
Ghodbunder Road Traffic Restrictions: घोडबंदर येथील वाहतूककोंडीमुळं नागरिक अगदी मेटाकुटीला आले आहेत. घोडबंदर येथे वाहतुक कोंडीमुळं अनेकदा तासनतास अडकून पडावे लागते. नागरिकांचा हाच त्रास दूर करण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महत्त्वाचे आदेश दिले आहेत. ठाणे, कल्याण ते बदलापूरपर्यंत अवजड वाहनांना प्रवेशबंदी करण्यात आली आहे. हा निर्णय 18 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर या कालावधीत लागू असेल.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अवजड वाहनांना (10 चाकी किंवा त्यापेक्षा जास्त) घोडबंदर भागात दिवसा प्रवेशबंदीचे आदेश दिल्यानंतर मंगळवारी रात्री ठाणे वाहतुक पोलिसांनी त्यासंदर्भाची अधिसूनचा काढली आहे. ठाणे ते बदलापूर पर्यंत अवजड वाहनांना दिवसा प्रवेशबंदी लागू करण्यात आली असून हे वाहतुक बदल गुरुवारी, 18 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर या कालावधीत दररोज सकाळी 6 ते रात्री 12 पर्यंत लागू असतील. त्यामुळे अवजड वाहने मध्यरात्री वाहतुक करू शकतील. ही अधिसूचना प्रायोगिक तत्त्वावर लागू करण्यात आली आहे. हरकती आणि सूचना असल्यास लेखी स्वरुपात तीन हात नाका येथील ठाणे वाहतुक शाखेच्या उपायुक्त कार्यालयात पाठविण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे. हरकती झाल्या नाही तर ही अधिसूचना पुढील आदेश होईपर्यंत कायम स्वरुपी लागू राहणार आहे.
असे असतील वाहतुकीतील बदल?
मुंबई, नवी मुंबई येथून आनंदनगर चेकनाका मार्गे ठाणे शहरात प्रवेश करणाऱ्या सर्व अवजड वाहनांना आनंदनगर चेकानाका जवळ प्रवेशबंदी असेल. गुजरात येथून घोडबंदर मार्गे वाहतुक करणाऱ्या अवजड वाहनांना चिंचोटी नाका येथे प्रवेशबंदी असेल. मुंबई, विरार, वसई येथून घोडबंदरच्या दिशेने वाहतुक करणाऱ्या वाहनांना फाऊंटन हॉटेलजवळ प्रवेशबंदी असेल.
बेलापूर-ठाणे मार्गे विटावा जकात नाका मार्गे कळवा येथे वाहतुक करणाऱ्या वाहनांना नवी मुंबईतील पटणी चौकात प्रवेशबंदी लागू करण्यात आली आहे. पनवेल ठाणे मार्गावरून रेतीबंदर पुढे पारसिक चौक येथे डावे वळण घेऊन कळव्याच्या दिशेने वाहतुक करणाऱ्या अवजड वाहनांना पारसिक चौकाजवळ प्रवेशबंदी आहे.
महापे नवी मुंबई मार्गे शिळफाटा येथून वाहतुक करणाऱ्या वाहनांना शिळफाटा येथे प्रवेशबंदी असेल. तळोजा येतून दहीसर मोरी मारगे कल्याण फाटा येथून कल्याण आणि ठाण्याच्या दिशेने वाहतुक करणाऱ्या अवजड वाहनांना दहीसर मोरी येथे प्रवेशबंदी असेल. वाडा मार्गे नदीनाका भिवंडी शहराच्या दिशेने वाहतुक करणाऱ्या अवजड वाहनांना पारोळ फाटा येथे तर वाडा चेकपोस्ट मार्गे भिवंडीच्या दिशेने वाहतुक करणाऱ्या वाहनांना धामणगाव, जांबोळी जलवाहिनी नाका आणि चाविंद्रा नाका येथे प्रवेशबंदी केली जाईल.
रांजनोली चौकातून भिवंडी शहरात वाहतुक करणाऱ्या अवजड वाहनांना सरवली गाव येथे प्रवेशबंदी असेल. नाशिक महामार्गाने बदलापूर, नवी मुंबई, पुणे, उरण न्हावाशेवा येथे जाण्यासाठी बापगाव, गंधारी मार्गे वाहतुक करणाऱ्या अवजड वाहनांना पडघा येथील तळवली चौकात प्रवेशबंदी असेल. मुरबाड येथून शहाड पूल मार्गे कल्याणच्या दिशेने वाहतुक करणाऱ्या अवजड वाहनांना म्हारळ जकात नाका येथे प्रवेशबंदी केली जाईल.
नवी मुंबई येथील तळोजा एमआयडीसी येथून तळोजा बाह्यवळण, उसटणे, खोणी, नेवाळी नाका मार्गे वाहतुक करणाऱ्या अवजड वाहनांना तळोजा एमआयडीसी येथे तसेच कर्जत येथून बदलापूरच्या दिशेने वाहतुक करणाऱ्या अवजड वानांना अंबरनाथ येथील खरवई नाका येथे प्रवेशबंदी असेल. मुरबाड येथून बदलापूर, अंबरनाथच्या दिशेने वाहतुक करणाऱ्या अवजड वाहनांना अंबरनाथ येथील ऐरंजाड येथे प्रवेशबंदी असेल.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.