
सभागृहात जनतेचे प्रश्न उपस्थित होऊ नयेत म्हणून आमदारांना हाणामारी व सभागृहात गोंधळ करून अधिवेशन गुंडाळण्याचा सत्ताधाऱ्यांचा प्रयत्न होता असे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी सातारा येथे सांगितले
.
प्रदेशाध्यक्षपदी निवड झाल्यावर शशिकांत शिंदे प्रथमच साताऱ्यात आले. त्यांचे भव्य स्वागत कार्यकर्त्यांकडून करण्यात आले. यावेळी पक्षाच्या कार्यालयात ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी जिल्हा अध्यक्ष सुनील माने, सरचिटणीस राजकुमार पाटील,दीपक पवार आदी उपस्थित होते.
सभागृहात मुद्दाम गोंधळ निर्माण करण्यात आला
विरोधी पक्षाकडून अधिवेशनात जनतेच्या प्रश्नांसह सरकारच्या कामकाजातील उणीवा जनतेच्या मनातील रोष जगजाहीर होऊ नये म्हणून सभागृहात व सभागृहाबाहेर विरोधी पक्षाच्या सदस्यांना मारहाण करण्यात आली. सभागृहात मुद्दाम गोंधळ निर्माण करण्यात आला. विरोधकांना दमदाटी करून त्यांचा आवाज दाबून सरकारचा अधिवेशन गुंडाळण्याचा प्रयत्न विरोधी पक्षांनी हाणून पाडला, असे शिंदे यांनी सांगितले. सरकारच्या कामात खूप उणिवा आहेत. सत्ताधारी तीनही पक्षांमध्ये कोणताही समनव्य नाही. स्थानिक प्रशासनाला हाताशी धरून मतदारसंघासह सर्वत्र अन्याय दादागिरी करत सत्ताधारी आमदार मतदारसंघात अनेक अनधिकृत कामे करत आहेत. सगळीकडे नुसती बजबजपुरी सुरु आहे. एकूणच सरकार नाकर्ते झाले आहे, अशी टीका शशिकांत शिंदे यांनी केली.
हिंदीला विरोध कायम राहील
कोणत्याही परिस्थितीत राज्यात त्रिभाषा सूत्र अंमलात आणू दिले जाणार नाही. हिंदी भाषेला विरोध कायम राहील असे सांगून शिंदे म्हणाले, इतर राज्ये त्यांच्या भाषेला प्राधान्य व संरक्षण देत असताना हे राज्यकर्ते मराठी भाषा संपवायला निघाले आहेत. इथे उद्योग धंदे, रोजगार करण्यासाठी आलेले हिंदी भाषिक आणि परप्रांतीय मराठी माणसावर दादागिरी, अन्याय आणि अपमान करत आहेत. दिल्लीकरांच्या भीतीने सरकार त्यांना समज देत नाही, उलट त्यांना संरक्षण देत आहे. पण कोणत्याही परिस्थितीत ही हिंदी भाषिकांची दादागिरी सहन केली जाणार नाही. मराठी माणूस आणि महाराष्ट्र पेटून उठला तर सरकारला पळता भुई थोडी होईल, असेही त्यांनी सांगितले.
पक्षाची पूर्ण ताकदीने बांधणी केली जाईल
स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका स्थानिक पातळीवरील कार्यकर्त्यांशी विचारविनिमय करून लढविल्या जातील. त्या त्या ठिकाणी अधिकार दिले जातील. आवश्यकता असल्यास स्वबळावर निवडणूक लढविली जाईल. सातारा जिल्ह्यात पक्षाची मोठी पिछेहाट झाल्याचे मान्य करून शिंदे यांनी स्थानिक तालुका अध्यक्ष आणि कार्यकर्त्यांशी चर्चा करून जुन्या नव्यांचा मेळ घालून पक्ष संघटना उभी केली जाईल. आवश्यक त्या ठिकाणी मोठे फेरबदल केले जाते असे शिंदे यांनी सांगितले.
शशिकांत शिंदेंचे साताऱ्यात जल्लोषी स्वागत
राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांची निवड झाल्यानंतर साताऱ्यात प्रथमच आगमन झाले सारोळा ते सातारा व तेथून कराड यादरम्यानच्या प्रवासात टप्प्याटप्प्यावर त्यांचे जोरदार हार घालून जल्लोषी स्वागत करण्यात आले. शशिकांत शिंदे तूम आगे बढो हम तुम्हारे साथ है अशा घोषणा देत कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी पुन्हा या घोषवाक्याची जणू आठवण करून दिली.
प्रदेशाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर आमदार शशिकांत शिंदे यांचे जिल्ह्यात प्रथमच आगमन झाले शिरवळ पासून कराड पर्यंत विविध ठिकाणी कार्यकर्त्यांनी जल्लोषात स्वागत केले सातारा राष्ट्रवादी भवनात त्यांची महिला आघाडीने स्वागत केली. पोवई नाका येथे त्यांनी छत्रपती शिवराय व महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले पक्षात पडलेल्या फुटी नंतर कार्यकर्त्यांमध्ये नैराश्याचे वातावरण होते मात्र शनिवारी साताऱ्यात वेगळाच माहोल पाहायला मिळाला जोशाने भरलेले कार्यकर्ते गाड्यांची मोठी रॅली नाक्यावर क्रेनला लटकणारे मोठ मोठाले हार आणि आमचा नेता शशिकांत शिंदे अशा घोषणाबाजी करण्यात आल्या .

यावेळी शशिकांत शिंदे यांनी 2019 मध्ये पक्षाला सत्तारूढ करणार तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत निर्णय घेण्याच्या अधिकार जिल्हाध्यक्ष नाही मिळतील या पद्धतीने राजकीय समीकरणाची मांडणी होईल तसेच महाविकास आघाडी बाबत मित्रपक्ष काँग्रेस शिवसेना उभा ठाकरे यांच्याशी चर्चा करून निर्णय घेतला जाईल असे ते म्हणाले राज्यभर पक्ष संघटना बांधणीला प्राधान्य दिले जाईल आमदार रोहित पवार यांच्या समवेत 23 24 25 जुलै रोजी फ्रंट सेलच्या बैठका मुंबईत होतील आणि जिल्हा निहाय दौरा करून लोकांचे प्रश्न व समस्या जाणून घेऊ असे ते म्हणाले.

Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.



