
छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेने चिकलठाणा परिसरात सलग दुसऱ्या दिवशी अतिक्रमण विरोधी मोहीम राबवली आहे. या कारवाईदरम्यान मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
.
शनिवारी केब्रिज चौक ते मुकुंदवाडी दरम्यान 490 अतिक्रमणे काढण्यात आली. रविवारी आणखी 600 अतिक्रमणांवर कारवाई होणार आहे. मनपाच्या नियोजनानुसार एकूण 1,355 अतिक्रमणे काढली जाणार आहेत.
रविवारी सकाळी नऊ वाजल्यापासून रस्ता रुंदीकरणासाठी पाडापाडी मोहीम सुरू झाली. यापूर्वी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी पोलिसांची बैठक घेऊन आवश्यक सूचना दिल्या.
मनपाने या मोहिमेसाठी 20 जेसीबी मशीन तैनात केल्या आहेत. कारवाईदरम्यान अनेक नागरिक आपली घरे पडताना पाहत होते. काही नागरिकांनी त्यांची घरे अतिक्रमणात नसतानाही पाडली जात असल्याची तक्रार केली. त्यांनी मनपा अधिकाऱ्यांकडे नुकसान भरपाईची विचारणा केली. चिकलठाणा परिसरात कारवाईदरम्यान मोठ्या संख्येने नागरिक जमा झाले होते.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.