
Jay Pawar Engagement: उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या धाकट्या लेकाचा अलीकडेच साखरपुडा पार पडला. जय पवार आणि ऋतुजा पाटील यांचा पुण्यात साखरपुडा झाला. जय पवार यांचे लग्न ठरल्यानंतर आता पार्थ पवार यांचे लग्न कधी अशा चर्चांना उधाण आलं आहे. यावर आता पार्थ पवार यांचे वडील म्हणजेच अजित पवार यांनी उत्तर दिलं आहे.
जय पवार हे अजितदादांचे धाकटे चिरंजीव आहेत. उद्योजक प्रवीण पाटील यांची कन्या ऋतुजा पाटील यांच्यासोबत त्यांचे लग्न ठरले आहे. 10 एप्रिल रोजी पुण्यातील घोटावडे येथील अजित पवारांच्या फार्महाउसवर मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थितीत हा सोहळा संपन्न झाला आहे. लवकरच दोघंही लग्नबंधनात अडकणार आहेत. जय पवारांनंतर पार्थ पवार कधी लग्नबंधनात अडकणार, याची चर्चा असतानाच अजितदादांनी यावर उत्तर दिलं आहे.
अजित पवार हे आज पुण्यात उपस्थित होते. तेव्हा त्यानी प्रसारमाध्यमांशी चर्चा केली. तेव्हा त्यांना पार्थ पवार यांच्या लग्नाबाबत विचारण्यात आले. तेव्हा त्यांनी मिश्किलपणे उत्तर दिले. ‘आता जयने त्याचं ठरवलं पार्थने ठरवलं की त्याचं करू’, असं उत्तर अजित पवारांनी दिलं आहे
दीनानाथ मंगेशकर रुग्णालयावर कारवाई?
तिसरा अहवाल आल्यानंतर शासन योग्य कारवाई करेल. मुख्यमंत्री यांच्याकडे दुसरा अहवाल आला आहे असं मला समजलं आहे. उद्या अमित शहा येणार असल्यामुळे उद्या मुख्यमंत्री यांना याबाबत विचारणार आहे. कुठल्या ही रुग्णालयात प्रत्येक व्यक्तीचा जीव महत्त्वाचा असतो. सेवाभावी वृत्ती लक्षात घेता वैद्यकीय क्षेत्रातील लोकांनी काम केलं पाहिजे. मंगेशकर कुटुंबीयांचं योगदान उच्च आहे. पाच ही भावंडांचे योगदान आहे त्याला तोड नाही. त्या परिवाराबद्दल महाराष्ट्रातील लोकांना आदर आहे. त्यामुळं असं वक्तव्य करू नये, असं अजित पवारांनी म्हटलं आहे.
कोण आहे अजित पवारांची सूनबाई?
जय पवार यांच्या होणाऱ्या पत्नी ऋतुजा पाटील या सोशल मीडिया कंपनी सांभाळणारे साताऱ्यातील फलटणचे प्रविण पाटील यांच्या कन्या आहेत. ऋतुजा पाटील या उच्चशिक्षित आहेत. जय पवार आणि ऋतुजा पाटील यांची गेल्या काही वर्षांपासून ओळख आहे. ऋतुजा पाटील यांची बहीण ही केसरी टूर्सच्या पाटील कुटुंबाच्या सूनबाई आहेत.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.