
छत्रपती संभाजीनगर येथे शिवसेना ठाकरे गटाकडून हंडा मोर्चा काढण्यात आला. यावेळी आदित्य ठाकरे उपस्थित होते. शहरात पाणी प्रश्न भीषण झालेला आहे, याला कोणत्याही वचनांची पूर्तता न करणारे सरकार जबाबदार आहे, हे सरकारी अपयश आहे, अशी टीका आदित्य ठाकरे यांनी केल
.
शिवसेना ठाकरे गटाच्या लबाडांनो पाणी द्या आंदोलनाचा समारोप करण्यात आला. यावेळी आदित्य ठाकरे सरकारवर टीका करताना म्हणाले, शहरात पाणी प्रश्न भीषण झालेला आहे, याला कोणत्याही वचनांची पूर्तता न करणारे सरकार जबाबदार आहे, हे सरकारी अपयश आहे. या सरकारने अनेक वचने दिले, पण त्याची पूर्तता केली नाही. राज्यात नागरिक, शेतकरी, महिला सर्वांवर अन्याय वाढत आहे. मात्र, सरकारकडून कोणतीही वचनपूर्ती होत नाही. पाणी प्रश्नांवर आमच्यावर टीका करणाऱ्यांनी थोडी तरी लाज बाळगावी.


गेल्या महिन्यापासून शहर पाणीप्रश्नावर शिवसेना ठाकरे गटाकडून आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाचा समारोप आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वात करण्यात आला. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेवर आज मोर्चा काढण्यात आला. क्रांती चौकातून सायंकाळी मोर्चास सुरुवात झाली. लबाडांनो पाणी द्या, असे बॅनर हातात घेऊन काही आंदोलक सहभागी होते. माजी मंत्री आदित्य ठाकरे, विधान परिषद विरोधीपक्ष नेते अंबादास दानवे, माजी खासदार चंद्रकांत खैरे यांच्यासह आंदोलक जोरदार घोषणाबाजी करत महापालिकेकडे रवाना झाले होते.
यावेळी अंबादास दानवे म्हणाले, नवीन पाणी पुरवठा योजना 1680 कोटी रुपयांची होती. नंतर ती 2740 कोटी रुपयांची कशी झाली? उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते तेव्हा मार्गी लागलेले काम आता अत्यंत संथगतीने चालू आहे. या योजनेचे काम 3 फेब्रुवारी 2024 रोजी पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र सरकारचा वचक नसल्याने योजनेचे काम दोन वर्ष पूर्ण होऊ शकत नसल्याचे दानवे यांनी म्हटले आहे.
महाराष्ट्र हितासाठी एकत्र येऊ- आदित्य ठाकरे
दरम्यान, या आंदोलनावेळी पत्रकारांनी आदित्य ठाकरे यांना राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचे युतीविषयी प्रश्न विचारला. यावर उत्तर देताना आदित्य ठाकरे म्हणाले, उद्धव ठाकरेंनी युतीसाठी प्रतिसाद दिला होता. महाराष्ट्र हितासाठी जे कोणी साफ मनाने येतील त्यांना आम्ही सोबत घेऊ. साद-प्रतिसाद, टाळी हे चालूच असते. पण आम्ही महाराष्ट्र हिताचं बोलतोय. सेटिंगचे राजकारण करणार नाही, आम्ही स्वच्छ दिलाने पुढे येतोय. जे कोणी सोबत येतील त्यांना सोबत घेऊ. मी कोणत्या एका पक्षाबद्दल बोलत नाही.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.