
श्रावण महिन्यातील आजचा अखेरच्या श्रावणी सोमवारी छत्रपती संभाजीनगर शहरात असलेल्या जनेश्वर महादेव मंदिराच्या माध्यमातून या ठिकाणी सुरू असलेल्या सामाजिक कार्याचा आढावा आपण घेणार आहोत. छत्रपती संभाजीनगर शहरात अनेक प्राचीन आणि ऐतिहासिक मंदिरे आहेत. मात्र,
.
संत जनार्दन स्वामी यांनी या मंदिराची स्थापना करून केवळ धार्मिक नाही तर विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक कवाडे खुली केली. त्यामुळेच या मंदिराचे महत्त्व छत्रपती संभाजीनगर शहरासाठी अधिक महत्त्वाचे ठरते.
जनेश्वर महादेव मंदिर – 1974 मध्ये बांधकाम पूर्ण
छत्रपती संभाजीनगर शहराच्या बाहेर असलेले पहाडसिंगपुरा परिसरामध्ये वेरूळचे राष्ट्रसंत सद्गुरु जनार्दन स्वामी यांनी जनेश्वर महादेव मंदिराची स्थापना केली. 1974 मध्ये या मंदिराचे बांधकाम पूर्ण झाले होते. या परिसरातील नागरिकांनी एकत्र येऊन या मंदिर उभारणीच्या कामामध्ये हातभार लावला. परिसरातील अनेक नागरिकांनी मंदिरासाठी स्वतः परिश्रम करत सहकार्य केले होते.
गरजू विद्यार्थ्यांना शिक्षणाचे कवाडे खुली झाली
हा परिसर शैक्षणिकदृष्ट्या महत्त्वाचा मानला जातो. मराठवाडा विद्यापीठ त्याकाळी मराठवाड्याच्या इतर जिल्ह्यातून आलेले गरीब विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाचे केंद्र होते. त्यामुळे अनेक सामन्य कुटुंबातील मुले या ठिकाणी शिक्षण घेत होते. या विद्यार्थ्यांसाठी मोफत राहण्याची व्यवस्था बाबाजींनी केली. याच मंदिर परिसरात करण्यात आलेल्या व्यवस्थेतून आपले शिक्षण पूर्ण करून बाहेर पडलेले अनेक गरजू विद्यार्थ्यांना शिक्षणाचे कवाडे खुले झाले. यातील अनेक विद्यार्थी आज विविध क्षेत्रात काम करतात.
नागरिकांसाठी श्रद्धेचे स्थान
अत्यंत जुन्या शैलीत या मंदिराचे बांधकाम झाल्याचे दिसून येते. याच परिसरात असलेल्या हनुमान टेकडीच्या जीर्णोद्धार करण्याचे काम देखील जनार्दन स्वामी यांनी केले. आज हनुमान टेकडी म्हणजे छत्रपती संभाजीनगर मधील नागरिकांसाठी श्रद्धेचे स्थान बनले आहे. या परिसरातील अनेक धार्मिक वास्तूंना जनार्दन स्वामींनी वैभव प्राप्त करुन दिले.
राष्ट्रसंत सद्गुरु जनार्दन स्वामी यांना बाबाजी नावानेच ओळखत
श्री राष्ट्रसंत सद्गुरु जनार्दन स्वामी (मौनगिरी) महाराज यांचा जन्म गुरुवार दि. २४ सप्टेंबर १९१४ शके १८३६ रोजी सकाळी ७:४५ वा दहेगाव मधील अतिशय श्रीमंत पाटील घराण्यात झाला. बाबाजींच्या वडिलांचे नाव “श्री आप्पाजी पाटील” व आईचे नाव “मातोश्री म्हाळसादेवी होते. जनार्दन स्वामी महाराज यांचे आजोळ “टापरगाव”. आयुष्यभर बाबाजींनी शिव भक्तीचा प्रचार आणि प्रसार केला. १६ वर्ष कठोर तपसाधना केली त्यानंतर पिंडी मधून ३ वेळेस भगवान शिवाचे दर्शन झाले. श्री बाबाजी लहान पानापासून विरक्त, अनासक्त, वैराग्यशील, जनकल्याणचा वारसा घेतलेले. बाबाजींनी सुरू केलीली परंपरा – जप, तप, अनुष्ठान, यज्ञ, पारायण आणि नित्य नियम विधी. बाबाजींनी भक्तांकरता ४ अमृत तत्व सांगितली आहे, ती अशा प्रकारे – पर धन, पर स्त्री, पर अन्न आणि पर निंदा या चार गोष्टींचा त्याग हीच यशस्वी जिवनाची गुरुकिल्ली.
