
जालना रिपोर्टर नितेश महाजन- Jalna News: महापालिका निवडणुकीच्या तोंडावर जालन्यात ठाकरेंच्या शिवसेनेला विशेष महत्व प्राप्त झालं आहे. काँग्रेसला रामराम करत भाजपात गेलेल्या कैलास गोरंट्याल यांनी स्वबळाचा नारा दिला आहे. तर शिवसेनाही आपली ताकद वाढवण्याच्या तयारीत आहे. त्यामुळे भाजप आणि शिवसेनेकडून जालन्यात ठाकरेंच्या शिवसेनेला ऑफर दिली आहे. जालन्यात ठाकरेंची शिवसेना सर्वांना का हवीहवीशी झाली आहे पाहुयात सविस्तर
शिवसेनेच्या फुटीनंतर ठाकरेंची शिवसेना आणि शिंदेंच्या शिवसेनेत विस्तवही जात नसल्याचं चित्र आहे. राज्यात प्रत्येक ठिकाणी दोन्ही शिवसेना आमनेसामने आल्याचं चित्र आहे. मात्र जालन्याच्या राजकारणात भलतंच चित्र पाहायला मिळतं आहे. कारण जालन्यात ठाकरेंच्या शिवसेनेला प्रचंड महत्व आलं आहे. महापालिकेवर झेंडा फडकवण्यासाठी भाजपसह शिंदेंच्या शिवसेनेलाही ठाकरेंच्या शिवसेनेची साथ हवी आहे.
अर्जून खोतकर यांना डिवचलं
नुकतेच काँग्रेसला रामराम करत भाजपवासी झालेल्या कैलास गोरंट्याल यांनी महापालिकेला स्वबळाचा नारा दिला आहे आणि त्यासाठीच त्यांनी ठाकरेंच्या शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष भास्कर आंबेकर यांना सोबत येण्याची थेट ऑफर देत अर्जून खोतकर यांना डिवचलं आहे.
गोरंट्याल यांच्या आधी शिवसेना नेते अर्जुन खोतकर यांनीही ठाकरेंच्या शिवसेनेला सोबत येण्याचा प्रस्ताव दिल्याची चर्चा जिल्ह्याच्या राजकारणात सुरू आहे. त्यातच स्थानिक पातळीवर निर्णय झाल्यास अर्जुन खोतकर योग्य तो निर्णय घेतील असं म्हणत शिवसेना नेत्यांनी या चर्चेला नकारही दिलेला नाहीय.
जालन्यात सर्वांना ठाकरेंची शिवसेना का हवीहवीशी वाटतेय
तर या सर्व ऑफर ठाकरेंच्या शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष भास्कर आंबेकर यांनी धुडकाऊन लावलेत. आम्ही कुणाच्याही बाजुला न जाता स्वता पालिका त्यात घेण्याचा निर्धार आंबेकर यांनी केला आहे.
जालना नगरपरिषदेचं रूपांतर आता महानगरपालिकेत झालं आहे. त्यामुळे महापालिकेचा पहिला महापौर आपल्याच पक्षाचा करण्यासाठी सर्वच पक्षांनी आपापल्या पद्धतीने डावपेच खेळायला सुरुवात केली आहे आणि याच सगळ्या राजकीय घडामोडींमध्ये ठाकरेंची शिवसेना जालन्यात निर्णायक ठरणार असल्यानं सर्वांना हवीहवीशी वाटतेय.
FAQ
जालना महापालिका निवडणुकीत ठाकरे शिवसेनेला का विशेष महत्व प्राप्त झाले?
जालना महापालिकेच्या निवडणुकीत ठाकरे शिवसेनेची ताकद निर्णायक ठरू शकते, त्यामुळे भाजप आणि शिंदे शिवसेनेसह इतर पक्षांना त्यांची साथ हवी आहे.
कैलास गोरंट्याल यांनी काय नारा दिला?
काँग्रेस सोडून भाजपात गेलेले कैलास गोरंट्याल यांनी जालना महापालिकेला स्वबळाचा नारा दिला आहे.
कैलास गोरंट्याल यांनी कोणाला ऑफर दिली?
गोरंट्याल यांनी ठाकरे शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष भास्कर आंबेकर यांना सोबत येण्याची थेट ऑफर देत अर्जुन खोतकर यांना डिवचले आहे.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.