
जम्मू काश्मीरच्या किश्तवाड जिल्ह्यात गुरुवारी सकाळी सुरक्षा दलांनी दहशतवाद्यांविरोधात मोठी कारवाई केली. छत्रू परिसरातील सिंहपोरा भागात दहशतवाद्यांच्या हालचालींबाबत मिळालेल्या माहितीवरून लष्कर आणि पोलिसांनी संयुक्त शोधमोहीम राबवली. यावेळी झालेल्या चकम
.
शहीद जवान संदीप गायकर हे महाराष्ट्रातील अहिल्यानगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातल्या करंडी गावचे रहिवासी होते. अवघ्या नऊ महिन्यांपूर्वी त्यांनी मराठा रेजिमेंटच्या आरआर बटालियनमध्ये लष्करी सेवेत प्रवेश केला होता. गुरुवारी दहशतवाद्यांशी लढताना ते शहीद झाले. गायकर यांचे पार्थिव त्यांच्या मूळ गावी अहिल्यानगरातील अकोले येथील ब्राम्हणवाडा येथे उद्या आणण्यात येणार आहे. त्यांच्या पश्चात आई-वडील , पत्नी आणि मुलगी आहे. त्यांच्या वीरमरणाची बातमी पोहोचताच गावात शोककळा पसरली.
मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी सकाळी सात वाजण्याच्या सुमारास किश्तवाडच्या सिंहपोरा-छत्रू परिसरात लष्कराच्या दोन पॅरा एसएफ, 11 आरआर, सातवी आसाम रायफल्स आणि स्थानिक पोलिसांच्या विशेष गट एसओजीने संयुक्त कारवाई सुरू केली. दहशतवाद्यांच्या गटाला घेरून शोधमोहीम सुरू असताना अचानक गोळीबार सुरू झाला. चकमकीत जवान संदीप गायकर गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने उपचारासाठी हलवण्यात आले, पण उपचारादरम्यान त्यांना वीरमरण आले.
भारतीय लष्कराच्या व्हाइट नाइट कोअरने सोशल मीडियावर चकमकीची माहिती दिलीय. त्यात एक जवान शहीद झाल्याचे सांगितले. गुरुवारी सकाळी किश्तवाडच्या छत्रू येथे पोलिसांसोबत संयुक्त मोहिम राबवत होते. त्यावेळी दहशतवाद्यांसोबत चकमक झाली. अजूनही गोळीबार सुरू आहे. या गोळीबारात एक जवान गंभीर जखमी झाला होता. पण उपचारादरम्यान त्याला वीरमरण आले असे, व्हाइट नाइट कोअरने सांगितले आहे.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.