
Nitin Gadakari: छत्रपती शिवाजी महाराज 100 टक्के सेक्युलर होते. असं वक्तव्य केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी केलंय. दिल्लीमधील एका कार्यक्रमात बोलताना नितीन गडकरींनी हे वक्तव्य केलंय. भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनीही गडकरींच्या विधानाला समर्थन दिलं. मोहन भागवत यांनी छत्रपती शिवाजी महाराज संघाचे आदर्श असल्याचं म्हटलंय.
छत्रपती शिवाजी महाराज 100 टक्के सेक्युलर होते, असं वक्तव्य केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी केलंय. राजधानी दिल्लीत कादंबरीकार विश्वास पाटील यांच्या पुस्तकांचा प्रकाशन सोहळा पार पडला. याच कार्यक्रमात बोलताना गडकरींनी शिवराय एक सेक्युलर आणि संवेदनशील राजे असल्याचं म्हटलंय. मात्र दुसरीकडे भाजपचे नेते आणि मंत्री नितेश राणेंनी गडकरींच्या अगदी विरोधाभासी वक्तव्य केलंय. छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैनात मुस्लीम मावळे नव्हते, असं वक्तव्य नितेश राणेंनी केलं होतं.
भाजपचे नेते आणि मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनीही गडकरींच्या विधानाला समर्थन दिलंय. छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यात सर्वधर्माचे लोक होते असं म्हणत बावनकुळेंनी गडकरींच्या विधानाला पुष्टी दिली.
आरएसएसचे सरसंघचालक मोहन भागवत यांनीही शिवरायांना आदर्श म्हटलंय. छत्रपती शिवाजी महाराज हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे आदर्श आहेत, असं भागवतांनी म्हटलंय.
एकीकडे भाजपचे वरिष्ठ नेते नितीन गडकरी शिवाजी महाराजांना सेक्युलर म्हणतात, तर दुसरीकडे भाजपचेच राज्यातील नेते आणि मंत्री नितेश राणे मात्र महाराजांच्या सैन्यात मुस्लीम मावळे नसल्याचं जाहीर वक्तव्यं करतात. त्यामुळे इतिहासाची मोडतोड होण्यापेक्षा तथ्यांच्या आधारावर ख-या इतिहासाचा प्रसार होणं, अत्यंत महत्त्वाचं आहे.
‘जय शिवराय’च्या मुद्द्यावरून नितेश राणेंनी राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला डिवचलं
मंत्री नितेश राणेंनी ‘जय शिवराय’च्या मुद्द्यावरून शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांना डिवचलं आहे. ज्यांचा पक्ष औरंगजेबाच्या विचारावर चालतो त्यांनी जय शिवराय बोलू नये त्यांनी त्याऐवजी अल्ला हू अकबर बोलावं असा सल्ला नितेश राणेंनी दिला आहे. यावरून आता आरोप प्रत्यारोप सुरू झालेत. मत्स आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणेंनी ‘जय शिवराय’च्या मुद्द्यावरून शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांना डिवचलंय. ज्यांचा पक्ष औरंगजेबाच्या विचारावर चालतो त्यांनी जय शिवराय बोलू नये. त्यांनी त्याऐवजी अल्ला हू अकबर बोलावं असा सल्ला नितेश राणेंनी दिलाय. दरम्यान शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना फोनवर हॅलो ऐवजी जय शिवराय बोलण्याचा सल्ला दिला होता. त्यावरून नितेश राणेंनी सुनावलं आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाने जय शिवराय म्हणण्याच्या घेतलेल्या निर्णयाचं आमदार अमोल मिटकरी यांनी स्वागत केलंय. दरम्यान छत्रपती शिवजी महाराजांचं नाव आपण आदरानं घेतो. त्यामुळे या निर्णयाचं स्वागत करायला हवं असं शरद पवारांच्या पक्षाचे आमदार रोहित पवारांनी म्हटलं आहे. छत्रपती शिवाजी महाराज हा महाराष्ट्राच्या अस्मितेचा विषय आहे. तो राजकारणाचा नाही. मात्र दुर्दैवाने राज्यात केवळ राजकारणासाठी शिवरायांच्या नावाचा वापर होत असल्याचं पाहायला मिळतंय. हे खूप वेदनादायी आहे.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.