digital products downloads

चिमुकलीवर लैंगिक अत्याचार, हत्या, पत्नीची मदत, फिल्मी अटक अन्..; कल्याण Rape Case चा A To Z तपशील

चिमुकलीवर लैंगिक अत्याचार, हत्या, पत्नीची मदत, फिल्मी अटक अन्..; कल्याण Rape Case चा A To Z तपशील

Explained Kalyan Rape Case Vishal Gawli Suicide:  कल्याण बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी विशाल गवळीने आत्महत्या केली आहे. कल्याणमधील कोळसेवाडीतील चक्कीनाका भागातील एका अल्पवयीन मुलीवर विशाल गवळीने डिसेंबर 2024 मध्ये लैंगिक अत्याचार केला होता. त्यानंतर विशालने पत्नीच्या मदतीने मुलीची निर्घुण हत्या केली होती. या प्रकरणात अटकेत असलेल्या विशालने आज तळोजा जेलमध्ये गळफास लावून आत्महत्या केली. पहाटे साडेतीन  वाजता गळफास लावून आत्महत्या केली. पहाटे साडेतीन वाजता विशाल गवळी शौचालयाला गेला असता , टॉवेलच्या सहाय्याने गळफास लावून आत्महत्या केली आहे, अशी माहिती सुत्रांनी दिली आहे. त्याचा मृतदेह शवविच्छेदन साठी जे .जे .रुग्णालयात पाठवण्यात आला असून विशाल गवळीच्या हत्येबद्दल त्यांच्या वकिलांनी शंका उपस्थित केली आहे. मात्र विशाल गवळीचा गुन्हा हा दिल्लीमधील बलात्कार प्रकरणाची आठवण करुन देणारा आहे. नेमकं विशालने केलेला काय जाणून घेऊयात…

विनयभंगाचे 5 गुन्हे दाखल असतानाही मोकाट फिरत होता

कोळसेवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहत असताना विशाल गवळीने एका 12 वर्षीय अल्पवयीन मुलीला घरात बोलावून तिच्यावर भयंकरपद्धतीने अत्याचार केले. यानंतर पीडितेने सदर प्रकरणाची कुठे वाच्यता करू नये या हेतूने तिचा निर्घृणपणे खून केला. त्यानंतर विशालने पीडितेचा मृतदेह एका बॅगेमध्ये कोंबून ठेवला. गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या विशाल गवळीने तो राहात असलेल्या परिसरात दहशत निर्माण केली होती. रिक्षाचालक असलेल्या विशाल गवळीविरोधात विनयभंगाचे 5 गुन्हे दाखल असतानाही तो जामीनावर मोकाट फिरत होता.

पत्नीच्या मदतीने लावली मृतदेहाची विल्हेवाट

विशाल गवळीने चिमुकलीची हत्या केल्यानंतर तिच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी त्याच्या बायकोनेही त्याला मदत केली. विशालची पत्नी साक्षीही या प्रकरणात तुरुंगात आहे. गुन्हा घडल्याच्या दिवशी खासगी बँकेत काम करणारी साक्षी जेव्हा घरी आल्यानंतर विशालने घडलेला प्रकार तिला सांगितला. यानंतर दोघांनी बसून मृतदेहाची विल्हेवाट कशी लावायची यासंदर्भातील कट रचून नियोजन केलं. दोघांनी मिळून घरात सांडलेलं या चिमुकलीचं रक्त पुसलं. त्यांनी या मुलीचा मृतदेह बॅगेत भरला. त्यानंतर विशालने त्याच्या मित्राची रिक्षा बोलावली. या रिक्षामधून विशाल आणि साक्षीने मृतदेह भरलेली बॅग बापगावला नेली. तिथे या दोघांनी ही मृतदेह भरलेली बॅग फेकून दिली आणि ते घरी परतले.

पोलिसांना संशय आला कारण….

घरी आल्यानंतर विशालने मोठ्या प्रमाणात मद्यप्राशन केलं. पोलिसांच्या तावडीत सापडू नये म्हणून विशाल बुलढाण्यातील शेगावला पळून गेला. मात्र साक्षी काही झालंच नाही अशापद्धतीने घरीच राहत होती. मात्र पोलीस तपासादरम्यान विशालच्या घराच्या दरवाजाजवळ रक्ताचे डाग दिसल्याने पोलिसांचा विशालवर संशय बळावला. त्यांनी साक्षीला ताब्यात घेऊन चौकशी केल्यानंतर तिने गुन्हा कबुल करत सगळा प्रकार पोलिसांना सांगितला. त्यानंतर विशाल गवळी पळून जाण्यापूर्वी सीसीटीव्ही फुटेजमध्येही दिसून आला होता.

फिल्मी स्टाइल अटक

विशाल गवळीला शेगाव पोलिसांनी अटक केली होती. गुन्हे शाखेच्या पथकांनी विशालचा माग काढत शेगावमध्ये वेशांतकर करुन पलायनाच्या तयारीत असलेल्या विशालला एका सलूनमधून अगदी फिल्मी स्टाइल अटक केली होती. विशालचा ताबा मिळवण्यासाठी कल्याण पोलिसांच्या गुन्हे शाखेचे पथक शेगावला गेलं होतं. कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर विशालला कल्याणला आणण्यात आलं होतं. कल्याणचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी अल्पवयीन मुलीच्या कुटुंबीयांची भेटही घेतली होती. यावेळी त्यांनी आश्वासन दिले होते की आरोपीवर कठोर कारवाई केली जाईल. तसेच आरोपीला फाशी व्हावी यासाठी सरकारच्या बाजूने पूर्ण प्रयत्न केले जातील, असंही श्रीकांत शिंदे म्हणाले होते. त्यामुळेच विशालने आज आत्महत्या केल्याची बातमी समोर आल्यानंतर पीडितेच्या कुटुंबियांनी कठीण प्रसंगी धीर देण्यासाठी आलेल्या स्थानिक खासादारांसहीत त्यांचे वडील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचेही आभार मानले. 

फास्ट ट्रॅक कोर्टात सुरु होती केस

पोलिसांनी तीन महिन्यांमध्ये सखोल चौकशी करुन आरोपी विशालने गुन्ह्यासाठी वापरलेले हत्यार, गांधारे नदीत फेकून दिलेली पिशवीसहीत इतर वस्तू जप्त केल्या होत्या. विशाल आणि त्याच्या पत्नीला कठोर शिक्षा होईल असे पुरावे पोलिसांच्या हाती लागले होते. यासंदर्भातील आरोपपत्र देखील जलदगती न्यायालयामध्ये दाखल करण्यात आलं होतं. दोन महिन्यांपूर्वीच आरोपपत्र पोलीस उपायुक्त अतुल झेंडेच्या मार्गदर्शनाखाली जलदगती न्यायालयात सादर करण्यात आलेलं. या प्रकरणाची सुनावणीही सुरु होती. 

Doonited Affiliated: Syndicate News Hunt

This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.

Source link

Uniq Art Store India

Related posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Uttarakhand News Doonited
Social media & sharing icons powered by UltimatelySocial
Instagram
WhatsApp