
- Marathi News
- National
- Green Cover, Bhopal Reduced By 29%, Jaipur By 22%; Ahmedabad Increased By 9%, Greenery Reduced In 15 Years, Severe Heat Crisis Due To Increase In Pollution
गुरुदत्त तिवारी | नवी दिल्ली37 मिनिटांपूर्वी
- कॉपी लिंक
आता उकाडा जास्तच जाणवत आहे, असे तुम्हालाही वाटते का? जर हो, तर मनात हाही प्रश्न निर्माण झाला असेल की, यामागचे कारण काय? ‘भास्कर’ने हे जाणून घेण्यासाठी ३ शहरांत (भोपाळ, जयपूर, अहमदाबाद) हीट ॲक्शन प्लॅनचे (एचएपी) परीक्षण केले. या प्लॅननुसार शहरांचे ग्रीन कव्हर वाढवणे आणि कूलिंग रूफसारखे उपाय करायचे होते. त्यातून लोकांना उष्णतेच्या तडाख्यापासून वाचवता येईल. मात्र वास्तव हे की, भोपाळ आणि जयपूरने यामध्ये उल्लेखनीय असे काहीच केले नाही. केवळ अहमदाबादने या तीन शहरांपेक्षाच नव्हे तर संपूर्ण देशात उत्तम काम केले.
अहमदाबादने २०१० मध्ये उनामुळे झालेल्या मृत्यूतून धडा घेत शहराचे ग्रीन कव्हर ३.४ % हून वाढवून १२% पर्यंत नेले. उनाच्या तडाख्यात सापडणारी लोकसंख्या शोधून त्या घरांना कूलिंग रूफमध्ये बदलले. हे तंत्रज्ञान थेट सूर्यापासून येणाऱ्या किरणांना परावर्तित करते आणि छत गरम होण्यापासून वाचवते. परिणामी आज येथे ग्रीन कव्हर असणाऱ्या परिसरात तापमान ३ अंशांपर्यंत कमी आहे. तर भोपाळमध्ये ग्रीन कव्हर ३५% घटून केवळ ६% राहिले आहे. येथे सरासरी तापमान केवळ पाच वर्षांत २-३ अंश वाढले. जयपूरमध्ये १४ ग्रीन झोनपैकी ६ आता ग्रे झोनमध्ये बदलले आहेत. कारण येथे निर्माण कार्य वेगाने झाले. विशेष म्हणजे शहरांना प्रदूषणमुक्त करण्यासाठी आलेला ग्रीन एनर्जी फंड भोपाळ आणि जयपूरमध्ये पूर्णपणे वापरण्यात आला. मात्र येथे प्रदूषण घटण्याऐवजी सातत्याने वाढत आहे. अहमदाबाद भलेही निधी वापरात मागे असेल, मात्र त्याने हवामान उत्तम बनवण्यासाठी सर्वात जास्त प्रयत्न केले. ग्रीन कव्हर घटल्याने आणि प्रदूषण वाढल्याने शहरांत एप्रिल-मे महिन्यात उष्णता वेगाने वाढत आहे.

परिणाम : भोपाळमध्ये ३ वर्षांत उन्हाळ्यात दरदिवशी वीज वापर १७.७% वाढला
- भोपाळ: गेल्या ३ वर्षांत उन्हाळ्यात सरासरी दरदिवशीचा वीज वापर १७.७७% वाढून ४६७ मेगावॅटवरून ५५० मेगावॅट झाला. या वेळी तो ६०० मेगावॅटपर्यंत पोहोचण्याचा अंदाज आहे.
- जयपूर: शहरात २०२५ मध्ये उन्हाळ्यात सर्वाधिक मागणी १००० मेगावॅटपर्यंत पोहोचते. ती गतवर्षीच्या तुलनेेत ३०% पर्यंत जास्त असण्याचा अंदाज आहे. गतवर्षी ती ७७० मेगावॅट होती.
