
आप सरकारच्या काळात जे घोटाळे झाले, त्यांच्यावर जे आरोप झाले त्या प्रकरणात केजरीवाल आणि त्यांचे सहकारी जेलमध्ये गेले ते आरोप लोकांना पटले, म्हणून जनतेने त्यांना पराभूत केले, असे भाजपचे नेते प्रवीण दरेकर यांनी म्हटले आहे.
.
प्रवीण दरेकर पुढे बोलताना म्हणाले की, जनतेला गृहीत धरणे आम आदमी पक्षाला महागात पडले. त्यांना वाटत होते की फक्त आम्हीच आहोत. तर भाजपने गांभीर्याने निवडणूक लढवत, 50 टक्क्यांवर मते घेण्यासाठी प्रयत्न केले आणि त्यामुळे दिल्लीतील जनतेने त्यांना नाकारले.
नौंटकीला लोकं कंटाळले
दिल्लीतील नौंटकीला लोकं कंटाळले होते. पराभवाचे विश्लेषण करायचे असेल तर अरविंद केजरीवाल यांनी जो भ्रष्टाचाराच्या विरोधात जो आव आणला होता की केवळ आम्हीच प्रतीभासंपन्न आणि अख्ख जग भ्रष्टाचारी हा भ्रमाचा भोपळा जनतेने फोडला आहे. लोकांना समजले केजरीवाल आणि त्यांचे नेते जसे स्व:ला दाखवतात तसे ते नाहीत. हे त्यांच्या जेलवारी आणि त्यांच्यावर झालेल्या आरोपांमधून जनतेला समजले. यामुळे मतदारांमध्ये त्यांच्याविरोधात जनतेत रोष होता. जो मतदानरुपी बाहेर पडला.
भाजपची दाखवलेली भीती लोकांना आवडली नाही
प्रवीण दरेकर म्हणाले की, दिल्लीत भाजपने जनतेला जी चांगली आश्वासन दिली ती लोकांनी आवडली. यात एससी, एसटी वर्गांना आर्थिक मदतीलचा विषय, महिलांना मासिक मदत करण्याची घोषणेमुळे मतदार प्रभावित झाले. केजरीवाल यांच्या देखाव्याला न भुलता जनतेने विकासाला प्राधान्य दिले. केंद्र सरकारच्या सहाय्याने दिल्लीचा चांगला विकास होऊ शकेल हे लक्षात आल्याने मतदार भाजपच्या बाजूने उभा राहिला. एका मौलवीने ऑन कॅमेरा सांगितले की ही लोकं भाजपची भीती दाखवत मतदान मागत होते. ते लोकांना आवडले नाही.
काँग्रेसला लगावला टोला
प्रवीण दरेकर म्हणाले की, दिल्ली निवडणुकीसाठी उत्तम नियोजन करण्यात आले. चांगले आश्वासने दिली यातून जनतेने भाजपवर विश्वास ठेवला. आता हे सर्व आश्वासने आम्ही पूर्ण करणार आहोत. या निवडणुकीत काँग्रेस कुठेच रेसमध्ये नव्हते. कारण देशात काँग्रेस हे आपसोबत आहेत. जिथे सोयीचे आहे तिथे विरोधात आहे. देशातकाँग्रेस संपली आहे हे लक्षात घेत जनतेने त्यांना मतदान करणे टाळले, असा टोला ही दरेकरांनी लगावला आहे.
आप दिल्लीच्या विकासात बाधा ठरणारा पक्ष
आप हा दिल्लीच्या विकासामध्ये बाधा ठरणारा पक्ष होता. सर्व मोफत देत राज्य चालवण्याचा प्रयत्न त्यांनी केला, तो प्रयत्न निश्चितच विकास आणि प्रगतीमध्ये आडकाठी टाकणार आहे, असे भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटले आहे.
सुधीर मुनगंटीवार पुढे बोलताना म्हणाले की, तेलंगणा, आंध्र प्रदेश, आणि आता दिल्लीच्या जनतेने सांगितले की देशाच्या प्रगतीचा संकल्प करत त्यासाठी मेहनत करणारा पक्ष निवडून आला पाहिजे. दिल्लीत आता भाजपचे सरकार आल्यावर वेगाने प्रगती पथावर जाईल. वाचा सविस्तर
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.