digital products downloads

छत्रपती संभाजीनगरमध्ये 8 जणांवर वीजचोरीचा गुन्हा: थकबाकीपोटी खंडित वीजपुरवठा परस्पर जोडल्याने कारवाई – Chhatrapati Sambhajinagar News

छत्रपती संभाजीनगरमध्ये 8 जणांवर वीजचोरीचा गुन्हा:  थकबाकीपोटी खंडित वीजपुरवठा परस्पर जोडल्याने कारवाई – Chhatrapati Sambhajinagar News



छत्रपती संभाजीनगर येथे वीजबिलाच्या थकबाकीपोटी खंडित केलेला वीजपुरवठा बेकायदेशीरपणे परस्पर जोडल्याप्रकरणी महावितरणने आठ जणांविरोधात पोलिसांत गुन्हे दाखल केले आहेत. महावितरणने वीजबिल थकवणाऱ्या ग्राहकांविरोधात धडक मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेअंतर्गत वीजबिल न भरणाऱ्या ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्याची कारवाई केली जात आहे. तसेच, कारवाई केलेल्या ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित आहे की नाही, याची पडताळणी करण्यासाठी महावितरणने पथके नेमली आहेत. या कारवाईत छावणी परिसरातील दिलीप सुदाम सुतार यांच्यासह एकूण आठ जणांचा समावेश आहे. पैठणगेट, खोकडपुरा येथील शेख मजहर शेख मुनीर बागवान, बशीर फतेह एम.डी. व मोहंमद उस्मान खान तसेच समतानगरातील सुभाष किसन झोंबाडे यांचा वीजपुरवठा थकबाकीमुळे खंडित करण्यात आला होता. त्यांनी अनधिकृतपणे वीज जोडून महावितरणचे आर्थिक नुकसान केले. याप्रकरणी सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चिकलठाणा परिसरातील अमिना पार्क येथील सैदाबी शेख मुनाफ, नारेगाव येथील सुरय्याबी शेख महेबूब आणि सिडको एन-२ परिसरातील भरत काशिनाथ दुगम यांच्यावरही थकबाकीपोटी वीजपुरवठा खंडित केल्यानंतर परस्पर जोडणी केल्याप्रकरणी सिडको पोलिस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल झाले आहेत. छावणी परिसरातील दिलीप सुदाम सुतार यांच्यावर छावणी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. महावितरणने अशा परस्पर जोडणी करणाऱ्या ग्राहकांवर कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. अनधिकृत वीजपुरवठ्यामुळे प्राणांतिक अपघाताचा धोकाही असतो. त्यामुळे ग्राहकांनी अनधिकृतरीत्या वीजपुरवठा जोडू नये. तसेच, वीजपुरवठा खंडित झालेल्या ग्राहकांना शेजाऱ्यांनीही अनधिकृतरीत्या वीजपुरवठा देऊ नये, अन्यथा त्यांचाही वीजपुरवठा खंडित करून कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे महावितरणच्या छत्रपती संभाजीनगर परिमंडलाचे मुख्य अभियंता पवनकुमार कछोट यांनी सांगितले.

Doonited Affiliated: Syndicate News Hunt

This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.

Source link

Related posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Uttarakhand News Doonited
Social media & sharing icons powered by UltimatelySocial
Instagram
WhatsApp