
गुढीपाडवा मेळाव्यात राज ठाकरे यांनी अनेक विषयांवर भाष्य केले. यावेळी ठाकरेंनी सध्या राज्यात सर्वांसमोर उभा ठाकलेला कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न, औरंगजेबाची कबर, लाडकी बहिण अशा अनेक विषयांना राज ठाकरे यांनी हात घातला. राज ठाकरे म्हणाले की, शिवाजी महाराज
.
पुरून उरणार तेच खरे मराठे
ठाकरे पुढे म्हणाले- औरंगजेबाच्या कबरीसमोर मोठा बोर्ड लावा की, आम्हाला संपवायला आलेला औरंगजेब इथे गाडला गेला. पुरून उरणार तेच खरे मराठे. औरंगजेब आम्हाला मारायला आला, तेव्हा त्याला इथेच पुरला, ही कबर त्याचाच पुरावा. औरंगजेब हा आमचा इतिहास आहे. इतिहास कशासाठी वाचायचा. इतिहासातून बोध घेण्यासाठी वाचायचा. अफजल खान आला. प्रतापगडावर मारला गेला. तिथेच त्याची कबर खोदली गेली. शिवाजी महाराजांच्या होकाराशिवाय त्याला पुरला नसेल. मग त्याला का पुरला. कारण जगालाही कळू द्या की, आम्ही कुणाला मारले आहे. आपण मराठ्यांनी ज्याला ज्याला गाडले आहे, त्यांची प्रतिके आपण नेस्तनाबूत करून चालणार नाही, जगालाही कळू द्या की आपण यांना गाडलंय.
छत्रपती शिवाजी महाराज हा एक विचार
छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे या हिंद प्रांतावर केलेला संस्कार आहे. तो एक चमत्कार आहे. ती एक विलक्षण घटना आहे. छत्रपती शिवाजी महाराज हा एक विचार आहे. तो विचार जन्माला यायच्या अगोदर या हिंद प्रांताची काय अवस्था होती. सर्व जातीचे लोक कुणा ना कुणाकडे कामाला होते. शिवाजी महाराजांचे वडील आदिलशाहीतच होते. त्यानंतर ते निजामशाहीत गेले. तो काळ वेगळा होता. परिस्थिती वेगळी होती, असे राज ठाकरे यांनी सांगितले.
राज ठाकरे म्हणाले, हिंद प्रांतात एक अत्यंत कडवट आणि प्रभावी स्वप्न एका व्यक्तीला पडले, त्या म्हणजे जिजाऊ साहेब. जिजाबाई त्यांचे स्वप्न, त्यांचे वडील असल्यापासून पाहत होत्या. त्यांना समजत नव्हते हे काय चालले आहे. आमची लोक या लोकांकडे चाकरी का करत आहेत. त्यानंतर हे हिंदवी स्वराज्य उभे राहिले.
औरंगजेब जिंकू शकला नाही
ठाकरे म्हणाले- औरंगजेबाचे राज्य हे अफगाणिस्तानपासून दक्षिणेपर्यंत आणि बंगालपर्यंत होते. शिवाजी महाराज जेव्हा आग्र्यावरून सुटले अन् महाराष्ट्रात परत आले, त्यानंतर त्यांचा राज्याभिषेक झाला. औरंगजेबाचा एक मुलगा महाराज गेल्यावर दक्षिणेत आला. त्या मुलाला राहायला जागा संभाजीराजे यांनी दिली. त्याला बरोबर घेतले. हा इतिहास वाचला गेला पहिजे. 1681 ते 1707 म्हणजे जवळपास 27 वर्ष औरंगजेब महाराष्ट्रात लढत होता. संभाजी राजांबरोबर लढला. त्यांना क्रूर पद्धतीने मारले. राजाराम महाराज, संताजी धनाजी, ताराराणी साहेब लढल्या. औरंगजेब एकही लढाई जिंकू शकत नव्हता. त्याला शिवाजी नावाचा विचार मारायचा होता. पण जमले नाही. सर्व प्रयत्न केले आणि तो मेला.
कबरीवर बोर्ड लावा, औरंगजेब इथे गाडला
राज ठाकरे म्हणाले- औरंगजेबची ती सजवलेली कबर काढा. त्या ठिकाणी नुसती कबर दिसली पाहिजे. त्या ठिकाणी मोठा बोर्ड लावा आणि त्यावर लिहा की, ‘आम्हा मराठ्यांना संपवयाला आलेला औरंगजेब इथे गाडला गेला’. औरंगजेब हा आमचा इतिहास आहे. इतिहास कशासाठी वाचायचा. इतिहासातून बोध घेण्यासाठी वाचायचा. अफजल खान आला. प्रतापगडावर मारला गेला. तिथेच त्याची कबर खोदली गेली
चित्रपटातून जागे होणारे हिंदू काही कामाचे नाही
छावा चित्रपटानंतर राज्यात निर्माण झालेल्या वादावर राज ठाकरे म्हणाले- चित्रपटाने जागे होणारे हिंदू काही कामाचे नाहीत. चित्रपट थिएटरातून उतरला की हे सर्व उतरले. छत्रपती संभाजी महाराजांचे बलिदान तुम्हाला आता कळले का? विक्की कौशलमुळे संभाजी महाराज समजले का? अक्षय खन्ना औरंगजेब बनून आल्यावर तुम्हाला औरंगजेब कळायला लागला? व्हॉट्सअपवर इतिहास नाही वाचता येत. इतिहास वाचण्यासाठी पुस्तकात डोके घालावे लागते. खासकरून माझे या तरुण मुलामुलींना सांगणे आहे की, तुम्ही पुस्तकात डोकवून पाहा.
इतिहासाच्या पानात खोलवर गेला तर…
पुढे बोलतांना ठाकरे म्हणाले- हल्ली कोणीही इतिहासावर बोलतात, विधानसभेतही इतिहासावर बोलतात. औरंगजेबावर बोलतात. माहीत आहे का औरंगजेब काय प्रकरण होते. औरंगजेबाचा जन्म गुजरातचा. त्याचा जन्म हा दाहोद या गावात झाला होता. इतिहासातून जातीपातीत भिडवणे सोपे आहे. त्यांना राजकीय पोळी भाजून घ्यायची आहे. त्यांना संभाजी राजांशी आणि औरंगजेबाशीही काहीच देणेघेणे नाही. तुमची माथी फक्त भडकवायची आहेत. कसला इतिहास बोलतात. आपण इतिहासाच्या पानात खोलवर गेलात, तर अपेक्षा आणि भावनांची भांडी फुटतील.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.