जखमी झाले. या दरम्यान अशी अफवा पसरली की, तोडफोड झाली आहे. यामुळे संपूर्ण परिसरात तणाव वाढला. काही वस्त्यांमध्ये घरे, दुकाने व माेटारसायकली जाळण्यात आल्या. छतावरून दगडफेक झाली, ज्यात महिलांचाही सहभाग असल्याचे सांगितले जात आहे. पोलिसांची स्थानिक टीम परिस्थिती नियंत्रणात आणू शकली नाही आणि कोलकाताहून पाठवलेल्या शीघ्र कृतील दलाच्या जवानांनी स्थितीवर नियंत्रण मिळवले. या हिंसाचारात एका उपायुक्तासह सुमारे डझनभर पोलिस कर्मचारी जखमी झाले, तर ४० लोकांना अटक करण्यात आली आहे.

बंगाल: निवडणुकीचा हंगाम व जातीय तणाव

महेशतला येथील ही घटना पश्चिम बंगालमध्ये निवडणुकांपूर्वी होणाऱ्या जातीय हिंसाचाराच्या जुन्या घटनांची आठवण करून देते. २०२१ च्या विधानसभा निवडणुकीच्या सहा महिने आधीच राज्यात अशा १६ नोंद झाली होती, त्यापैकी सर्वाधिक दक्षिण २४ परगणा, हावडा व मुर्शिदाबाद येथे घडल्या. २०२१ मध्ये एकूण ३० घटनांची नोंद झाली होती, ज्यात हावडा येथील १३ घटनांचा समावेश होता.

एप्रिल २०२५ मध्ये मुर्शिदाबाद जिल्ह्यामध्येही जातीय हिंसाचारामुळे अनेकांना स्थलांतर करावे लागले होते. याची माहिती राष्ट्रीय गुन्हे रेकॉर्ड ब्युरोला दिली जात नाही, त्यामुळे त्यांचे दस्तऐवजीकरण अपूर्ण राहते. यावरून राजकीय पक्ष आरोप-प्रत्यारोप करत आहेत. तृणमूल नेते फिरहाद हकीम यांनी भाजपवर दंगल घडवल्याचा आरोप केला आहे, तर भाजपचे प्रदेश अध्यक्ष सुकांत मजुमदार यांनी ममता बॅनर्जी सरकारच्या अल्पसंख्यांक तुष्टीकरणाच्या धोरणाला जबाबदार धरले आहे.

Doonited Affiliated: Syndicate News Hunt

This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.

Source link

Uniq Art Store India

Related posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Uttarakhand News Doonited
Social media & sharing icons powered by UltimatelySocial
Instagram
WhatsApp