
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला सोडचिठ्ठी देणारे अभिजीत पवार हे दोन दिवसांतच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधून स्वगृही परतलेत. त्यांनी गत मंगळवारी राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. ते शरद पवार गटाचे बडे नेते जितेंद्र आव
.
जितेंद्र आव्हाड यांचे निकटवर्तीय अभिजीत पवार व हेमंत वाणी यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह मंगळवारी (18 फेब्रुवारी) अजित पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. या प्रवेशामु्ळे अजित पवारांनी आव्हाडांना जबर झटका दिल्याची चर्चा सुरू झाली होती. पण अभिजीत पवार यांनी दोनच दिवसांत राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत आव्हाडांच्या तंबूत पुनःप्रवेश केला. त्यांनी एका पत्रकार परिषदेद्वारे आपल्यावर राष्ट्रवादीत प्रवेश करण्यासाठी प्रचंड दबाव टाकण्यात आल्याचा आरोप केला.
मरेपर्यंत आव्हाडांची साथ सोडणार नाही
अभिजीत पवार म्हणाले, अजित पवारांच्या राष्ट्रवादीत जाण्यासाठी माझ्यावर मोठा दबाव दबाव टाकण्यात आला. केवळ आमदार जितेंद्र आव्हाड यांना अडकवण्यासाठी माझा वापर केला जाणार होता. आव्हाड यांचा मला फोन आला नसता तर मी आत्महत्या केली असती. त्यांनी मला फोन केला. त्यामुळे आज मी पुन्हा शरद पवार गटात स्वगृही परतलो. यापुढे मरेपर्यंत जितेंद्र आव्हाड हेच माझे नेते असतील.
माझ्यावर गुन्हा दाखल करून मला पुन्हा दोन वर्षे तुरुंगात डांबण्याचा कट होता. माझ्या मित्रांना पोलिसांकरवी धमकावण्यात आले. ईडीची धमकी दिली जात होती. यामुळे अस्वस्थ झालो होतो. नजीब मुल्ला मला फोनवरून इतरांकरवी धमक्या देत होता. त्यामुळेच मी जितेंद्र आव्हाड यांना काहीही न सांगता केवळ दबावापोटी अजित पवारांच्या पक्षात गेलो होतो. पण माझा वापर केवळ आव्हाड यांना अडकवण्यासाठी केला जाणार हे लक्षात येताच मी पुन्हा आव्हाडांकडे परत आलो. या प्रकरणी माझी आई व पत्नीलाही घाबरवण्याचा प्रयत्न झाला. आता जितेंद्र आव्हाड यांनी मला आपलेसे केले नाही तरी मी त्यांना सोडणार नाही.
दरम्यान, अभिजीत पवार अजित पवारांच्या पक्षात गेल्यामुळे अजितदादांनी जितेंद्र आव्हाड यांना धोबीपछाड दिल्याची चर्चा राजकारणात रंगली होती. पण आता ते पुन्हा स्वगृही परतल्यामुळे आव्हाडांनी अजित पवारांवर जोरदार पलटवार केल्याचा दावा केला जात आहे.
हे ही वाचा…
धनंजय मुंडेंच्या तोंडावरून वारे गेले!:सुषमा अंधारे यांनी समजावून सांगितला ‘बेल्स पाल्सी’ आजार; राजकारण जिवघेणे असल्याचा इशारा
मुंबई – राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांना बेल्स पाल्सी आजार झाला आहे. या आजारामुळे आपल्याला सलग दोन मिनिटेही बोलत येत नसल्याची माहिती त्यांनी स्वतः दिली आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी हा आजार म्हणजे अर्ध्या तोंडावरून वारे जाणे असल्याचे सोप्या भाषेत समजावून सांगितले आहे. तसेच राजकारण हे जिवघेणे असल्याचा इशाराही त्यांनी यावेळी दिला. वाचा सविस्तर
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.