digital products downloads

जिजाऊ बँकेचे अध्यक्ष अविनाश कोठाळे ‘आयकॉनिक लीडर’ पुरस्काराने सन्मानित: राष्ट्रीय स्तरावरील 100 सहकारी बँकांच्या परिषदेत गौरव – Amravati News

जिजाऊ बँकेचे अध्यक्ष अविनाश कोठाळे ‘आयकॉनिक लीडर’ पुरस्काराने सन्मानित:  राष्ट्रीय स्तरावरील 100 सहकारी बँकांच्या परिषदेत गौरव – Amravati News



अमरावती येथील जिजाऊ बँकेचे अध्यक्ष अविनाश कोठाळे यांना खोपोली येथे झालेल्या ‘आयकॉनिक लीडर्स २०२६’ संमेलनात ‘अतिउत्कृष्ट चेअरमन इन फायनान्शिअल इंक्लुजन’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. राष्ट्रीय स्तरावरील अग्रगण्य शंभर सहकारी बँकांच्या या परिषदेमध्ये त्यांना हा गौरव मिळाला. हा पुरस्कार ऑल इंडिया बँक असोसिएशन मुंबईचे अध्यक्ष सीईओ गोपाल भगत, पुणे जिल्हा असोसिएशनचे अध्यक्ष सुभाष मोहिते, सायबर क्राईम महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक संजय शिंदे, अर्बन बँक असोसिएशनचे अध्यक्ष प्रसाद पाटील, नॅफकब नवी दिल्लीचे सीईओ विवेक गुप्ता, डॉ. सुधीर महाजन आणि नॅफकब संचालक सुनील देवरा यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. खोपोली येथे दोन दिवस चाललेल्या या परिषदेत देशभरातील विविध सहकारी बँकांचे चार गट करण्यात आले होते. यामध्ये १०० कोटींपर्यंत टायर वन, १००० कोटींपर्यंत टायर टू, १० हजार कोटींपर्यंत टायर थ्री आणि १० हजार कोटींपेक्षा जास्त टायर फोर असे गट होते. त्यातून त्या-त्या विभागात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या सहकारी बँकांची पुरस्कारासाठी निवड करण्यात आली. जिजाऊ कमर्शियल को-ऑपरेटिव्ह बँकेचे अध्यक्ष अविनाश कोठाळे आणि संचालक मंडळाला ‘अतिउत्कृष्ट चेअरमन इन फायनान्शिअल इंक्लुजन’ या पुरस्काराने गौरवण्यात आले. सामान्य लोकांना बँकिंग प्रणालीमध्ये आणणे, कर्जपुरवठा करणे आणि समाजात उद्योजकता वाढवणे ही या बँकेची प्रमुख वैशिष्ट्ये यावेळी अधोरेखित करण्यात आली. अविनाश कोठाळे यांनी हा पुरस्कार जिजाऊ बँकेच्या सर्व सन्माननीय सभासदांचा असल्याचे नम्रपणे सांगितले. या संमेलनात को-ऑपरेटिव्ह बँकिंगसाठी सायबर सेक्युरिटी वर्कशॉप आणि आयटी क्षेत्रातील नवीनतम तंत्रज्ञानावर चर्चासत्रही आयोजित करण्यात आले होते. रिझर्व्ह बँक सेंट्रल बोर्डचे संचालक सतीश मराठे यांच्या हस्ते याचे उद्घाटन झाले. त्यांनी सहकारी बँकांनी दर्जेदार ग्राहक सेवा, डिजिटलायझेशन, आधुनिक सेवा आणि फायनान्शिअल इंक्लुजनचे महत्त्व स्पष्ट केले. यावेळी कॉसमॉस बँकेचे बीओएम अध्यक्ष मिलिंद काळे यांनी ‘नॅफकब गव्हर्नन्स इन को-ऑपरेटिव्ह बँक’ या विषयावर आपले विचार मांडले. बँकेचे उपाध्यक्ष प्रदीप चौधरी, तज्ज्ञ संचालक तथा सनदी लेखापाल विजय जाधव, संचालक अनिल बंड व अनिल टाले, तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी नितीन वानखडे हेही याप्रसंगी प्रामुख्याने उपस्थित होते.

Doonited Affiliated: Syndicate News Hunt

This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.

Source link

Related posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Uttarakhand News Doonited
Social media & sharing icons powered by UltimatelySocial
Instagram
WhatsApp