
छत्रपती संभाजीनगर शहराला शाश्वत आणि अखंड पाणीपुरवठा करण्याच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या 56 एमएलडी पुनर्जीवन योजनेतील 26 एमएलडी क्षमतेच्या जलशुद्धीकरण केंद्राचे जलपूजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज फारोळा येथे पार पडले. यावेळी बोल
.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, “छत्रपती संभाजीनगर हे महाराष्ट्रातील होऊ घातलेले इंडस्ट्रियल मॅग्नेट आहे. मात्र, या शहरात पिण्याच्या पाण्याची तीव्र समस्या होती. या समस्येवर उपाय म्हणून 2019 साली योजनेला मंजुरी देण्यात आली. 2023 मध्ये योजना सुधारित करताना तिचा खर्च 1,800 कोटींवरून 2,700 कोटी रुपयांपर्यंत वाढवण्यात आला. यामध्ये काही योजनांचे पुनर्वसन देखील सहभागी केले.”
26 एमएलडी क्षमतेचा टप्पा पूर्ण झाल्याने शहराला काहीसा दिलासा मिळणार आहे. पुढील 200 एमएलडी क्षमतेचा टप्पा डिसेंबरपर्यंत पूर्ण होईल, तर 400 एमएलडी क्षमतेचे संपूर्ण काम मार्चपर्यंत पूर्ण करण्याचा आमचा प्रयत्न आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
फडणवीस पुढे म्हणाले, “प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर 24×7 पाणीपुरवठा योजना राबवता येईल. संभाजीनगरला पुढील 25-30 वर्षांसाठी शाश्वत पाणीपुरवठ्याची हमी ही योजना देईल. या प्रकल्पासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली अमृत योजनेतून निधी मिळाला आहे, तर महाराष्ट्र शासनाने महानगरपालिकेचा हिस्सा उचलला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आम्ही तिघांनीही वेळोवेळी आलेल्या सर्व मागण्या पूर्ण करत प्रकल्प पुढे नेला आहे.”
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.