
पुण्यातील चितळे बंधू मिठाईवाल्यांची फसवणूक करण्यात आली आहे. चितळे बंधूंचं नाव वापरत बनावट बाकरवडीची विक्री केली जात असल्याची माहिती समोर आली आहे. बाजारात चितळे बंधूंचे हुबेहुब पाकीट आणि इतर माहिती वापरत बाकरवडीची विक्री केली जात आहे. चितळे बंधु मिठाईवाले यांचे इंद्रनील चितळे यांचे पर्सनल सेक्रेटरी यांनी पोलिसात तक्रार दिली आहे.
बनावट बाकरवडी खरेदी करु नका, चितळे बंधूंचं आवाहन असून त्यांनी ‘चितळे स्वीट होम’वर पोलिसांकडून गुन्हा दाखल केला आहे. पुण्यात चितळे बंधूंचे नाव वापरत दुसऱ्याच चवीच्या बाकरवाडीची विक्री केली जात असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. विश्रामबाग पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. तसेच या प्रकरणात प्रमोद प्रभाकर चितळे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे
“चितळे स्वीट होम” यांनी चितळे बंधु मिठाईवाले यांचे अधिकृत ई मेल आयडी, कस्टमर केअर नंबर, मॅन्युफॅक्चरींग डिटेल्स व कॉन्टॅक्ट डिटेल्स यांची माहिती त्यांच्या बाकरवडीच्या पाकिटावर नोंदवून चितळे बंधु मिळाईवाले यांचे असल्याचे भासवुन, नावाचा गैरवापर करुन फसवणुक केली आहे
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे गेल्या 4 वर्षांपासून चितळे बंधू मिठाईवाले कार्यालयात इंद्रनील चितळे यांचे पर्सनल सेक्रेटरी म्हणून काम पाहतात. चितळे बंधु मिठाईवाले यांचा भोर तालुक्यातील मौजे रांजे येथे बाकरवडी तयार करण्याचा मुख्य प्लॉन्ट आहे. याशिवाय पर्वती इंडस्ट्रीयल, टिमवि कॉलनी मुकुंदनगर याठिकाणी देखील बाकरवडी तयार करण्याचे छोटे युनिटस् आहेत
गेल्या काही दिवसांपासून चितळे बंधू मिठाईवाले यांना बाखरवडीची बदल्याच्या अनेक तक्रारी प्राप्त होत्या. या तक्रारींची दखल घेत फिर्यादी यांनी बाजारात मिळणाऱ्या काही ठिकाणाहून “चितळे स्वीट होम” नावाने विक्रीस असणाऱ्या बाकरवडीचे पाकिटे खरेदी केली. चितळे स्वीट होम नावाने असणारे बाकरवडीची पाकिटे व आमच्या नियमीत तयार होणाऱ्या बाकरवडीच्या पाकिटांमध्ये तफावत दिसून आली.
खरेदी केलेल्या पाकिटांची तपासणी केली असता बाकरवडीमध्ये तफावत असल्याचे फिर्यादी यांना आढळून आले. तसेच त्या पाकिटावर चितळे बंधू मिठाईवाले यांचे अधिकृत ई मेल आयडी customercare@chitalebandhu.in कस्टमर केअर नंबर 9922944482, व वेबसाईट www.
chitalebandhu.in डिटेल्स हे पाकिटांच्या साईड पट्टीवर हुबेहुब छापले असल्याचे दिसुन आले.
अशाप्रकारे “चितळे स्वीट होम” चे प्रोपा प्रमोद प्रभाकर चितळे यांनी चितळे बंधु मिळाईवाले यांचे अधिकृत ई मेल आयडी, कस्टमर केअर नंबर, मॅन्युफॅक्चरींग डिटेल्स व कॉन्टॅक्ट डिटेल्स यांची माहिती स्वतःचे प्रोडक्शन असलेल्या बाकरवडीच्या पाकिटावर नोंदवुन चितळे बंधु मिठाईवाले यांचे नावाचा गैरवापर करून आर्थिक नुकसान करुन चितळे बंधु मिठाईवाले यांची प्रमाणात फसवणुक केल्याचे समोर आलं आहे. भारतीय न्याय संहिता कलम ३१८(२), ३५०, ६६(सी), ६६ (ड) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.