
Devendra Fadnavis on Local Body Election: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपाकडून आढावा बैठक घेतली जात आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज अमरावतीत प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना शक्य आहे तिथे युती केली पाहिजे असे निर्देश दिले असल्याचं जाहीर केलं आहे. तसंच एखाद्या ठिकाणी युती झाली नाही तरी मित्र पक्षावर टीका करु नये असे निर्देश दिले असल्याचंही स्पष्ट केलं आहे. मला वाटतं महायुती म्हणून आमच्या तिन्ही पक्षांना चांगलं यश मिळेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.
“आमचे अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी संपूर्ण महाराष्ट्रात विभागाप्रमाणे दौरे लावले आहेत. महानगरपालिका, जिल्हा परिषदा, नगरपालिका, नगर पंचायती याच्या निवडणुका आहेत. त्या निवडणुकीच्या निमित्ताने आढावा घेण्यासाठी या बैठका आयोजित आहेत. यापूर्वी मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, कोकण आणि पश्चिम महाराष्ट्र हे चार विभाग पूर्ण केले आहेत. अमरावतीचा आढावा आज संपत आहे. आता नागपूर करुन केवळ मुंबई महापालिका बाकी राहील, जी आम्ही पुढच्या आठवड्यात करु,” असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.
“एकूणच कार्यकर्त्यांची मानसिकता आणि तयारी चांगली आहे. निवडणुकीसाठी पक्ष सज्ज आहे. ज्याप्रकारे निवडणुका लढण्याचा प्रयत्न आहे, त्यानुसार निर्देश दिले जातील. युतीच्या संदर्भातही आम्ही जे अधिकार आहेत, ते देत आहोत. जिथे शक्य आहे तिथे युती केली पाहिजे असे निर्देश दिले आहेत. एकाद्या ठिकाणी युती झाली नाही तरी मित्र पक्षावर टीका करु नये असे निर्देश दिले आहेत. मला वाटतं महायुती म्हणून आमच्या तिन्ही पक्षांना चांगलं यश मिळेल,” असंही त्यांनी म्हटलं आहे.
पुढे ते म्हणाले, “कार्यकर्त्यांची स्वबळावर लढण्याची इच्छा नेहमीच असते. पण त्या त्या ठिकाणची परिस्थिती पाहून निर्णय घ्यायचा असतो. फक्त निवडणूक लढता यावी इतक्या पुरता असा निर्णय घेता येत नाही. जिथे शक्य आहे तिथे युती करु. जिथे शक्य नाही तिथे समोरासमोर लढू”.
प्रियाकं खरगे यांनी आरएसएसवर बंदी घालण्याची मागणी केल्यासंदर्भात विचारलं असता ते म्हणाले की, “कर्नाटकचे प्रियाकं खरगे प्रसिद्धीसाठी अशा गोष्टी करतात. त्यांना काही आधार नाही. वडिलांच्या भररवशावर राजकारण करणारे आहेत. यापूर्वी अनेक वेळा संघावर बंदी घालण्याचा प्रयत्न झाला, बंदी घातली गेली. ज्या इंदिरांजींनी संघावर बंदी घातली त्यांना सत्तेवरुन पायउतार व्हावं लागलं. संघ ही सांस्कृतिक शक्ती, देशभक्त संघटना, राष्ट्रीय विचाराने प्रेरित, मूल्यधिष्टित अशा प्रकारच्या मानविनिर्मीतीच काम करते”.
भाजप-राष्ट्रवादी युतीनंतर बदलापुरात राजकीय हालचालींना वेग
आगामी नगरपालिका निवडणुकीपूर्वीच बदलापुरात भाजप आणि राष्ट्रवादी अजित पवार पक्षाने युतीची घोषणा केल्याने एकनाथ शिंदेंसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. तर शिवसेनेने स्वबळावर लढण्याचे संकेत दिले आहेत.
राज्यात महायुतीचं सरकार असलं तरी बदलापुरात मात्र नगरपरिषद निवडणूक जाहीर होण्यापूर्वीच भाजप आणि राष्ट्रवादी अजित पवार पक्षाने युती करत शिंदेंच्या शिवसेनेला जोरदार धक्का दिला आहे. या युतीमुळे शिंदे गट एकाकी पडल्याचं चित्र आहे. कार्यकर्त्यांच्या भावना लक्षात घेऊन ही युती केल्याची प्रतिक्रिया आमदार किसन कथोरे यांनी दिली आहे. तर राज्यात सत्तेत एकत्र असल्यामुळे बदलापुरातही शिवसेनेला सोबत घेण्यासाठी प्रयत्नशील आहोत असं सांगत परशुराम आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष कॅप्टन आशिष दामले यांनी सावध भूमिका घेतली आहे.
भाजप आणि राष्ट्रवादीच्या युतीमुळे एकाकी पडलेल्या शिवसेनेत संतापाची लाट उसळली आहे. आम्हाला विश्वासात न घेता ही युती करण्यात आली आहे मात्र असं असलं तरी शिवसेना स्वबळावर निवडणूक लढवून सत्ता मिळवेल असा विश्वास शिवसेना शिंदे गटाचे शहरप्रमुख वामन म्हात्रे यांनी व्यक्त केला आहे.
काँग्रेसची एकला चलो रे ची भूमिका ?
मुंबई काँग्रेसच्या बैठकीत सर्व नेत्यांनी मुंबई महानगरपालिका निवडणुका स्वतंत्र लढण्याची एकमताने मागणी केल्याची खात्रीलायक माहिती आहे. मुंबई महानगरपालिका निवडणुका महाविकास आघाडी लढणार की स्वतंत्र याचा निर्णय आज संध्याकाळपर्यंत होणार आहे. मात्र मुंबई महानगरपालिका निवडणुका स्वतंत्र लढण्याचा आजच्या बैठकीत सर्व नेत्यांचा असल्याची खात्रीलायक माहिती. काँग्रेसचं मनसे सोबत कुठली तडजोड न करण्याचे धोरण आहे.
FAQ
1) भाजप स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी काय तयारी करत आहे?
उत्तर: भाजपाने निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आढावा बैठका घेतल्या आहेत. पक्षाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी संपूर्ण महाराष्ट्रात विभागनिहाय दौरे केल्या आहेत. या बैठका महानगरपालिका, जिल्हा परिषदा, नगरपालिका आणि नगरपंचायतीच्या निवडणुकांसाठी आयोजित आहेत. कार्यकर्त्यांची मानसिकता आणि तयारी चांगली असून, पक्ष निवडणुकांसाठी सज्ज आहे.
2) कोणत्या विभागांचा आढावा पूर्ण झाला आहे?
उत्तर: मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, कोकण आणि पश्चिम महाराष्ट्र या चार विभागांचा आढावा पूर्ण झाला आहे. अमरावतीचा आढावा आज (अमरावतीत) संपला. आता नागपूरचा आढावा घेतला जाईल आणि केवळ मुंबई महापालिका बाकी राहिल, जी पुढच्या आठवड्यात होईल.
3) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी युतीबाबत काय निर्देश दिले आहेत?
उत्तर: शक्य तेथे युती केली पाहिजे, असे निर्देश दिले आहेत. युती झाली नाही तरी मित्र पक्षावर टीका करू नये. कार्यकर्त्यांची स्वबळावर लढण्याची इच्छा असते, पण त्या-त्या ठिकाणची परिस्थिती पाहून निर्णय घ्यायचा. जिथे शक्य आहे तिथे युती, जिथे नाही तिथे समोरासमोर लढू.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.