
जम्मू काश्मीरच्या पहलगाम अतिरेकी हल्ल्यानंतर भारत – पाकमधील तणाव वाढला आहे. या दोन्ही देशांत केव्हाही युद्ध पेटले जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे केंद्र सरकारने खबरदारी म्हणून देशभरातील महत्त्वाच्या शहरांत युद्धाचे मॉक ड्रील करण्याचा निर्णय घेतला आहे.
.
छत्रपती संभाजीनगर येथील रेल्वे स्थानकावर झालेल्या मॉक ड्रिलच्या वेळी सुरक्षा यंत्रणा तसेच बचाव पथके घटनास्थळी दाखल झाली होती. यावेळी आग लागल्यावर किंवा हल्ला झाल्यावर सामान्य नागरिकांनी काय केले पाहिजे याचे प्रात्यक्षिक दाखवण्यात आले. आग लागल्यास तातडीने अग्निशमन दलाने घटनास्थळी दाखल होत आग विझवण्याचे काम केले. मॉक ड्रिल सुरू होण्यापूर्वी सायरन वाजवण्यात आला होता.
दरम्यान, महाराष्ट्रातील 16 ठिकाणांचा समावेश आहे. या ठिकाणांची 3 गटांत विभागणी करण्यात आली आहे. सर्वात पहिला गट हा अतिसंवेदनशील ठिकाणांचा आहे. यात देशाची आर्थिक राजधानी मुंबईसह लगतच्या उरण व तारापूर या 2 ठिकाणांचा समावेश आहे. दुसऱ्या गटात ठाणे, पुणे, नाशिक, रोहा -धाटाव – नागोठणे, मनमाड, सिन्नर, थळ वैशेत, पिंपरी चिंचवड या ठिकाणांचा समावेश आहे.
तर तिसऱ्या गटात छत्रपती संभाजीनगर, भुसावळ, रायगड, रत्नागिरी, व सिंधुदुर्ग या ठिकाणांचा समावेश आहे. या तिन्ही गटांतील 16 ठिकाणांवर बुधवारी युद्धाची मॉकड्रील केली जाईल. त्यामुळे तेथील प्रशासनाने त्याची जय्यत तयारी सुरू केली आहे.
वीज पुरवठा तयार करून ब्लॅकआऊट केले जाणार
या मॉकड्रील अंतर्गत हवाई हल्ल्यावेळी वाजवले जातात तसे सायरन वाजवले जातील. तसेच अनेक शहरांत वीज पुरवठा खंडीत करून ब्लॅकआऊट केले जाईल. सायरन वाजताच नागरिकांना सुरक्षित आश्रयस्थळी धाव घ्यावी लागले. स्थानिक प्रशासन, पोलिस, होमगार्ड्स, एनसीसी, एनएसएस, नेहरू युवा केंद्र संघटना व शाळा व महाविद्यालयीन विद्यार्थी या मॉकड्रीलमध्ये सहभागी होणार आहेत. यासंबंधी उपरोक्त सर्वच ठिकाणच्या प्रशासनाने योग्य ती पूर्वतयारी केली आहे.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.