
विशाल करोळे, झी मिडिया, छत्रपती संभाजी नगर: गेम खेळा आणि पैसे जिंका या जाळ्यात अडकत एक महिला थेट छत्रपती संभाजी नगरात रुग्णालयात पोहीचली आहे, सुरुवातीला पैसे जिंकले नंतर पाशात अडकत 5 लाख हरली , त्यानंतर आत्महत्येचा प्रयत्न आणि त्यानंतर थेट रुग्णालय असा प्रवास या 35 वर्षे महिलेचा झालाय जाणून घ्या काय आहे संपूर्ण प्रकार.
गेम च व्यसन, मृत्यूला आमंत्रण
घरी बसून पैसे कमवा, गेम खेळा आणि पैसे जिंका…”” अशा जाहिराती, लिंक आणि सोशल मीडियावरील आकर्षक ऑफरमुळे ऑनलाइन गेमचे जाळे अधिक घट्ट होताना दिसत आहेत. धक्कादायक बाब म्हणजे या ऑनलाइन गेमच्या आहारी जाऊन केवळ तरुणच नाही, तर महिलाही मोठ्या प्रमाणावर पैसे गमावत आहेत. छत्रपती संभाजी नगरची ही घटना प्रत्येकाला हादरवणारी आहे, गृहिणी असलेल्या 35 वर्षीय महिलेला मोबाईलवर पैसे जिंकणारा एक गेम मिळाला. यातून तिला या गेमचं व्यसन लागलं सुरुवातीला तिने चाळीस-पन्नास हजार जिंकले मात्र जेवढं जास्त गुंतवणार तेवढे जास्त जिंकणार या आमिषाला बळी पडून तिने घरचे दागिने विकले, बहीण-भावाकडून पैसे उसने घेतले आणि तब्बल 4 ते 5 लाख रुपये गुंतवले. मात्र, नंतर ती सगळे पैसे या गेम मध्ये हरली आणि त्यानंतर तिने थेट आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. घरच्यांनी वेळीच सावरून या महिलेला मनोविकार तज्ज्ञाकडे नेलं, हॉस्पिटल मध्ये दाखल केला आणि तिथं या सगळ्या प्रकाराचा उलगडा झाला.
सहापेक्षा अधिक महिला खोट्या जाहिरातींच्या पाशात
ही फक्त एक घटना नाही तर गेल्या दोन महिन्यात तब्बल सहापेक्षा अधिक महिला याच मूळ उपचारासाठी आले असल्याचं डॉक्टर सांगतात आहे, तरुण मुलं मुली आणि खास करून घरी असणाऱ्या गृहिणी आता या पाशात अडकत असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. असल्या रुग्णांवर उपचार करताना खूप सावधानता बाळगावी लागते असेही डॉक्टर सांगत आहेत.
कोणीही अशा फसव्या गेमच्या आहारी जाऊ नये!
ऑनलाइन गेम आणि त्यातून मिळणाऱ्या पैशाच्या माध्यमातून अनेक जण उध्वस्त झाले आहे अनेकांना या गेमचं व्यसन रस्त्यावर घेऊन आलय, आणि त्यात आता जीवही जायची ही वेळ आली आहे. त्यामुळे सर्व महिलांनी घरी बसून पैसे कमवता येणे शक्य नाही. यांसारख्या गेमच्या आहारी जाऊ नये आणि जीव धोक्यात घालू नये हे समजून घेणे गरजेचे आहे.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.



