
Jalna Crime News Today: नात्याला काळिमा फासणारा प्रकार जालना जिल्ह्यात उघडकीस आला आहे. अनैतिक संबंधांतून घडणाऱ्या गुन्ह्यांमध्ये वाढ होताना दिसतेय. जालन्यातही असाच एक प्रकार उघडकीस आला आहे. प्रेमप्रकरणात अडथळा ठरत असल्याने भावजयीच्या मदतीने भावाचा खून केल्याची घटना घडली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, प्रेमप्रकरणात अडथळा ठरत असल्याने भावजयीच्या मदतीने भावाने भावावर कुऱ्हाडीने वार करून खून केल्याची घटना घडली आहे. इतकंच नव्हे तर खून केल्यानंतर त्याचा मृतदेह गोणीत भरला. त्यात दगड टाकून तो मृतदेह दुचाकीवर नेऊन तलावातील पाण्यात फेकण्यात आला आहे. ही घटना जालन्यातील बदनापूर तालुक्यातील सोमठाणा येथे घडली आहे.
30 वर्षीय परमेश्वर तायडे असं मृत व्यक्तीचं नाव आहे. 28 वर्षीय ज्ञानेश्वर तायडे आणि मृताची पत्नी मनीषा परमेश्वर तायडे अशी आरोपींची नावे आहेत. त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.या प्रकरणी बदनापूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.
12 नोव्हेंबर रोजी जनावरांसाठी असलेल्या मुरघासाच्या पोत्यात एक मृतदेह पाण्याबाहेर आला होता. यावेळी पोलिसांनी आणि नागरिकांनी हा मृतदेह पाण्याबाहेर काढला. चौकशी केली असता मृतदेहाची ओळख पटली होती. दरम्यान, मृताच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला होता.
पोलिसांनी तपासाची सूत्रे फिरवली असता हा खून त्याच्याच भावाने भावजयीच्या मदतीने केला असल्याची माहिती पुढे आली. मृताचा भाऊ ज्ञानेश्वर राम तायडे आणि आरोपीची पत्नी हिला ताब्यात घेऊन विचारपूस केली. यात मृत परमेश्वर तायडे हा पत्नी आणि लहान भाऊ ज्ञानेश्वर तायडे यांच्या अनैतिक संबंधांस अडथळा होत असल्याचं कारण समोर आलं आहे.
संभाजीनगरमध्ये महिलेची आत्महत्या
उस्मानपुरा भागात गुरुवारी गुरुवारी रेखा राजू जाधव या 50 वर्षीय महिलेने घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. घटनेनंतर नागरिकांनी मृतदेह थेट पोलीस ठाण्यात आणत रात्री 9 ते 11 वाजेपर्यंत ठिय्या मांडला. यामुळे उस्मानपुरा पोलिस ठाण्यासमोर तणाव निर्माण झाला. या प्रकरणी मृत महिलेचा मुलगा विजय राजू जाधव याच्या फिर्यादीवरून आठ जणांविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जाधव यांची 21 वर्षांची विवाहित मुलगी 8 नोव्हेंबर रोजी घरातून निघून गेल्यापासून घरात तणावाचे वातावरण होते. बेपत्ता तरुणीच्या पतीने उस्मानपुरा ठाण्यात बेपत्ता झाल्याची तक्रार दिली होती. दरम्यान, मुलगी बुलढाण्यात असल्याची माहिती 9 नोव्हेंबर रोजी पोलिसांना मिळाली. गल्लीतील एका व्यक्तीने तिला पळून नेल्याचे समोर आले, अशी माहिती नातेवाइकांनी दिली. परंतु रात्री उशीर झाल्याने पोलिसांनी दुसऱ्या दिवशी जाण्याचे सांगितले. याच वेळी मुलीने जागा बदलल्याने ती सापडू शकली नाही. या सर्व घटनांमुळे रेखा या तणावात असल्याचे नातेवाइकांचे म्हणणे आहे आणि त्यामुळं महिलेने आत्महत्या केली.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.



