
गुजरातमधून महाराष्ट्रात गुटख्याची तस्करी होत असल्याचा गंभीर आरोप विजय वडेट्टीवारांनी केला आहे. या गुटखा तस्करीत अनेक नेत्यांचा हात असल्याचंही ते म्हणाले आहेत. एकतर गुजरातमधून येणरा गुटखा बंद करा किंवा महाराष्ट्रातील गुटखाबंदी हटवा अशी मागणी त्यांनी केली आहे. त्यांच्या या मागणीवर भाजप नेते अमित साटम यांनी आक्षेप घेतला आहे.
गुजरातमधून महाराष्ट्रात गुटखा तस्करीचा आरोप
गुटखा तस्करीत नेत्यांच्या सहभागाचा विरोधकांचा दावा
कारवाई करा नाहीतर बंदी उठवण्यासाठी मागणी
राज्यातल्या कोणत्याही गावात जा किंवा कोणत्याही शहरात जा…. पानटप-या आणि दुकानांमधून गुटख्याची सर्रास विक्री होत असल्याचं दिसत आहे. महाराष्ट्रात गुटखाबंदी आहे तरीही खुलेआम गुटखाविक्री होत असल्याचं चित्र आहे. काँग्रेस आमदार विजय वडेट्टीवार यांनी राज्यात सर्रास गुटखाविक्री होत असल्याचा आरोप केला आहे. यात काही राजकीय नेत्यांचाही गुटखाविक्रीच्या रॅकेटमध्ये सहभाग असल्याचं वडेट्टीवार यांचं म्हणणं आहे. महाराष्ट्रात गुजरातमधून गुटखा विक्रीसाठी येत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
गुजरात मार्गे कॅन्सर महाराष्ट्रात!
आज महाराष्ट्र विधानसभेत मी राज्यात मोठ्या प्रमाणावर होणाऱ्या बेकायदेशीर गुटखा विक्रीचा मुद्दा उचलला. हा संपूर्ण गुटखा गुजरातमधून महाराष्ट्रात येतो आणि आपल्या तरुण पिढीचे आरोग्य धोक्यात घालतो.
महाराष्ट्रात गुटखा बंदी असतानाही हा व्यवसाय कसा… pic.twitter.com/lQxwSm0K7l
— Vijay Wadettiwar (@VijayWadettiwar) March 21, 2025
गुटखाबंदी उठवा अन्यथा गुटखा विकणा-यावर कठोर कारवाई करा या वडेट्टीवारांच्या मागणीवर सत्ताधा-यांनी तीव्र आक्षेप घेतला आहे. गुटखाबंदी उठवण्याची मागणी करणं म्हणजे गुटखा लॉबीला मदत केल्यासारखं असल्याचा आरोप भाजप आमदार अमित साटम यांनी केला आहे.
गुटख्याचं व्यसन हा विषय गंभीर आहे. गुटख्यावर बंदी आहे. पण ती बंदी कागदावर असल्यासारखं चित्र आहे. लोकप्रतिनिधींनी गुटख्याच्या विषयावर आरोप प्रत्यारोप करण्यापेक्षा गुटखाबंदी कठोरपणे राबवण्यासाठी प्रशासकीय पातळीवर पाठपुरावा करण्याची गरज निर्माण झाली आहे.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.