digital products downloads

गेट वेल सून देवेंद्र फडणवीस: हर्षवर्धन सपकाळ यांचा मुख्यमंत्र्यांना टोला; म्हणाले – बुद्धी ही विशेष जात वर्गाची मक्तेदारी असा त्यांचा समज – Maharashtra News

गेट वेल सून देवेंद्र फडणवीस:  हर्षवर्धन सपकाळ यांचा मुख्यमंत्र्यांना टोला; म्हणाले – बुद्धी ही विशेष जात वर्गाची मक्तेदारी असा त्यांचा समज – Maharashtra News



काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार पलटवार केला आहे. देवेंद्र फडणवीस मला डोके नाही असे म्हणाले. मला त्याचे आश्चर्य वाटले नाही. कारण, शेकडो वर्षापासून बुद्धी ही विशेष जात वर्गाची मक्तेदारी आहे असा त्यांचा समज आहे, असे ते म्हणालेत. हर्षवर्धन सपकाळ यांनी गडचिरोली येथील पोलादाच्या खाणीवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली होती. त्याला प्रत्युत्तर देताना फडणवीस यांनी त्यांच्यावर तिखट हल्ला केला होता. कुणी बिनडोकपणे बोलले आणि मी त्याला उत्तर दिले, तर मी देखील त्यांच्यासारखाच बिनडोक ठरेल, असे ते म्हणाले होते. त्यांच्या या टीकेला प्रत्युत्तर देताना सपकाळ यांनी त्यांच्यावर उपरोक्त शब्दांत पलटवार केला. ते म्हणाले, गेट वेल सून देवेंद्र फडणवीस. कोण हर्षवर्धन सपकाळ ते बिनडोक सपकाळ, असा प्रवास झालेला असून मला डोके नाही असे फडणवीस म्हणाले त्याचे आश्चर्य वाटले नाही, कारण शेकडो वर्षापासून बुद्धी ही विशेष जात वर्गाची मक्तेदारी आहे असा त्यांचा समज आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या जे पोटात होते ते ओठांवर आले आहे. याच विचाराने छत्रपती शिवाजी महाराज यांना राज्याभिषेक नाकारला होता. याच विचाराने बहुजन समाजाला ज्ञानापासून वंचित ठेवले, असे सपकाळ म्हणाले. काँग्रेसचा विचारच देशाला तारू शकतो ते पुढे म्हणाले, देशात व राज्यात भाजपचे सरकार आहे. त्यामुळे त्यांना सत्तेची मस्ती आली आहे. सर्व कायदे, नियम धाब्यावर बसवून मनमानी कारभार सुरू आहे. भाजपच्या विभाजनकारी राजकारणाला फक्त काँग्रेसचा सर्वसमावेशक विचारच प्रत्युत्तर देऊ शकतो. काँग्रेसचा विचारच देशाला तारू शकतो. त्यामुळे काँग्रेस पक्षात प्रवेश करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. काँग्रेस पक्षात जो काम करेल त्याला मोठी संधी आहे. त्यामुळे काँग्रेसचा विचार घराघरात पोहोचवा, पक्ष संघटना मजबूत करा व नव्या पिढीला काँग्रेस पक्षाशी जोडा, असे आवाहनही यावेळी सपकाळ यांनी काँग्रेस कार्यकर्त्यांना केले. उगीच विश्वगुरुचा आव आणू नये काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी यावेळी इंधन तुटवड्यावरूनही केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील रालोआ सरकारवर निशाणा साधला. आखाती देशांतील युद्धामुळे देशात एलपीजी गॅसचा तुटवडा उद्भवला असला तरी या सरकारकडे कोणतेही नियोजन नसल्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाली आहे. उगाच विश्वगुरु असण्याचा आव न आणता सर्वांशी चर्चा करून गॅस व इंधनाचा तुटवडा होणार नाही याची काळजी सरकारने घ्यावी. गॅस अभावी हॉटेल्स, खानावळी बंद पडणे आपल्याला परवडणारे नाही, असे ते म्हणाले. RSS ने संघटना बरखास्त करून संविधान स्वीकारावे हर्षवर्धन सपकाळ यांनी अन्य एका पोस्टद्वारे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला भारतीय संविधान स्वीकारण्याचाही सल्ला दिला. ते म्हणाले, संविधानच . . . . . नोंदणी नसलेल्या व ध्येयधोरणांची कमालीची गुप्तता पाळणाऱ्या व भारताचे महान “संविधान” मान्य नसणाऱ्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला 100 वर्ष पूर्ण झालेली आहेत, तेव्हा त्यांनी आपले संघटन बरखास्त करून भारताचे संविधान स्वीकारावे या मागणीसाठी काँग्रेस वर्षभर आग्रही राहणार आहे. नागपूर ते वर्धा पदयात्रा आणि युवक काँग्रेसच्या वतीने संघ मुख्यालयाला घेराव असे दोन उपक्रम याआधी राबवलेले आहेत, मात्र सोबतच समविचारींना साथ देत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाविरोधात सातत्याने सविनय निषेध नोंदवित राहिले पाहिजे. वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय नेते प्रकाशजी आंबेडकर यांच्यासमवेत पत्रकार परिषद घेतली. आदरणीय बाळासाहेबांनी सांगितले की जोवर मोदी पंतप्रधान आहेत तोवर त्यांना ब्लैकमेल केल्या जाईल. ते देश म्हणून आपल्याला परवडणारे नाही. एपस्टिन फाईल्समध्ये मोदी हे कमालीचे सरेंडर झाले आहेत. बदनामीच्या पोटी ते पंतप्रधान म्हणून पूर्णपणे काँप्रोमाइज्ड झालेले आहेत. देशाची सार्वभौमता धोक्यात आली आहे. अमेरिकेच्या परराष्ट्र धोरणाला निर्विवाद पाठिंबा असे आपले परराष्ट्र धोरण कधीही नव्हते. देशात नवीन ईस्ट इंडिया कंपनी ट्रम्पच्या निमित्ताने येत आहे. उपरोक्त परिस्थितीच्या अनुषंगाने वंचित बहुजन आघाडीच्या वतीने २३ मार्च रोजी आरएसएस मुख्यालयावर धरणे आंदोलनाची घोषणा करण्यात आली. संविधान प्रेमी समविचारी पक्ष संघटना यामध्ये सहभागी व्हावेत असे आवाहन देखील करण्यात आले प्रसंगी कम्युनिस्ट पक्ष, आप आणि इतर संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते. आदरणीय बाळासाहेबांच्या नेतृत्वातील,वंचित बहुजन आघाडीच्या मोदी-सरकार व राष्ट्रीय स्वयंसेवक संघ विरोधातील या आंदोलनास काँग्रेस पक्षाचा पाठिंबा व सहभाग राहील, असे ते म्हणाले.

Doonited Affiliated: Syndicate News Hunt

This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.

Source link

Related posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Uttarakhand News Doonited
Social media & sharing icons powered by UltimatelySocial
Instagram
WhatsApp