digital products downloads

चंद्रपुरात नाट्यमय घडामोडी! महापौरपदी भाजपाच्या संगीता खांडेकर; एका मताने झाल्या विजयी

चंद्रपुरात नाट्यमय घडामोडी! महापौरपदी भाजपाच्या संगीता खांडेकर; एका मताने झाल्या विजयी

BJP Mayor in Chandrapur: चंद्रपूर महापालिकेत भाजपाचा महापौर विराजमान झाला आहे. भाजपाच्या संगीता खांडेकर यांची महापौरपदी वर्णी लागली आहे. संगीता खांडेकर फक्त एका मताने जिंकल्या आहेत. संगीता खांडेकर यांना एकूण 32 मतं मिळाली तर, काँग्रेसच्या वैशाली महाडुळे यांना 31 मतं मिळाली आहेत. एमआयएमचे सदस्य यावेळी तटस्थ राहिले. तर वंचितचे दोन सदस्य गैरहजर होते. महत्त्वाचं म्हणजे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने भाजपाला पाठिंबा दिला. 

Add Zee News as a Preferred Source

तसंच उपमहापौरपदासाठी उबाठाचे प्रशांत दानव यांची निवड झाली आहे. अपक्ष नगरसेवक प्रशांत दानव यांनी आज सकाळीच उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश केला होता. 

भाजपा आणि शिवसेनेचा असा आहे फॉर्म्युला

महापौर सव्वा वर्ष पहिले भाजप त्यानंतर सव्वा वर्ष शिवसेना शिवसेनेचा होणार आहे. उपमहापौरपद देखील शिवसेनेला, आणि पहिलं आणि चौथ्या वर्ष स्थायी समिती देखील शिवसेनेला मिळणार असं ठरलं आहे. 

चंद्रपूर महापालिकेतील पक्षीय बलाबल

काँग्रेस 27
काँग्रेसशी निवडणूक पूर्व आघाडी असलेली शेकाप 3
भाजप 23
शिंदेंसेना 1
उबाठा शिवसेना 6
वंचित 2
बसपा 1
अपक्ष (काँग्रेस बंडखोर) 2
एमआयएम 1

एकूण जागा 66

बहुमत नसल्याने रस्सीखेच

34 हा बहुमताचा आकडा कुणालाही मिळालेला नव्हता. त्यामुळेच काँग्रेस आणि भाजपात उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला सोबत घेण्याचा पर्याय उपलब्ध होता. मात्र शिवसेनेने पहिला महापौर आपलाच हवा अशी ठाम भूमिका घेतली होती. त्यावरून गेले सुमारे 20 दिवस चर्चा -संवाद यावर सस्पेन्स जारी होता. 

भाजपच्या गोटात या मनपा निवडणुकीत 2 तंबू बघायला मिळाले. सुधीर मुनगंटीवार आणि किशोर जोरगेवार यांनी प्रत्येक जागा, प्रत्येक पद याबाबत एकमेकांवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न केला. शेवटी मुख्यमंत्री फडणवीस यांना महसूलमंत्री बावनकुळे यांना चंद्रपुरात पाठवून तात्पुरता समेट घडवावा लागला.

काँग्रेसला धक्का

मधल्या काळात काँग्रेसच्या धानोरकर -वडेट्टीवार गटातील संघर्ष शिगेला पोहोचला होता. एकमेकांचे नगरसेवक पळविणे त्यांचे जवळजवळ अपहरण करणे इथपर्यंत प्रकार झाले. काँग्रेसच्या अंतर्गत वर्चस्वाचा वाद जिल्हा, विभाग ,प्रदेश आणि थेट दिल्लीत पोहोचला. त्यात समेट झाल्यानंतर काँग्रेसच्या 27 नगरसेवकांचा एक गट अगदी 2 दिवस आधी नोंदला गेला. धानोरकर गटाला महापौरपद तर उपमहापौरपद वडेट्टीवार गटाला असा फॉर्म्युला निश्चित झाला होता. सहकारी पक्षांना स्थायी समिती देण्याचेही निश्चित झाले होते. मात्र सर्व खेळ उबाठा शिवसेना- वंचित आणि अपक्ष यांच्या दहा जणांच्या गटावर अवलंबून होता. 

Doonited Affiliated: Syndicate News Hunt

This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.

Source link

Related posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Uttarakhand News Doonited
Social media & sharing icons powered by UltimatelySocial
Instagram
WhatsApp