
वाल्मिक जोशी, झी मीडिया, पहूर : (Jalgaon News) गावात एखादं सार्वजनिक काम करायचं म्हटलं की तिथं गावकऱ्यांची गर्दी झालीच म्हणून समजा. खेड्यापाड्यातील हेच वातावरण आकर्षणाचा विषय ठरतं. जळगावातील पहूर इथंही अशीच एक घटना घडली, जिथं गावात एक महत्त्वाचं काम सुरू असताना गावकऱ्यांसोबतच चक्क वानरांचीसुद्धा उपस्थिती होती.
मारुतीच्या मूर्तीचं स्थलांतर सुरू असतानाच…
जळगावच्या जामनेर तालुक्यातील पहुर येथे प्रस्तावित नवीन श्रीराम मंदिराचे बांधकाम सुरू असतानाच, तेथील हिरा मारुतीच्या 20 फूट उंच मूर्तीचं स्थलांतर करण्यात येत होतं. यावेळी अचानकच तिथं वानर सेनेचं आगमन झाल्यानं, पहुरमधील नागरिकांनी हा अद्भुत आणि भक्तिमय क्षण पाहण्यासाठी मोठी गर्दी केली.
मागील अनेक दिवसांपासून या मूर्तीच्या स्थलांतरासाठी प्रयत्न सुरू होते. अखेर, अनेक अडचणींवर मात करून स्थलांतर सुरू असताना वानरांची हनुमान प्रतिप्रती आस्था दिसून आली असंच ही दृश्य पाहून गावकऱ्यांनी म्हटलं.
ही हिरा मारुतीची मूर्ती २ एप्रिल २००७ रोजी, गावातील हनुमान भक्त हिरा बारी यांनी स्वतःच्या खर्चाने स्थापित केली होती. अखेर, अनेक प्रयत्नांनंतर ही मूर्ती यशस्वीरीत्या स्थलांतरित करण्यात आली. खरंतर गावात देवदेवतांच्या मंदिरांचा जिर्णोद्धार, मूर्तीचं स्थलांतर या गोष्टी नव्या नाहीत. पण, काहीच कल्पना नसताना मात्र अशा पद्धतीनं अनपेक्षितपणे प्राणीमात्रांनी हजेरी लावणं, कोणतीही अडचण निर्माण न करता सुरू असणारं काम पाहणं या गोष्टी सर्वांनाच भारावून सोडतात आणि पहूर गावातील नागरिकांनी हाच क्षण इथं अनुभवला.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.