
Sudhir Mungantiwar on Grants for Marathi films : मराठी चित्रपटांचं अनुदान रखडलंय. चित्रपटांच्या अनुदानाचा सरकारला विसर पडल्याचं म्हणत भाजपचे ज्येष्ठ नेते आणि आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी सरकारला घरचा आहेर दिलाय. तब्बल 255 चित्रपटांचं अनुदान रखडल्याचा आरोप मुनगंटीवार यांनी केलाय. यासंदर्भात मुनगंटीवारांकडून सांस्कृतिक कार्य विभागाच्या सचिवांना पत्रही देण्यात आल आहे. भाजपचे माजी मंत्री आणि विद्यमान आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी चित्रपटांच्या रखडलेल्या अनुदानावरून सरकारलाच घरचा आहेर दिलाय. चित्रपटांच्या अनुदानाचा सरकारला विसर पडल्याचं म्हणत सुधीर मुनगंटीवार यांनी सरकारवर निशाणा साधला आहे. या संदर्भात मुनगंटीवार यांनी सांस्कृतिक कार्य विभागाच्या सचिवांना पत्र लिहिलंय.
मराठी चित्रपटांचं अनुदान रखडलं?
कोरोना काळातील चित्रपटांना सरसकट अनुदान देणे. चित्रपट अनुदान परीक्षण समितीची पुनर्रचना करणे. हे निर्णय सुधीर मुनगंटीवार सांस्कृतिक मंत्री असताना घेण्यात आले होते. दरम्यानच्या काळात सरकार बदललं, सांस्कृतिक खात्याचे मंत्रिही बदलले. मात्र, मुनगंटीवार यांच्या काळात झालेल्या निर्णयांची अंमलबजावणी झाली नाही.याबाबत विचारणा करणारं पत्र सुधीर मुनगंटीवार यांनी सांस्कृतिक खात्याच्या सचिनांना लिहिल आहे. 255 चित्रपटांचं अनुदान रखडल्याचा उल्लेख त्यांनी या पत्रात केला आहे.
तर या पत्रासंदर्भात माहिती घेऊन याची चौकशी करणार असल्याची प्रतिक्रीया सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी दिली आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांना मंत्रिमडळातून डावलल्यानंतर मुनगंटीवार सरकारवर निशाणा साधण्याची एकही संधी सोडत नाहीत. आता मराठी चित्रपटांच्या अनुदानावरून मुनगंटीवार यांनी सरकारला घरचा आहेर दिल्याचं पाहायला मिळतंय.
मराठी चित्रपटसृष्टीला मिळणाऱ्या अनुदानावरून अनेकदा चर्चा होते. तर मराठी चित्रपटसृष्टीला राज्य सरकारकडून अनुदान मिळतं. आता हे अनुदान कसं ठरतं असा प्रश्न तुम्हाला कधी पडला आहे का? तर हे अनुदान तो चित्रपट कोणत्या कॅटेगरीत आहे. त्यावरून त्याला मिळणारं अनुदान ठरवण्यात येतं. पण जर एखाद्या चित्रपटासाठी अनुदानाची मागणी करण्यात आली आणि तो चित्रपट त्या कॅटेगरीत बसत नसेल तर त्याला अनुदान देण्यात येतं नाही. पण सुधीर मुनगंटीवार यांनी कोरोना काळातील चित्रपटांना सरसकट असं अनुदान दिलं होतं. त्यावेळी त्यांनी चित्रपट अनुदान परीक्षण समितीची पुनर्रचना केली होती.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.