digital products downloads

गॅस टंचाईवर शेगाव संस्थानची मात!: स्टीम बॉयलरच्या सहाय्याने शिजते अन्न; गजानन महाराजांचा महाप्रसाद अखंड सुरू – Buldhana News

गॅस टंचाईवर शेगाव संस्थानची मात!:  स्टीम बॉयलरच्या सहाय्याने शिजते अन्न; गजानन महाराजांचा महाप्रसाद अखंड सुरू – Buldhana News



इराण, अमेरिका आणि इस्राइलमध्ये सुरू असलेल्या युद्धाचा परिणाम भारतावरही होताना दिसत आहे. अनेक राज्यांमध्ये गॅसची तसेच इंधनाची टंचाई निर्माण झाली आहे. यामुळे मुंबई-पुण्यासारख्या शहरांमध्ये अनेक हॉटेल व खानावळी बंद होण्याच्या मार्गावर आहेत. गॅसची टंचाई निर्माण झाल्याने याचा फटका हॉटेल व्यवसायांना बसत आहे. अशी परिस्थिती असताना शेगावमध्ये दररोज मोठ्या संख्येने होणाऱ्या महाप्रसाद वाटपावर परिणाम झाला नसल्याचे समोर आले आहे. राज्यात संत गजानन महाराजांचे दर्शनासाठी दररोज हजारो भाविक येतात. त्या अनुषंगाने महाप्रसाद वाटप व भोजनाचा लाभ जवळपास 35 हजार लोक दररोज घेत असतात. एवढ्या भाविकांसाठी गॅसचा वापर किती होईल, हे सांगता येणे शक्य नाही. मात्र अन्न हे पुर्णब्रम्ह मानून शेगाव संस्थानच्या वतीने स्टीम बॉयलरचा वापर महाप्रसादासाठी केला आहे. त्यामुळे अन्न हे वाफेवर शिजत असून त्यासाठी लाकडच्या गट्टुचा वापर केल्या जात आहे. या गट्टूची खरेदी वर्षभरातून एकदा केली जाते. गट्टु लाकडाच्या इंधनापेक्षा कमी लागतात. महाप्रसाद निर्मितीपासून तर भोजन वाटपापर्यंत जवळपास अठरा एकर जागा संस्थानची आहे. त्यात गोदामासह स्टीम बॉयरलच्या स्वयंपाक गृहाचा समावेश आहे. या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे लावले असून अद्यावत यंत्रणेद्वारे पोळ्या व भाजी तयार केली जाते. परिस्थिती गंभीर, पर्याय म्हणून केरोसिन वापरा:नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांचा अजब सल्ला आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे निर्माण झालेल्या तणावाचा परिणाम आता महाराष्ट्रातील गॅस पुरवठ्यावर दिसू लागला आहे. व्यावसायिक गॅसचा पुरवठा मोठ्या प्रमाणात कमी झाल्याने हॉटेल व्यावसायिकांची चिंता वाढली आहे. या पार्श्वभूमीवर अनेक हॉटेल व्यावसायिकांनी मदतीसाठी राज्य सरकारकडे धाव घेतली आहे. या संदर्भात राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया देत परिस्थिती गंभीर असल्याचे मान्य केले. मात्र, सध्या जगभरात निर्माण झालेल्या तणावपूर्ण परिस्थितीमुळे गॅस पुरवठ्यावर परिणाम झाला असून त्यावर तातडीने उपाय करणे कठीण असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. वाचा सविस्तर

Doonited Affiliated: Syndicate News Hunt

This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.

Source link

Related posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Uttarakhand News Doonited
Social media & sharing icons powered by UltimatelySocial
Instagram
WhatsApp