digital products downloads

जातीय वर्चस्वामुळेच सक्षम ताटेची ‎हत्या; अंजली आंबेडकर यांचा आरोप‎: आंचलच्या शिक्षणाची जबाबदारी घेतली, नांदेडमधील पीडीत कुटुंबाचे सांत्वन‎ – Nanded News

जातीय वर्चस्वामुळेच सक्षम ताटेची ‎हत्या; अंजली आंबेडकर यांचा आरोप‎:  आंचलच्या शिक्षणाची जबाबदारी घेतली, नांदेडमधील पीडीत कुटुंबाचे सांत्वन‎ – Nanded News


२७ नोव्हेंबर रोजी सक्षम ताटे याची‎हत्या जातीय वर्चस्वातून करण्यात‎आली. ताटे कुटुंब सध्या भीतीखाली‎आहे. त्यांना त्वरित पोलिस संरक्षण‎देण्याची गरज आहे. या कुटुंबाला‎न्याय मिळेपर्यंत लढा सुरूच राहील,‎असे वंचित बहुजन आघाडीच्या‎नेत्या अंजली आंबेडकर यांनी‎

.

सक्षम ताटे याची हत्या‎आंतरजातीय प्रेमप्रकरणातून झाली.‎त्यानंतर प्रेयसी आंचल मामीडवार‎हिने सक्षमच्या मृतदेहाशी विवाह‎केला. हे प्रकरण राज्यभर गाजले.‎बुधवारी अंजली आंबेडकर यांनी‎ताटे कुटुंबाची भेट घेतली. त्यांचे‎सांत्वन केले. अंजली आंबेडकर ‎‎म्हणाल्या, सत्तेतील मनुवादी‎प्रवृत्तीमुळे असे प्रकार वाढत आहेत. ‎‎दलित, भटक्या जाती, मुस्लीम, ‎‎आदिवासी समाजावर अन्याय‎वाढला आहे. आंचलने दोन‎व्हिडिओ व्हायरल करून दाखवलेले ‎‎धाडस कौतुकास्पद आहे.

सक्षमला ‎‎गुन्हेगार ठरवण्यासाठी तिच्यावर‎दबाव टाकण्यात आला. तरीही तिने‎धीर सोडला नाही. वंचित बहुजन‎आघाडी या कुटुंबाच्या पाठीशी आहे.‎न्याय मिळेपर्यंत शांत बसणार नाही,‎असा इशारा त्यांनी दिला. सक्षमचे‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎स्वप्न आंचल मोठी अधिकारी‎व्हावी, असे होते. हे स्वप्न पूर्ण‎करण्याची जबाबदारी वंचित‎आघाडी घेणार आहे. शिक्षणाची‎जबाबदारी घेऊ, असे त्या म्हणाल्या.‎

२७ नोव्हेंबर रोजी सक्षम‎गौतम ताटे या युवकाचा खून झाला.‎त्या प्रकरणी एक महिला आणि एक‎अल्पवयीन बालक अशा सहा‎जणांना अटक केली होती. या‎प्रकरणात पोलिसांनी मंगळवारी रात्री‎सातव्या आरोपीस अटक केली आहे.‎अमन शिरसे (२२, रा. माळटेकडी,‎नांदेड) असे आरोपीचे नाव आहे.‎

Doonited Affiliated: Syndicate News Hunt

This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.

Source link

Related posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Uttarakhand News Doonited
Social media & sharing icons powered by UltimatelySocial
Instagram
WhatsApp