
Babanrao Lonikar: चुकलो नसलो तरी माफी मागतो असे म्हणत वादग्रस्त वक्तव्याबद्दल लोणीकरांनी शेतकऱ्यांची आखडती माफी मागितली.भाजप आमदार डॉक्टर बबनराव लोणीकरांनी कालच्या वक्तव्याबद्दल स्पष्टीकरण दिलंय. शेतकऱ्यांचा बाप काढल्याने बबनराव लोणीकरांवर राज्यभरातून टीका होऊ लागली. काय म्हणाले होते बबनराव लोणीकर? आता त्यांनी काय स्पष्टीकरण दिलंय.
काय आहे नेमकं प्रकरण?
भाजपचे जालन्यातील परतुरचे आमदार बबनराव लोणीकर यांनी काल सोशल मीडियावरून टिका करणाऱ्या तरुणांबद्दल वादग्रस्त वकव्य केलं. या वक्तव्याबद्दल चुकीचं बोललो नसलो तरी शेतकऱ्यांची माफी मागतो अशा शब्दात लोणीकर यांनी दिलगिरी व्यक्त करत आखडती माफी मागीतलीय.भाजपचे आमदार बबनराव लोणीकरांनी शेतक-यांचा बाप काढला. जालन्याच्या परतूरमध्ये टीकाकारांवर बोलताना लोणीकरांची मग्रुरी पाहायला मिळाली. तुमच्या अंगावरचे कपडे, पायातले बूट, हातातला मोबाईल मोदी सरकारमुळेच असल्याची मुक्ताफळं लोणीकरांनी उधळलीत. भाजप आमदार बबनराव लोणीकरांची मग्रुरी पाहायला मिळाली.
फडणवीसांनी खडसावलं
बबनराव लोणीकरांनी केलेल्या विधानानंतर देवेंद्र फडणवीसांनी त्यांना खडसावलंय. शेतक-यांबाबत अशा प्रकारचं विधान करण्याचा अधिकार कोणालाही नसल्याचं मुख्यमंत्री फडणवीसांनी म्हटलंय. तर बबनराव लोणीकरांनी शेतक-यांबाबत केलेल्या विधानानंतर आता विरोधक देखील आक्रमक झाले आहेत. सरकार शेतक-यांसाठी ज्या योजना राबवतं त्या जनतेनं दिलेल्या टॅक्समधून राबवल्या जातात. तसंच लोणीकरांनी केलेलं विधान गलिच्छ असल्याचं म्हणत सुळेंनी त्यांच्यावर सडकून टीका केलीय.
शेतकरी संघटना आक्रमक
लोणीकरांच्या विधानानंतर शेतकरी संघटना देखील आक्रमक झाल्या आहेत. राजू शेट्टी यांनी बबनराव लोणीकरांवर निशाणा साधत त्यांना आव्हान देखील दिलंय. तर दुसरीकडे रविकांत तुपकरांनी दिसेल तिथे लोणीकरांनी चोप देण्याचं आव्हान करत त्यांना दम देखील दिलाय. लोणीकरच नव्हे तर महाराष्ट्राचे कृषीमंत्र्यांनी देखील शेतक-यांकडे कर्ज भरण्यासाठी तगादा लावलाय.. शेतक-यांनी लवकरात लवकर कर्ज भरावं असं विधान त्यांनी दोन दिवसांपूर्वी केलं होतं. दरम्यान यानंतर त्यांच्यावर देखील टीकेची झोड उठली होती.
लोणीकरांचं स्पष्टीकरण
मी शेतकऱ्यांविरोधात मरेपर्यंत बोलणार नाही. मी शेतकऱ्यांमुळेच आहे, असे लोणीकर म्हणाले. राजकीय नेत्यांकडून पैसे घेऊन सोशल मीडियावर मला ट्रोल करणाऱ्या टोळक्या विरोधात मी बोललो, असे लोणीकर म्हणाले. विरोधक पिंपळाचं पान जमिनीवर पडल्यानंतर पिंपळगाव जळाल्याचा भास निर्माण करतायत, असेही ते म्हणाले.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.