
कुराणच्या आयत लिहिलेल्या चादरी जाळल्यामुळे नागपूरमध्ये हिंसाचार भडकल्याचा आरोप केला जातोय. मात्र, कुराणच्या आयत लिहिलेल्या चादरी जाळल्या गेल्या नाहीत. काही लोकांनी अफवा पसरवल्या, त्यामुळे नागपूरची परिस्थिती बिघडली, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडण
.
देवेंद्र फडणवीसांनी मंगळवारी विधानसभेत केलेल्या निवेदनात नागपूरमधील दंगलीच्या घटनांमध्ये ‘पूर्वनियोजित पॅटर्न’ दिसत असल्याचे म्हणत हा कारस्थानाचा भाग असल्याचे म्हटले होते. मात्र, यासंदर्भात नागपूरचे पोलिस आयुक्त वेगळी माहिती देत असून मुख्यमंत्री वेगळी भूमिका मांडत आहेत, असा मुद्दा नाना पटोले यांनी विधानसभेत उपस्थित केला. त्यावर बोलताना देवेंद्र फडणवीसांनी भूमिका स्पष्ट केली.
नागपूर प्रकरणात पोलिस आयुक्त आणि मी वेगळे बोललो नाहीत, पोलिस आयुक्तच मला ब्रिफ करतात. नागपूरच्या सीपींनी सांगितले की हे पूर्वनियोजित होते की नाही याची आम्ही चौकशी करत आहोत. अजून अंतिम निष्कर्षापर्यंत आलेलो नाही. त्यामुळे ते वेगळे बोलले आणि मी वेगळे बोललो असे काहीही नाही, असे देवेंद्र फडणवीसांनी नमूद केले.
चादरीवर कुराणची ‘आयत’ लिहिलेली नव्हती
आता नागपूर शांत आहे. नागपूर शांततेसाठीच प्रसिद्ध आहे. 1992 नंतर नागपुरात कधीही दंगल झालेली नाही. परवाची झालेली घटना काही लोकांनी जाणीवपूर्वक घडवून आणला हे लक्षात येते. तिथे औरंगजेबाची कबर जाळली गेली. त्यावर कुठलीही आयात लिहिलेली नव्हती. आम्ही या गोष्टीचा सखोल तपास केला आहे. पण जाणीवपूर्वक आयाती जाळल्या अशा प्रकारचे संदेश पसरवण्यात आले आणि त्यातून ही पुढची घटना घडली, अशी माहिती देवेंद्र फडणवीसांनी सभागृहात दिली.
…त्यांना कबरीतून बाहेर शोधून काढू
नागपूर प्रकरणात पोलिसांवर ज्यांनी हल्ला केला त्यांना कबरीतून बाहेर शोधून काढू, सोडणार नाही. बाकी सगळ्या गोष्टी क्षम्य आहेत. पण पोलिसांवर हल्ला क्षम्य नाही. त्यामुळे त्यांच्यावर कठोरातली कठोर कारवाई नियोजित वेळेत केली जाईल. पोलिसांवर हल्ला करणाऱ्यांवर कडक कारवाई होणार त्याशिवाय शांत बसणार नाही असे फडणवीस म्हणाले. नागपुरात हिंसाचार पसरवण्यास जो कोणी जबाबदार असेल, त्याला सोडले जाऊ नये, अशा सक्त सूचना मी पोलीस प्रशासनाला दिल्या आहेत. नागपूरची शांतता आणि सद्भावना कोणत्याही किंमतीत बिघडू दिली जाणार नाही,’ असा पुनरुच्चार त्यांनी केला.
हे ही वाचा…
नागपूर हिंसाचारामध्ये अर्बन नक्षलवाद्यांचा सहभाग:आमदार परिणय फुकेंचा गंभीर आरोप, शहरी नक्षलवादविरोधी कायदा अंमलात आणण्याची मागणी
नागपूरमध्ये सोमवारी रात्री मोठा हिंसाचार झाला होता. हा मुद्दा आज विधानसभेतही गाजला. नागपूरच्या घटनेवरून विरोधक आणि सत्ताधारी आमने-सामने आल्याचे पाहायला मिळाले. त्यातच आता नागपूरमधील हिंसाचारामागे अर्बन नक्षलवाद्यांचा सहभाग असल्याचा आरोप भाजपचे आमदार परिणय फुके यांनी सभागृहात केला. यावेळी त्यांनी महाराष्ट्र शहरी नक्षलवादविरोधी कायदा 2024 लवकरात लवकर अंमलात आणण्याची मागणी केली. पूर्ण बातमी वाचा…
भाजपला हिंदुत्व अन् छत्रपती शिवाजी महाराज यांचा विचार ठेवायचा नाही:हिंमत असेल तर पाडा ती कबर, सरकार तुमचेच- अंबादास दानवे

भाजपला हिंदुत्व आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचा विचार ठेवायचा नाही. यांना असे दाखवायचे आहे की हा देश आम्ही बनवला आहे, शिवरायांचा यात कुठेही रोल नाही, असे म्हणत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी भाजपवर टीका केली आहे. पूर्ण बातमी वाचा…
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.