
ZP Election 2026 Schedule: राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीनंतर महाराष्ट्रात लगेचच महापालिकेच्या निवडणुका पार पडणार आहेत. येत्या 15 जानेवारी रोजी पालिकेच्या निवडणुका आणि 16 जानेवारी रोजी निकाल जाहीर होणार आहे. यापाठोपाठ निवडणूक आयोगाने आज राज्यातील 12 जिल्हा परिषदा आणि 125 पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांच्या तारखा जाहीर केल्या आहेत.
निवडणूक आयोगाने जाहिर केलेल्या माहितीनुसार, 5 फेब्रुवारी 2026 रोजी मतदान असणार आहे. तर निकालाची तारी 7 फेब्रुवारी 2026 अशी असणार आहे.
या जिल्हा परिषदांसाठी निवडणुका होणार
- कोकण– रायगड, रत्नागिरी सिंधुदु्र्ग
- पुणे – पुणे, साजारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर
- छत्रपती संभाजी नगर – छ.संभाजी नगर, परभणी, लातूर
प्रत्येक मतदाराला दोन मतदान करावे लागतील. जिल्हा परिषद, पंचायत समिती निर्वाचक अशी दोन ठिकाणी मतदान करावे लागणार आहे. 25 हजार मतदान केंद्र असणार आहेत. राखीव मतदारावर जातवैधता पडताळणी पाहणे आवश्यक. जातवैधता सादर न केल्यास नामनिर्देशक रद्द केले जाईल.
पिंक मतदान केंद्र
महिला मतदारांची संख्या जास्त आहे त्यांच्यासाठी पिंक मतदान केंद्र असणार आहे. या मतदान केंद्रावर महिला अधिकारी असणार आहेत.
12 जिल्हा परिषद आणि 125 पंचायत समिती असतील
पुणे विभागातील पुणे, सातारा, सांगली, सोलापूर आणि कोल्हापूर, तर कोकण विभागातील रायगड,रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग, तर छत्रपती संभाजी नगर विभागातील छत्रपती संभाजी नगर, परभणी, धाराशिव आणि लातूर या 12 जिल्हा परिषदा आहेत. दिनेश वाघमारे ,राज्य निवडणुक अयोग्य ,आयुक्त पत्रकार परिषदेत दिलेल्या माहितीनुसार, १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समिती असतील.
पुणे विभागातील पुणे, सातारा, सांगली, सोलापूर आणि कोल्हापूर, तर कोकण विभागातील रायगड,रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग, तर छत्रपती संभाजी नगर विभागातील छत्रपती संभाजी नगर, परभणी, धाराशिव आणि लातूर या १२ जिल्हा परिषदा आहेत.
दोनदा मतदान करायचे
जात वैधता प्रमाणपत्र नसेल तर जात पडताळणीसाठी केलेला अर्ज सादर करणे आवश्यक आहे. सहा महिन्यांचा आत जात वैधता प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक आहे. २५ ४८२ मतदान केंद्र असतील. दुबार मतदार आम्ही identify केले आहेत. मतदार यादीत फेरबदल करण्याचे अधिकार राज्य आयोगाला नाही. १ जुलै २०२५ ची मतदार यादी वापरली जाईल. एकूण 125 पंचायत समिती मध्ये 1462 सभासद निवडून द्यायचे आहेत.
मतदान आणि निकालाची तारीख जाहीर; पाहा काय आहे संपूर्ण कार्यक्रम
- अर्ज भरण्याचा कालावधी – 16 जानेवारी ते 21 जानेवारी 2026
- अर्जांची छाननी – 22 जानेवारी 2026
- अर्ज मागे घेण्याचा दिनांक- 27 जानेवारी 2026 (दुपारी ३3 पर्यंत)
- चिन्ह वाटप – 27 जानेवारी 2026
- मतदान दिनांक- 5 फेब्रुवारी 2026 सकाळी 7.30 ते संध्याकाळी 5.30 पर्यंत
- निकाल दिनांक- 7 फेब्रुवारी 2026 सकाळी 10 वाजता पासून
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.



