
Chhatrapati Sambhaji Nagar crime: छत्रपती संभाजीनगरमध्ये एक थरारक घटना घडली आहे. उद्योजक संतोष लड्डा यांच्या घरावरील दरोडा प्रकरणातील संशयित आरोपीचं संभाजीनगर पोलिसांनी एन्काऊंटर केला आहे. अमोल खोतकर असं या एन्काऊंटर केलेल्या संशयित आरोपीचं नाव आहे. आरोपीने पोलिसांवर गाडी घालण्याचा प्रयत्न केल्यानंतर झालेल्या चकमकीत अमोल खोतकरचा मृत्यू झाला आहे.
अमोल खोतकर याने वडगाव कोल्हाटीमध्ये अमोलने पोलिसांच्या अंगावर गाडी घातली त्यानंतर पोलिसांवर फायरिंग केल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. दरम्यान पोलिसांनी प्रत्युत्तरात केलेल्या गोळीबारात अमोल खोतकरचा मृत्यू झाला. लड्डा दरोड्याचा सर्व मुद्देमाल अमोल खोतकर याच्याकडे असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यामुळे पोलीस त्याच्या मागावर होते.
दरम्यान अमोल खोतकरच्या एन्काऊंटरनंतर त्यांच्या कुटुंबियांनी या एन्काऊंटरवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. सुपारी घेऊन पोलिसांनी हा एन्काऊंटर केल्याच आरोप अमोल खोतकरच्या कुटुंबियांनी केला आहे. छत्रपती संभाजीनगरच्या बजाजनगरमध्ये उद्योगपती संतोष लड्डा यांच्या घरावर 15 मे रोजी दरोडा पडला होता. यात चोरट्यांनी मोठ्या प्रमाणावर सोनं आणि चांदी चोरली होती. दरोड्यावेळी लड्डा यांचा केअरटेकर बंगल्यात होता. दरोडेखोरांनी केअरटेकरच्या डोक्याला बंदुक लावून लूट केली. दरोड्यात 8 किलो सोनं आणि 40 किलो चांदी चोरण्यात आली होती.
मोठ्या प्रमाणावर सोनं चांदी चोरीला गेल्यानं या दरोड्याच्या तपासाकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. त्यातच शहरातील वाढत्या दरोड्यांच्या पार्श्वभूमीवर संभाजीनगरचे पालकमंत्री संजय शिरसाट यांनी पोलिसांवरच निशाणा साधला होता.. दरोड्याच्या गुन्ह्यात पोलीस सहभागी असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्याचं संजय शिरसाट यांनी म्हटलं होतं.
पालकमंत्री संजय शिरसाट यांनी संभाजीनगरमधील दरोड्यात पोलिस खात्यातील काहींचा सहभाग असल्याच आरोप केला. त्याला एक दिवस उलटत नाही तोच एका मोठ्या दरोड्यातील आरोपीचा एन्काऊंटर झालाय. त्यामुळे उलटसुलट चर्चांना सुरूवात झाली आहे..
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.