
Gopichand Padalkar: भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी जयंत पाटलांवर पुन्हा पातळी सोडून टीका केलीय. जयंत पाटलांवर वैयक्तिक टीका करताना त्यांच्या भाषेतील विखार पहिल्यासारखाच दिसला. भाजपनं तंबी देऊनही पडळकर त्यांना जुमानत नाही का असा सवाल विरोधकांनी उपस्थित केलाय. दुसरीकडं भाजप मात्र पडळकरांच्या वक्तव्याचं समर्थन करीत त्यांच्या पाठिशी ठामपणे उभं असल्याचं पाहायला मिळालं.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपश्रेष्ठींनी सांगूनही आमदार गोपीचंद पडळकर यांनी जयंत पाटलांच्या जहरी टीका करणं थांबवलेलं नाही.अवघ्या काही दिवसांपूर्वी त्यांनी जयंत पाटलांचा बाप काढला होता. त्यावरुन वादंग झाल्यानंतर गोपीचंद पडळकर आता काही बोलणार नाही असं वाटलं होतं. पण त्यानंतर सांगलीत झालेल्या मेळाव्यातून गोपीचंद पडळकरांनी पुन्हा जयंत पाटलांना लक्ष्य केलं. जयंत पाटलांचा एकेरी उल्लेख करत त्यांचा त्यांच्यावर वैयक्तिक टीकेचा भडीमार केला.
गोपीचंद पडळकरांनी केलेल्या टीकेवर जयंत पाटलांनी कोणतीही प्रतिक्रिया देण्यास नकार दिलाय. मात्र राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या नेत्यांनी पडळकरांच्या वक्तव्याचा निषेध केलाय. पडळकर टाळ्या मिळवण्यासाठी अशी भडक वक्तव्य करत असल्याचा आरोपही त्यांनी केलाय.
महाविकास आघाडीच्या नेत्यांनीही पडळकरांच्या वक्तव्यावर तिखट प्रतिक्रिया दिलीय. गोपीचंद पडळकरांना पक्षातून काढून टाकलं पाहिजे अशी मागणी काँग्रेसनं केलीय. तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानंही पडळकरांच्या वक्तव्याचा निषेध केलाय.
गोपीचंद पडळकरांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावर टीका होत असताना भाजपनं मात्र त्यांची पाठराखण केलीय. गोपीचंद पडळकरांनी केलेल्या टीकेला काही संदर्भ असल्याचं भाजपनं म्हटलंय. पडळकरांवर केलेल्या टीकेवर ती प्रतिक्रिया असल्याचं भाजपनं म्हटलंय.
गोपीचंद पडळकरांनी जेव्हा जयंत पाटलांचा बाप काढला तेव्हा त्यांच्यावर झालेल्या टीकेनंतर भाजप बॅकफूटला होती. पण यावेळी पडळकरांनी केलेल्या टीकेनंतर भाजप गोपीचंद पडळकर यांच्या पाठिशी ठामपणे उभी असल्याचं दिसतंय. पडळकरांना एकप्रकारे भाजपनं अभय दिल्यानं त्यांच्या टीकेला पुढच्या काळात आणखी धार येण्याची शक्यता आहे.
FAQ
प्रश्न: भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी जयंत पाटील यांच्यावर कोणती टीका केली आहे?
उत्तर: गोपीचंद पडळकर यांनी सांगलीतील दसरा मेळाव्यात जयंत पाटील यांच्यावर वैयक्तिक आणि वादग्रस्त टीका केली. त्यांनी पाटील यांना ‘मंगळसूत्र चोर’ संबोधले आणि ‘तुमच्या कितव्या बायकोचे मंगळसूत्र मी चोरलं’ असा सवाल विचारला. यापूर्वीही त्यांनी पाटील यांच्या वडिलांचा उल्लेख करून अपमानजनक टिप्पणी केली होती, ज्यामुळे राजकीय वाद निर्माण झाला.
प्रश्न: पडळकरांच्या टीकेला विरोधकांची प्रतिक्रिया काय आहे?
उत्तर: राष्ट्रवादी शरद पवार गट, महाविकास आघाडी, काँग्रेस आणि शिवसेना (यूबीटी) यांनी पडळकरांच्या वक्तव्याचा तीव्र निषेध केला. काँग्रेसने त्यांना पक्षातून बाहेर काढण्याची मागणी केली, तर शरद पवारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोलून नाराजी व्यक्त केली. विरोधकांनी हे वक्तव्य भडकावून टाळ्या मिळवण्याचा प्रयत्न असल्याचे आरोप केले.
प्रश्न: भाजप आणि मुख्यमंत्र्यांची भूमिका काय आहे?
उत्तर: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पडळकरांच्या पूर्वीच्या अपमानजनक टिप्पण्या अयोग्य असल्याचे म्हटले आणि त्यांना सावध राहण्याचा सल्ला दिला. मात्र, नव्या टीकेनंतर भाजपने पडळकरांची पाठराखण केली, जी त्यांच्या प्रतिक्रियांना उत्तर असल्याचे सांगितले. यामुळे पक्षाने त्यांना अभय दिल्याने भविष्यातील टीका आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.