- अहमदाबाद: २०२५ मध्ये येथे उन्हाळ्यात सर्वाधिक मागणी ३३०० मेगावॅटपार जाण्याचा अंदाज आहे. ही मागणी २०१७ मध्ये केवळ १,८३२ मेगावॅटपर्यंत मर्यादित होती. म्हणजे ८ वर्षांत येथे उन्हाळ्यात सर्वाधिक विजेची मागणी ९१.०४% पर्यंत पोहोचू शकते. २०२४ मध्ये सरासरी रोज विजेचा वापर २,८१४ मेगावॅट होता. २०२३ मध्ये तो २,६४० मेगावॅट आणि २०२२ मध्ये २,२३० मेगावॅट राहिला. ही एकूण परिस्थिती पाहता, ग्रीन कव्हरचे क्षेत्र वाढवण्याची गरज अधोरेखित होते.
भोपाळ-जयपूरने ५ वर्षांत संपूर्ण निधी वापरला
- भोपाळ : नॅशनल क्लीन एअर प्रोग्राम अंतर्गत ५ वर्षांत (२०१९-२०२५) हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी भोपाळला १८३.८५ कोटी रु. निधी मिळाला. ३१ डिसेंबर २०२३ पर्यंत भोपाळने त्यापैकी १६६.४४ कोटींचा निधी वापरलाही. अंदाज असा की, उर्वरित १७.४१ कोटी रुपये निधी ३१ मार्च २०२५ पर्यंत वापरला असेल.
- जयपूर : पाच वर्षांत ३२५.८५ कोटी रुपये मिळाले. त्यातील २६०.१७१ कोटी रु. खर्च करण्यात आले. म्हणजे ६५.६८ कोटीच उरले. ही गती पाहता असे मानले जाते की, संपूर्ण निधीचा वापर केला गेला असावा.
- अहमदाबाद : ३६५.५४ कोटी रुपये देण्यात आले. १०३.६१ कोटी रुपये कमी वापरण्यात आले. म्हणजे मोठी रक्कम खर्च होणार नाही.
स्रोत : पीआयबीच्या आकड्यांनुसार परिणाम हा… भोपाळमध्ये २०२० मध्ये एक्यूआय १५६ होता. जानेवारी २०२५ मध्ये १७७ झाला. अहमदाबादेत १००-१५० होता, तो ७०-११० मध्ये आला. जयपूरमध्ये १००-१५० होता, तो ६१ ते १५६ दरम्यान आला.
अहमदाबादेत १० वर्षांत १ कोटी झाडे लावली गेली
- भोपाळ: २००९ मध्ये ३५% क्षेत्रात जंगल होते. २०२९ मध्ये केवळ ९% राहिले. २०३० पर्यंत ३% राहण्याचा अंदाज. २०१६ मध्ये केवळ टीटी नगरमध्ये ९.२ लाख वृक्ष होते. २०२१ मध्ये शहरात ५.१४ लाख वृक्ष उरले.
स्रोत : इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ फॉरेस्ट मॅनेजमेंट व आयआयएससी बंगळुरू
- जयपूर: ग्रीन कव्हर ११.०३% च राहिले आहे. इकॉलॉजिकल झोनमध्येही ग्रे एरिया म्हणजे निर्मिती क्षेत्र वाढले. गेल्या २२ वर्षांत ग्रीन कव्हर ४६.९७% पर्यंत घटले. नव्या मास्टर प्लॅनमध्ये ग्रीन बेल्टचा हिस्सा २०% ठेवण्यात आला आहे. तो आधी ३३% होता. मात्र वास्तवात तो केवळ ११% च आहे.
स्रोत : सेंटर फॉर सायन्स अँड एन्व्हायर्नमेंटच्या अहवालातील आकडे.
- अहमदाबाद: १० वर्षांत १ कोटी नवे वृक्ष लावण्यात आले. २०१२ मध्ये येथे ग्रीन कव्हर केवळ ४.६६% होते. २०२४ पर्यंत १२.५% राहिले. ग्रीन कव्हरची कक्षा २३.३ वर्ग किमीहून वाढून ६० वर्ग किमी झाली.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.