
छत्रपती संभाजीनगर शहरात सायंकाळी सहाच्या सुमारास धुळीचे वादळ निर्माण झाले होते. सोसाट्याच्या वाऱ्यासह धुळीचे लोट सर्वत्र पसरले होते. शहरातील सातारा परिसरात अक्षरशः समोरचे दिसत नव्हते इतकी धूळ पसरली होती. जवळपास 15-20 मिनिटे हा वादळी वारा सुरू राहिला
.
गेल्या काही दिवसांपासून छत्रपती संभाजीनगरमध्ये पावसाची उघडीप झाली असून उकाडा वाढला आहे. परंतु आज दिनांक 11 जून रोजी सकाळपासूनच पावसाळी वातावरण निर्माण झाले होते. त्यात सायंकाळी वादळी वाऱ्याने शहराला घेरले होते व धुळीत संपूर्ण शहर गुडूप झाले होते.
पहा वादळी वाऱ्या दृश्य
जोरदार वादळाचा शिरूर तालुक्यातील गावांना फटका, ब्रम्हनाथ येळंब, फुलसांगवी नांदेवाली बावी या गावातील वृक्ष वादळाने उपटून पडले खरवंडी कासार नवगण राजुरी महामार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाले होती.
दरम्यान, आज महाराष्ट्रात अनेक भागांमध्ये पावसाचा इशारा देण्यात आला होता. तळकोकणासह मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा येथे ऑरेंज अलर्ट देण्यात आले आहेत. प्रादेशिक हवामान अंदाजानुसार, राज्याच्या अंतर्गत भागात कमाल तापमानात 2-3 अंशांची घट होणार असून येत्या तीन ते चार दिवसात कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात मोसमी पाऊस जोरदार हजेरी लावणार आहे.
हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार, 12 जूनपासून देशभरात मान्सून पुन्हा सक्रीय होणार असून पुढील काही दिवसांत पश्चिम किनाऱ्यांवर पावसाचा जोर वाढणार आहे. कोकण आणि मध्य महाराष्ट्रात मध्यम ते तीव्र स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. पावसाला पोषक वातावरणामुळे राज्यभरात प्रचंड उकाडा वाढला आहे. तसेच काही भागांमध्ये पाऊस देखील पडत आहे.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.