गरीब विद्यार्थी वसतीगृह निर्माण केले
बाबाजी हे दिव्य ईश्वर विभूती आहेत अशी अनेकांना अनुभूती आली. फार मोठा लोकसंग्रह श्री बाबाजींच्या कृपाशिर्वादाने प्राप्त झाला. त्याठिकाणी दररोज नित्यनियम विधी पाठ त्यानंतर प्रवचन ,संस्काराचे पाठ, यज्ञ याग, जप अनुष्ठान, अशा परमार्थी मुल्यांची समाजातील समान्य घटकांकडून करून घेतले. देशाची भावी पिढी उभी राहण्यासाठी बाबाजी आधार स्तंभ बनले. बाबाजींनी आश्रमाच्या ठिकाणी गरीब विद्यार्थी वसतीगृह निर्माण केले. हि परंपरा आज पर्यंत चालू आहे. मनुष्य जन्म हा स्वैराचारासाठी नसून आध्यात्मिक उन्नतीसाठी आहे. याचे शिक्षण देतांना परधन, परस्त्री, परनिंदा, परान्न ह्या चार गोष्टी कटाक्षाने टाळल्या पाहिजे. यावर त्यांचा भर होता. आयुष्याचा प्रत्येक क्षण परोपकार लोकशिक्षणासाठी कसा जास्तीत जास्त खर्च करता येईल याचा सतत ध्यास घेतला होता.

बाबाजींनी सुरू केलेली परंपरा आज तागायत सुरू
जनार्दन स्वामी यांचे वास्तव्याने पावन झालेल्या या भूमीवर आजही सामाजिक कार्यक्रमातून विविध उपक्रम राबवले जातात. धार्मिक उत्सवाबरोबरच या ठिकाणी विद्यार्थ्यांना आजही मोफत राहण्याची व्यवस्था केली जाते. बाबाजींनी आखून दिलेल्या नियमात राहणाऱ्या विद्यार्थ्यांनाच या ठिकाणी राहण्याची व्यवस्था केली जाते. बाबाजींनी सुरू केलेली ही परंपरा आज तागायत सुरू असून विद्यार्थ्यांना ज्ञानार्जनाच्या कार्यात या माध्यमातून मदत केली जात आहे.
छत्रपती संभाजीनगर शहरातील महादेव मंदिरांची माहिती देणाऱ्या इतरही बातम्या वाचा….
शंभो शंकरा करुणाकरा: संभाजीनगरचे तारकेश्वर महादेव मंदिर, पेशव्यांच्या काळात स्थापना; ऐतिहासिक वाडा देतो समृद्ध परंपरेची साक्ष
श्रावण महिना सुरू आहे. सध्या मोठ्या संख्येने भाविक मंदिरांमध्ये येत आहेत. छत्रपती संभाजीनगर शहरात असे अनेक मंदिरे आहेत, ज्यांना ऐतिहासिक आणि सांस्कृतिक पार्श्वभूमी आहे. अशातच ऐतिहासिक बीबी का मकबरा असलेल्या परिसरात एक प्राचिन तारकेश्वर महादेव मंदिर आहे. परिसरात अनेक ऐतिहासिक वास्तू असलेल्या या परिसरात जुन्या वाड्याच्या आतमध्ये उभे असलेले हे शिवमंदिरात परिसरातील नागरिकांसाठी श्रद्धास्थान आहे. पूर्ण बातमी वाचा…
भगवान शिवाला समर्पित मंदिर जिथे सर्वात वजनदार शिवलिंग:151 किलो गंधकापासून बनवलेल्या वेदीवर 111 किलो शुद्ध पारा असलेला महादेव
छत्रपती संभाजीनगर पासून जवळच असलेल्या पळशी गावाच्या शिवारात आहे श्री पारदेश्वर महादेव मंदिर. हे मंदिर गेल्या 25 वर्षांपासून लोकांच्या श्रद्धेचे केंद्र बनले आहे. मंदिरात 111 किलो वजनाच्या पारापासून बनलेले एक मोठे शिवलिंग आहे. पारदेश्वर शिवलिंग पारा पासून बनलेले आहे. तर 151 किलो गंधकापासून बनवलेल्या वेदीवर 111 किलो पारापासून बनलेले लिंग ठेवले आहे.असे मानले जाते की या शिवलिंगाचे दर्शन घेतल्याने ज्योतिर्लिंग आणि अनंत कोटी शिवलिंगाचे आशीर्वाद मिळतात. पूर्ण बातमी वाचा….
खडकी नगरीचे ग्रामदैवत म्हणून प्रसिद्ध खडकेश्वर महादेव मंदिर:ऐतिहासिक आणि सांस्कृतिक महत्त्व सांगणारा स्पेशल रिपोर्ट
श्रावण महिना हा हिंदू धर्मातील अत्यंत पवित्र असा महिना मानला जातो. त्यामुळे या महिन्याची भाविक आतुरतेने वाट पाहत असतात. या महिन्यात शंकराची आराधना केल्याने भाविकांना मोठा लाभ होतो, असे सांगितले जाते. त्यात श्रावणी सोमवारी महादेवाच्या साधनेला महत्त्व असतेच. त्या सर्वात शहरातील ग्राम दैवताला अतिशय महत्त्व असते. छत्रपती संभाजीनगर शहराचेही ऐतिहासिक नाव खडकी असे होते. याच खडकी नगरीचे ग्रामदैवत म्हणून खडकेश्वर महादेव मंदिर प्रसिद्ध आहे. याच मंदिराचे ऐतिहासिक आणि सांस्कृतिक महत्त्व सांगणारा हा स्पेशल रिपोर्ट…. पूर्ण बातमी वाचा…
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.