
Worlds Safest Countries: तुम्ही जगातील सर्वात सुरक्षित देशांमध्ये प्रवास करण्याचा किंवा राहण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक महत्वाची यादी समोर आलीय. आपल्या देशाच्या सुरक्षेबद्दल जागरूक राहणे आणि ती सुधारण्यासाठी पावले उचलणे किती महत्वाचे आहे? हे या यादीतून तुमच्या लक्षात येईल. ग्लोबल सेफ्टी इंडेक्स 2025 ने जगातील सर्वात सुरक्षित देशांची एक नवीन यादी जाहीर केलीय. यातून समोर आलेली आकडेवारी पाहून तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसू शकतो. कारण पाकिस्तानने भारताला मागे टाकून चांगले स्थान मिळवलंय. तर अमेरिका, ब्रिटन आणि चीनसारख्या मोठ्या देशांना तुलनेने मागे स्थान मिळालंय. कोणत्या देशाला किती रेटिंग मिळाले? या आकडेवारीमागील खरी कारणे काय असू शकतात? सविस्तर जाणून घेऊया.
पाकिस्तान आणि भारताच्या सुरक्षा क्रमवारीत मोठा फरक
नुम्बेओने जाहीर केलेल्या ग्लोबल सेफ्टी इंडेक्स 2025 मध्ये पाकिस्तान 65 व्या क्रमांकावर आहे तर भारत 66 व्या क्रमांकावर आहे. सुरक्षेच्या बाबतीत पाकिस्तानने आता भारताला मागे टाकलंय. हे दोन्ही देशांसाठी एक महत्त्वाचे संकेत आहे. यातील मनोरंजक गोष्ट म्हणजे सुरक्षेच्या बाबतीत अनेकदा अव्वल देशांमध्ये स्थान मिळवणारा अमेरिका या यादीत 89 व्या क्रमांकावर आहे. जो दक्षिण आशियाई दोन्ही देशांपेक्षाही कमी आहे.
अँडोरा आणि युएई सारख्या देशांचे वर्चस्व
या यादीत अँडोराने 84.7 गुणांसह सर्वात सुरक्षित देश म्हणून पहिले स्थान पटकावले आहे. त्यानंतर संयुक्त अरब अमिराती (84.5), कतार (84.2), तैवान (82.9) आणि ओमान (81.7) यांचा क्रमांक लागतो. मजबूत सुरक्षा व्यवस्था, कमी गुन्हेगारी दर आणि चांगल्या राहणीमानामुळे हे देश या क्रमवारीत अव्वल स्थानावर आहेत.
हा डेटा काय सांगतो?
नुम्बेओने जाहीर केलेले हे रँकिंग वेगवेगळ्या देशांतील नागरिकांनी केलेल्या सुरक्षा सर्वेक्षणावर आधारित आहे. यामध्ये दिवसा आणि रात्री लोक त्यांच्या सुरक्षिततेबद्दल किती समाधानी आहेत हे दिसून आले. याव्यतिरिक्त चोरी, शारीरिक हल्ला, छळ, भेदभाव आणि इतर हिंसक गुन्ह्यांचे दर देखील समाविष्ट आहेत. जगभरातील सुरक्षिततेची भावना नेहमीच सरकारने सादर केलेल्या आकडेवारी आणि माहितीपेक्षा वैयक्तिक अनुभव आणि भावनांवर आधारित असते, हे या यादीतून स्पष्ट होते.
भारत आणि पाकिस्तानमध्ये एका गुणाचा फरक
भारत आणि पाकिस्तानच्या क्रमवारीत फक्त एका गुणाचा फरक आहे. परंतु ही दोन्ही देशांसाठी चिंतेची बाब असू शकते. भविष्यात या क्रमवारीत चांगले स्थान मिळवण्यासाठी भारताला आपली सुरक्षा व्यवस्था सुधारण्यासाठी पावले उचलावी लागणार आहे. सुरक्षा केवळ सरकार किंवा कायदा आणि सुव्यवस्थेशी जोडलेली नाही तर सामान्य जनतेच्या अनुभवांशी आणि धारणांशी देखील जोडलेली असते. पाकिस्तान भारताला मागे टाकतोय, अमेरिका खालच्या क्रमांकावर येतेय. लहान देश वरच्या स्थानावर जातायत. आपल्याला आपली सुरक्षा व्यवस्था सुधारण्यासाठी अधिक काम करण्याची आवश्यकता असल्याचे यातून स्पष्ट होते.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.