digital products downloads

जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष, पदाधिकाऱ्यांच्या निवडीसाठी मुंबईकडे बोट: निवडणुकीत जिथे आश्वासन दिले तिथे 21 कोटी रुपयांचा विकास निधी मिळवून देणारच- पालकमंत्री जयकुमार गोरे – Solapur News

जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष, पदाधिकाऱ्यांच्या निवडीसाठी मुंबईकडे बोट:  निवडणुकीत जिथे आश्वासन दिले तिथे 21 कोटी रुपयांचा विकास निधी मिळवून देणारच- पालकमंत्री जयकुमार गोरे – Solapur News



सोलापूर जिल्हा परिषद निवडणुकीत स्वत:ची ताकद आणि कुवत विसरुन काही जण भाजपचा सुपडा करण्याच्या वल्गना करीत होते. परंतु आमच्या सरकारने सर्वसामान्यांसाठी जी विकासकामे केली त्याची दखल घेऊन मतदारांनी भाजपला मोठे यश मिळवून दिले आहे. जे लोक भाजपवर टीका करीत होते, त्यांचीच ताकद केवळ त्यांच्या कुटूंबापुरतीच मर्यादित असल्याचे या निवडणुकीत दिसून आले, अशा शब्दात पालकमंत्री गोरे यांनी मोहिते- पाटील यांच्यासह विरोधकांचा समाचार घेतला. ‘मुख्यमंत्री देवाभाऊंच्या सरकारमध्ये दिलेल्या शब्दाची माघार घेतली जात नाही. निवडणुकीत जिथे आश्वासन दिले तिथे २१ कोटी रुपयांचा विकास निधी मिळवून दिला जाईल’, असा शब्दही गोरे यांनी नूतन जिल्हा परिषद सदस्यांना दिला. भाजपच्या नवनिर्वाचित ३८ जिल्हा परिषद सदस्यांचा बुधवारी सत्कार करण्यात आला. या वेळी ते बोलत होते. आमदार सचिन कल्याणशेट्टी, आमदार समाधान आवताडे, आमदार देवेंद्र कोठे, माजी आमदार राजन पाटील, यशवंत माने, राजेंद्र राऊत, राम सातपुते आदी उपस्थित होते. माजी आमदार राजन पाटील म्हणाले, ‘गोरे जेव्हा पालकमंत्री झाले त्यावेळी मुख्यमंत्र्यांचा निर्णय चुकला की काय? असे वाटत होते. एका प्रगत आणि मोठ्या जिल्ह्याची जबाबदारी त्यांच्याकडे दिल्याने विकासकामांच्या बाबतीत प्रश्न उभारले होते. परंतु गोरे यांनी स्वत:चे कौशल्य दाखवून जिल्ह्याच्या विकासाचा ध्यास घेतला आहे. त्यांना सोलापूरच्या प्रश्नांची चांगली जाण आहे.

Doonited Affiliated: Syndicate News Hunt

This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.

Source link

Related posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Uttarakhand News Doonited
Social media & sharing icons powered by UltimatelySocial
Instagram
WhatsApp